agricultural news in marathi, technology of protection of turmaric in rain , Agrowon, Maharashtra | Agrowon

अवेळी पावसात घ्या हळदीची काळजी
डॉ. जितेंद्र कदम, डॉ. केशव पुजारी
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सद्यःस्थितीत राज्यात हळद काढणी सुरू आहे. मात्र हवामान खात्याने अवेळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. काही भागांना गारपिटीचाही तडाखा बसला आहे. अशा परिस्थितीत काढणी करून सुकविण्यासाठी टाकलेली हळद भिजण्याची दाट शक्‍यता आहे. हळद भिजल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काळजी घ्यावी.

हळद काढणीनंतर शिजवण्यात येते. अशी शिजवलेली हळद सुकण्यास टाकल्यानंतर भिजल्यास कडक बनते. तिला लोखंडी हळद
असे म्हणतात. बाजारात तिला खूपच कमी भाव मिळतो. त्यामुळे सद्यःस्थितीत पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

सद्यःस्थितीत राज्यात हळद काढणी सुरू आहे. मात्र हवामान खात्याने अवेळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. काही भागांना गारपिटीचाही तडाखा बसला आहे. अशा परिस्थितीत काढणी करून सुकविण्यासाठी टाकलेली हळद भिजण्याची दाट शक्‍यता आहे. हळद भिजल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काळजी घ्यावी.

हळद काढणीनंतर शिजवण्यात येते. अशी शिजवलेली हळद सुकण्यास टाकल्यानंतर भिजल्यास कडक बनते. तिला लोखंडी हळद
असे म्हणतात. बाजारात तिला खूपच कमी भाव मिळतो. त्यामुळे सद्यःस्थितीत पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

  • हळदीचा पाला कापून ठेवल्यानंतर पाऊस आल्यास वाफसा आल्यानंतर लगेच काढणी करा. अन्यथा हळकुंडाच्या टोकांना कोंब फुटण्यास सुरवात होते. परिणामी हळदीतील कर्बोदकांचे प्रमाण कमी होते. प्रक्रिया केल्यानंतर हळकुंडावर सुरकुत्या पडतात.
  • हळदीची काढणी केली असल्यास ओली हळकुंडे पावसात भिजल्यावर त्यावर फारसा परिणाम होत नाही.
  • हळद शिजवणे सुरू असल्यास हळदीची काढणी करतेवेळी हळकुंडात ७२ ते ७५ टक्के पाण्याचा अंश असतो. तो शिजवल्यानंतर ८० ते ८५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढतो. हळद सुकविण्यासाठी टाकल्यानंतर १२ ते १५ दिवसांमध्ये तो ८ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत कमी होतो. साधारणतः ४ ते ५ दिवसांपर्यंत तो ५० ते ५५ टक्‍क्‍यांच्या दरम्यान असतो. तोपर्यंत हळद पावसामध्ये भिजल्यास हळदीवर फारसा परिणाम होत नाही. परंतु हळद शिजवल्यापासून सुकायला टाकून ४ ते ५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाल्यास हळद पावसामध्ये भिजू देऊ नये. अन्यथा ती कडक/लोखंडी बनते.

उपाययोजना

  • पाऊस आल्यास हळद गोळा करता यावी यासाठी हळद सुकविण्यासाठी जुने शेडनेट, जुन्या साड्या, ताडपत्री यांचा वापर करा.
  • पुढील वर्षासाठी वापरण्यात येणारे बियाणे पावसामध्ये भिजणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा साठवणुकीमध्ये बियाणे सडण्याचा धोका राहील. तसेच पूर्ण सुकलेली हळदही कोणत्याही परिस्थितीमध्ये पावसामध्ये भिजू देऊ नये. त्यामुळे पाऊस येण्याच्या काळात बियाणे व सुकलेली हळद पॉलिथिनच्या कापडात तात्पुरती गुंडाळून ठेवावी. जेव्हा पाऊस संपून वातावरण पूर्ण कोरडे होईल तेव्हा पॉलिथिन कापडातून बियाणे वा सुकलेले हळकुंड बाहेर काढून ठेवावे.

संपर्क : डॉ. जितेंद्र कदम, ९८२२४४९७८९
(काढणी पश्‍चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, रोहा. जि. रायगड)

इतर मसाला पिके
सुधारित पद्धतीने हळद लागवडीचे नियोजनठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध...
हळदीचे अपेक्षित उत्पादनासाठी सुधारित...हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा...
हळद पिकांसाठी बेणे निवड महत्त्वाची   पूर्वमशागतीनंतर पाण्याच्या...
हळद लागवडीची पूर्वतयारीहळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
साठवण हळद बेण्याची ...जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी...
मिरचीवरील किडींचा प्रादुर्भाव ओळखा,...मिरची पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या किडींमध्ये कळी-...
मिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
हळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...
सुधारित पद्धतीने हळदीची काढणीहळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
हळदीवरील रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
हळदीवरील किडीचे करा वेळीच नियंत्रण हळदीचे गड्डे तयार होण्याची ही योग्य वेळ आहे. जर...
मसाला पिकांना द्या पुरेसे पाणीमसाला पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही, हे...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...
हळद पिकातील रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
हळदीची भरणी आवश्यक...सध्याच्या काळात हळदीचे खोड तसेच फुटव्यांची वाढ...