agricultural news in marathi, tips for rabbi jowar cultivation,AGROWON,marathi | Agrowon

रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा
डॉ. विजय अमृतसागर, डॉ. बी. आर. नजन
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

रब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिरायती पद्धतीने लागवड. अनिश्‍चित स्वरूपाचा पाऊस, हलकी, मध्यम खोल काळी व भारी जमीन अशी वैविध्यपूर्ण जमिनीत लागवड अशा कारणांमुळेही समाधानकारक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवडीसाठी महत्त्वाच्या बाबींचा विचार करून नियाेजन केल्यास उत्पादनात वाढ साधता येते.

रब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिरायती पद्धतीने लागवड. अनिश्‍चित स्वरूपाचा पाऊस, हलकी, मध्यम खोल काळी व भारी जमीन अशी वैविध्यपूर्ण जमिनीत लागवड अशा कारणांमुळेही समाधानकारक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवडीसाठी महत्त्वाच्या बाबींचा विचार करून नियाेजन केल्यास उत्पादनात वाढ साधता येते.

  • पावसाच्या आेलीवर १५ ऑक्टोबरपर्यंत ५ सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करावी. प्रतिहेक्टरी १.४८ लाख रोपसंख्या ठेवावी. त्यासाठी पेरणी ४५ x १५ से.मी. अंतरावर करावी.
  • हलक्या जमिनीत फुले माऊली, फुले अनुराधा तर मध्यम जमिनीत फुले चित्रा,
  • फुले सुचित्रा या जातींची पेरणी करावी. भारी जमिनीत फुले यशोदा, फुले वसुधा या जातींची पेरणी करावी.
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधकाची (३०० मेश), त्यानंतर २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणूंची प्रक्रिया करावी.
  • हेक्टरी ५० किलाे नत्र, २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश अशी खते द्यावीत. नत्र दोन हप्त्यात विभागून द्यावे. जमिनीत कमी ओलावा असल्यास पेरणीवेळी २५ किलो नत्र द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. स्फुरद २५ किलो व पालाश २५किलो पेरणीच्या अगोदर द्यावे.
  • जिरायती ज्वारीमध्ये पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने द्यावी. त्यामुळे तणांचे नियंत्रण व पिकाला मातीची भर दिली जाते. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी अखंड फासाच्या कोळप्याने करावी. तिसरी कोळपणी पेरणीनंतर ८ आठवड्यांनी जमिनीत पडणाऱ्या भेगा बुजवण्यासाठी दातेरी कोळप्याने करावी.
  • बागायती ज्वारीस पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी. दुसरी कोळपणी ४ ते ५ आठवड्यांनंतर अखंड फासाच्या कोळप्याने करावी.
  • ज्वारीच्या गर्भावस्थेत म्हणजेच पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पहिले पाणी व पोटरी अवस्था म्हणजे ५० ते ६० दिवसांनी पाणी द्यावे. एकच पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.
  •  

संपर्क : डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

टॅग्स

इतर तृणधान्ये
कॅल्शियम, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...मानवी अाहारात गव्हाव्यतिरिक्त इतर धान्यांचा...
भातपिकातील रासायनिक खतांचा वापरभातपिकाच्या भरपूर उत्पादनासाठी त्याच्या संतुलित...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
मका उत्पादनावर जाणवतील तापमानवाढीचे...हवामानातील बदलांचे एकूण अंदाज पाहता तापमानातील...
लागवड गोड ज्वारीची...गोड ज्वारीच्या ताटांमध्ये शर्करा व प्रथिनांचे...
तंत्र नाचणी लागवडीचे...नाचणीचे अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...
ज्वारीच्या संकरित जातींचा वापर फायदेशीरज्वारीच्या संकरित जातींचे सुधारित जातींपेक्षा...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
मका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
कृषि सल्ला गहू सध्या पीक दाणे भरणे किंवा काढणीच्या अवस्थेत...
फुलोरा, चिकाच्या अवस्थेत गव्हास पाणी...सद्यःस्थितीत शेतात वेळेवर पेरणी केलेला व उशिरा...
पीक व्यवस्थापन सल्लाकापूस : पऱ्हाट्या लवकरात लवकर उपटून टाकाव्यात....
गहू पिकातील उंदरांचे नियंत्रणनोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी केलेल्या...
भाताच्या तेरा जातींचा झाला तुलनात्मक...भात हे जागतिक पातळीवरील सुमारे २० टक्के लोकांच्या...
सुधारित तंत्राने वाढवा बाजरी उत्पादनउन्हाळी हंगामात भरपूर सूर्यप्रकाश, पिकाच्या वाढीस...
गव्हावरील तांबेरा रोगाचे नियंत्रण...गहू पिकावर काळा किंवा नारंगी तांबेरा या रोगांचा...
गव्हाला द्या संरक्षित पाणीगहू पिकाला एकच पाणी देणे शक्‍य असल्यास ते...