कोबीवर्गीय पिकातील रायसीनेस, ब्लाइंडनेस, लीफ टीप बर्न विकृती

कोबीवर्गीय पिकातील रायसीनेस, लीफ टीप बर्न विकृती
कोबीवर्गीय पिकातील रायसीनेस, लीफ टीप बर्न विकृती

कोबीवर्गीय पिकांत अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रांचा वापर, वेळेवर लागवड आदी बाबी चुकल्यानेच केवळ विकृती निर्माण होत नाहीत. गड्ड्यांची उशिरा काढणी, योग्य हंगामात योग्य त्या जातींचा वापर न करणे आदी बाबींमुळेही विकृती निर्माण होतात. ठराविक हंगामासाठी योग्य जातीचा वापर न करणे, तापमानातील चढउतार , मशागत करताना झालेल्या जखमा आदी कारणांमुळेही विकृती निर्माण होते.     रायसीनेस :  ही विकृती फ्लाॅवर आणि ब्रोकोलीवर दिसते. कारणे : कोबी हे पीक तापमान आणि आर्द्रतेतील चढउतारास फारच संवेदनशील आहे. अस्थिर आणि प्रतिकूल तापमानाशिवाय, उच्च आर्द्रता, नत्रयुक्त खताचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केल्याने रायसिनेस होतो. गड्ड्यांची काढणी उशिरा केल्यावरदेखील ही विकृती निर्माण होते. लक्षणे : गड्ड्यावर फुलांच्या बारीक कळ्या पसरून मखमलीसारखे आवरण दिसते. कोबीचा पृष्ठभाग एकसमान न दिसता खडबडीत व मोकळा दिसतो. त्यामुळे कोबीच्या गड्ड्याची प्रत खालावते.

उपाय:

  • लागवडीच्या ठराविक हंगामासाठी योग्य वाणांची निवड करावी.
  • तापमानात जास्त चढउतार असणाऱ्या भागात प्रतिकारक जातींची निवड करावी उदा- पूसा शुभ्रा, पुसा दीपाली.
  • कोबीच्या गड्ड्याची काढणी योग्य वेळी करावी.
  • ब्लाइंडनेस (वांझ रोप) : ही विकृती कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोलीवर आढळून येते. कारणे : फ्लॉवरच्या रोपाचा शेंडा विकसित होत नाही. कमी तापमान, शेंडा खुडला गेल्यास किंवा कीड-रोगांमुळे त्याला इजा झाल्यास अशा रोपाला गड्डा धरत नाही. लक्षणे : रोपांची पाने रुंद, मोठी, गडद हिरवी आणि जाडसर राठ असतात.

  • लागवडीसाठी निरोगी जोमदार आणि शेंडा असलेली रोपे निवडावीत.
  • रोपांची पुनर्लागवडीच्या वेळी काळजीपूर्वक हाताळणी करावी.
  • कमी तापमान असल्यास पुनर्लागवड टाळावी. योग्य तापमान करावे.
  • वांझ रोपे शेतातून काढून टाकून त्यांचा त्वरित नायनाट करावा.  
  • लीफ टिपबर्न : ही विकृती कोबी आणि फ्लॉवर या पिकांवर दिसते. कारणे : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लीफ टिपबर्न होतो. लक्षणे : नवीन पानाची टोके तपकिरी होतात. जमिनीमध्ये जरी कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असले तरी पाण्याचा ताण किंवा असमान पाणी यामुळे स्थानिक कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊन लीफ टिपबर्न विकृती होते.

    उपाय :

  • पिकास पाण्याचा ताण न पडू देता सिंचनाद्वारे समान आर्द्रता कायम राखावी.
  • कॅल्शियम क्लोराइड २५ ग्रॅम प्रति१० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • जमिनीत नत्र या अन्नद्रव्याची मात्रा देताना कॅल्शियम अमोनियम नायट्रेट या खताद्वारे द्यावी.
  • संपर्क :  ए.टी.दौंडे, ७५८८०८२००८ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प भाजीपाला पिके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com