agricultural news in marathi, study visit by netafim in israel, Agrowon, Maharashtra | Agrowon

इस्राईल येथील अॅग्रिटेकसाठी नेटाफिमद्वारे अभ्यास दौरा
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि. या कंपनीतर्फे गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय व्हावा, यासाठी इस्राईल येथील अॅग्रिटेक प्रदर्शनाच्या औचित्याने अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी मंगळवारपासून (ता. ८) आयोजित दौऱ्यामध्ये भारतभरातील २२५ शेतकऱ्यांचा सहभाग होता.

नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि. या कंपनीतर्फे गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय व्हावा, यासाठी इस्राईल येथील अॅग्रिटेक प्रदर्शनाच्या औचित्याने अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी मंगळवारपासून (ता. ८) आयोजित दौऱ्यामध्ये भारतभरातील २२५ शेतकऱ्यांचा सहभाग होता.

या दौऱ्यामध्ये रोबोटिक डेअरी फार्म, गिनेगार प्लॅस्टिक उद्योग, जॉर्डन व्हॅलीतील खजूर, पाम व केळी लागवड, मेवो हामा किबूत्स येथील द्राक्ष, आंबा लागवड, अत्याधुनिक पॅकेजिंग, राष्ट्रीय पाणी व्यवस्थापन प्रकल्प यासोबतच अॅग्रिटेक या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट देण्यात आली. या दौऱ्यामध्ये गेनाभाई पटेल (गुजरात), विजयराव जाधव (नगर), पोपटराव पवार (सरपंच, हिवरेबाजार) अशा अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांसोबतच त्रिवेंद्रसिंग रावत (मुख्यमंत्री, उत्तराखंड), पांडुरंग फुंडकर (कृषिमंत्री, महाराष्ट्र), सुबोध उनियाल (कृषिमंत्री, उत्तराखंड), महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव, उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव धर्मराजू पांडियान यासह सूक्ष्म सिंचन प्रकल्प (आंध्र प्रदेश) येथील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता.
अॅग्रिटेक प्रदर्शनाच्या औचित्याने नेटाफिम कंपनीच्या वतीने सूक्ष्म सिंचनातील अत्याधुनिक अशा स्वयंचलित सूक्ष्म सिंचन प्रणाली ‘नेटबिट’ या नवीन उत्पादनाचे बाजारामध्ये सादरीकरण करण्यात आले.
 

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...