त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
चारा पिके
लसूणघास लागवड कशी करावी?
शनिवार, 23 डिसेंबर 2017
लसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढू शकते. मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते आठदरम्यान असणारी जमीन पिकास मानवते.
लसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले वाढू शकते. मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी, सामू ७.५ ते आठदरम्यान असणारी जमीन पिकास मानवते.
- हे पीक तीन वर्षांपर्यंत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. या पिकास भरपूर प्रमाणात भरखते व वरखते देणे गरजेचे आहे. मशागतीच्या वेळी हेक्टरी १५ ते २० टन शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीपूर्वी २० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व ५० किलो पालाश या रासायनिक खतांची प्रतिहेक्टरी आवश्यकता आहे. त्यानंतर दर तीन ते चार कापण्यांनंतर हेक्टरी ५० किलो स्फुरद खताची मात्रा द्यावी.
- जातिवंत व शुद्ध बियाणे लागवडीसाठी निवडावे. लागवडीसाठी आरएल-८८, आनंद-२, आनंद-३, को-१ सुधारित जातींची निवड करावी. लागवड ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात करावी. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी केली असता हेक्टरी २५ किलो एवढेच बी पुरेसे होते.
- ओळीत पेरणी केल्याने खते देणे सोपे जाते. हातकोळप्याने आंतरमशागत करता येते. ओळीत बियाणे पेरणी करण्याअगोदर जमिनीमध्ये वाफे तयार करून घ्यावेत, यासाठी जमिनीचा उतार बघून साधारणपणे तीन ते पाच मीटर रुंद व १० मीटर लांबीचे वाफे तयार करावेत. त्यानंतर एक फूट अंतरावर काकऱ्या पाडाव्यात. यासाठी अत्यंत साधे व सोपे अवजार तयार करता येऊ शकते. तयार केलेल्या काकऱ्यामध्ये चिमटीने बी पेरावे. हाताने काकऱ्या बुजवून घ्याव्यात. पेरणीपूर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियमची बीजप्रक्रिया करावी.
- बी पेरल्यानंतर पहिले पाणी हळुवार द्यावे. जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचनाने पाणी देणे फायद्याचे ठरते. यामध्ये रानबांधणीचा खर्चही बराच वाचतो.
- लसूणघास हे बहुवर्षीय पीक असल्याने प्रत्येक कापणीनंतर खुरपणी करून तणांचे नियंत्रण करावे. ओळीत बियाणे पेरले असल्यास हातकोळपणी यंत्राने कमी खर्चात तणनियंत्रण करता येते.
- लसूण घासाची पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी करावी. पहिल्या कापणीनंतर दर २२ ते २५ दिवसांनी कापणी करावी. बहुवार्षिक लसूण घासापासून दर वर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात.
- लसूण घासाच्या वर्षभरातील १२ ते १५ कापण्यांपासून सरासरी १०० ते १२५ टन हेक्टरी हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
संपर्क : ०२०- २६९२६२४८
बायफ, मध्यवर्ती संशोधन केंद्र, उरुळी कांचन, जि. पुणे.
इतर चारा पिके
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...
पौष्टिक चाऱ्यासाठी लसूणघासलसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने,...
लागवड ओट चारापिकाची...संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
जनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल...प्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः...
चाराटंचाईमध्ये हायड्रोपोनिक्स चाऱ्याची...अत्यल्प पर्जन्यमानामुळे चारा उत्पादनात लक्षणीय घट...
वेळेवर करा ओट चारापिकाची लागवडओट हे एक महत्त्वाचे एकदल वर्गीय चारापीक आहे. ओट...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
सकस चाऱ्यासाठी बाजरी, दशरथ, मारवेलबाजरीचा हिरवा तसेच वाळलेला चारा पौष्टिक असतो....
पीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस
शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
मुरघास कसा तयार करावा ?मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...
पाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...
कृषी सल्लाधान्य साठवण :
मळणीनंतर धान्याची साठवण...
योग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारासुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल...
लसूणघास लागवड कशी करावी?लसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये...
चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड फायदेशीरमका पिकाचा चारा अत्यंत सकस, रुचकर असतो. मका...
बरसीम चारा पिकाची लागवडबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा...
लुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान लुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीमबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्टरी २५...
- 1 of 2
- ››