agricultural news in marathi, study of insects resistance, Agrowon, Maharashtra | Agrowon

प्रतिकारकता विकसन रोखण्यासाठी होतोय किडींच्या हालचालींचा अभ्यास
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

पि कांमध्ये येणाऱ्या अनेक किडी या कीटकनाशकांसाठी प्रतिकारक झाल्या आहेत. परिणामी फवारणीनंतरही त्यांचे चांगले नियंत्रण न मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर ब्राझील संशोधकांनी किडीचा पिकावरील प्रादुर्भाव, त्यांचा प्रसार होण्याच्या पद्धती, पिकांमध्ये घेतली जाणारी आंतरपिके यांचे विश्लेषण करून एक नवे तंत्र विकसित केले आहे.

पि कांमध्ये येणाऱ्या अनेक किडी या कीटकनाशकांसाठी प्रतिकारक झाल्या आहेत. परिणामी फवारणीनंतरही त्यांचे चांगले नियंत्रण न मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर ब्राझील संशोधकांनी किडीचा पिकावरील प्रादुर्भाव, त्यांचा प्रसार होण्याच्या पद्धती, पिकांमध्ये घेतली जाणारी आंतरपिके यांचे विश्लेषण करून एक नवे तंत्र विकसित केले आहे.

शंभरांपेक्षा अधिक पिकांवर प्रादुर्भाव होणारी पाने खाणारी अळी (शा. नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपेर्डा) ही महत्त्वाची कीड आहे. या किडीने अनेक कीटकनाशके आणि जुनकीय सुधारित पिकांसाठीही (उदा. बीटी) प्रतिकारकता विकसित केल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी या किडीचा प्रादुर्भाव होताच त्यांचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होत नाही. या आणि अशा अनेक प्रतिकारक होत असलेल्या किडींपासून पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी ब्राझील येथील सॅवो पावलो विद्यापीठातील ल्युईझ डी क्विईरोझ कृषी महाविद्यालय आणि बोटूकटू येथील सॅवो पावले राज्य विद्यापीठातील संशोधकांनी गणितीय पद्धती तयार केली आहे. ही पद्धती किडींच्या हालचालींचा वेध घेऊन, त्यांचे गणितीय विश्लेषणाद्वारे मांडण्यात आली आहे. त्याचे निष्कर्ष सायंटिफिक रिपोर्टसमध्ये प्रकाशित झाले आहेत.   
या प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ प्रो. वेसले गोडोय यांनी सांगितले, की पिकातील किडींमुळे होणारे नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने संगणकीय प्रारुपांचा वापर करण्याची कल्पना राबविण्यात आली आहे. त्यातून किडींची संख्या आणि तिचा पिकांवर होणारा प्रसार यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल.
पहिल्यांदा हा प्रयोग कुकुरबीट भुंगेऱ्यांबाबत (शा. नाव ः Diabrotica speciosa) करण्यात आला. हा भुंगेरा सोयाबीन, मका आणि कपाशी पिकांवर हल्ला करतो. या भुंगेऱ्यांच्या हालचालीचा संगणकीय वेध घेतला असता किडीच्या प्रसारामध्ये वरील पिकामध्ये घेत असलेली आंतरपिके महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले.
या किडीचा प्रसार रोखण्यासाठी पिकांमध्ये मक्याच्या दाट ओळी उपयुक्त ठरू शकत असल्याचे लक्षात आहे. या समाधानकारक निष्कर्षामुळे उत्साह वाढलेल्या संशोधकांनी बीटी मका, कपाशी आणि सोयाबीन पिकांमध्ये आढळणाऱ्या आणि जनुकीय सुधारित पिकांसह कीटकनाशकांसाठी प्रतिकारकता विकसित केलेल्या स्पोडोप्टेरा फ्रुडीपेर्डा या किडीसाठी काम सुरू केले.
बीटी पिकांच्या संदर्भात माहिती देताना गोडोय यांनी सांगितले, की बीटी पिकांमध्ये रेफ्युजी म्हणून वापरलेले बियाणे किडींची प्रतिकारकता वाढविण्यासाठी वापरले जाते. या रेफ्युजी पिकांवरील पतंगांमुळे बीटी विषारी घटकांसाठीची संवेदनशीलता टिकून राहण्यास मदत होते.
रेफ्युजी बियाणे आणि बीटी पीक यातील लागवडीच्या प्रकारानुसार एकत्रित पेरणी, अनियंत्रित भाग आणि पट्टे अशा विविध तीन पद्धतींमध्ये स्वयंचलित संगणकीय प्रारूपांचा
वापर केला. त्याद्वारे किडींच्या हालचालींचा वेध घेऊन कार्यक्षमता तपासली. त्यातून रेफ्युजी लागवडीची योग्य पद्धत मिळविण्यात यश आले आहे.

किडींच्या हालचालींच्या पॅटर्नचा तुलनात्मक अभ्यास
मिळालेल्या माहितीवरून तयार केलेला किडींच्या हालचालींच्या पॅटर्नचे विश्लेषण करण्यात आले. बीटी आणि बीटी नसलेल्या कपाशी पिकामध्ये तुलना करण्यात आली. त्यातील निष्कर्ष आश्चर्यकारक होते. किडींच्या हालचाली साध्या कपाशीच्या तुलनेमध्ये बीटी कपाशीच्या पानाभोवती जास्त आढळल्या. त्याविषयी गोडोय यांनी सांगितले, की अद्याप कीटकांच्या या वर्तनामागील नेमक्या यंत्रणा व कारणांविषयी फारसे समजू शकलेले नाही. अर्थात, या वर्तनामुळे बीटी घटकांविषयी किडीमध्ये प्रतिकारकता विकसित होण्यासाठी मदत होते. बीटी नसलेल्या पानांभोवती किडीच्या कमी हालचालीमुळे जुळवणुकीची अधिक किंमत द्यावी लागते. त्यामुळेच किडींचे हे वर्तन आश्चर्यकारक ठरते. या समस्येवर अधिक अभ्यास करण्यात येत असून, पिकांचे नेमके पॅटर्न ठरवणे शक्य होईल. परिणामी जनुकीय सुधारित पिकांना प्रतिकारकता विकसित होणे रोखता येईल.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...