स्वयंचलित ट्रॅक्टरचा उद्योग वाढेल २५ टक्क्याने,मार्केट अॅण्ड मार्केटचा अहवाल

ऑटोनोमस ट्रॅक्टर
ऑटोनोमस ट्रॅक्टर

जागतिक पातळीवर ड्रायव्हरशिवाय ट्रॅक्टर (अॅटोनॉमस ट्रॅक्टर) बाजारात आणण्यासाठी संशोधन सुरू आहे. परदेशात अशा ट्रॅक्टरची मागणी २०१९ यावर्षी सुमारे १२५०८ ट्रॅक्टर तर २०२५ यावर्षापर्यंत ६०९०१ पर्यंत पोचण्याची (वाढीचा दर २४.८९ टक्के) शक्यता आंतरराष्ट्रीय व्यापार सर्वेक्षणात व्यक्त केली आहे.

सर्वेक्षणासाठी मार्केट्स अॅँड मार्केट्स या संस्थेचे ८५० पूर्णवेळ विश्लेषक कार्यरत होते. अहवाल फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रकाशित झाला आहे. अमेरिकेत अॅगको, डिअर आणि अॅटोनॉमस ट्रॅक्टर कार्पोरेशन हे ग्रुप, इंग्लंडमध्ये सीएनएच, भारतात महिंद्रा आणि महिंद्रा, जपानमध्ये कुबोटा कार्पोरेशन आणि यानमार या कंपन्या असा ट्रॅक्टर विकसित करत आहेत. त्यानुसार अगदी लहान म्हणजे ३० एचपी पासून १०० एचपी वरील क्षमतेचे ट्रॅक्टर उपलब्ध होणार आहेत. फळबाग आणि भाजीपाला पिकांमध्ये या ट्रॅक्टरला अधिक मागणीची शक्यता आहे. सन २०१९ मध्ये उत्तर अमेरिकेचा याबाबतीत सर्वाधिक हिस्सा राहील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com