रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरा
डॉ. विजय अमृतसागर, डॉ. बी. आर. नजन
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

रब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिरायती पद्धतीने लागवड. अनिश्‍चित स्वरूपाचा पाऊस, हलकी, मध्यम खोल काळी व भारी जमीन अशी वैविध्यपूर्ण जमिनीत लागवड अशा कारणांमुळेही समाधानकारक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवडीसाठी महत्त्वाच्या बाबींचा विचार करून नियाेजन केल्यास उत्पादनात वाढ साधता येते.

रब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण म्हणजे जिरायती पद्धतीने लागवड. अनिश्‍चित स्वरूपाचा पाऊस, हलकी, मध्यम खोल काळी व भारी जमीन अशी वैविध्यपूर्ण जमिनीत लागवड अशा कारणांमुळेही समाधानकारक उत्पादन मिळत नाही. त्यामुळे लागवडीसाठी महत्त्वाच्या बाबींचा विचार करून नियाेजन केल्यास उत्पादनात वाढ साधता येते.

  • पावसाच्या आेलीवर १५ ऑक्टोबरपर्यंत ५ सें.मी. खोलीपर्यंत पेरणी करावी. प्रतिहेक्टरी १.४८ लाख रोपसंख्या ठेवावी. त्यासाठी पेरणी ४५ x १५ से.मी. अंतरावर करावी.
  • हलक्या जमिनीत फुले माऊली, फुले अनुराधा तर मध्यम जमिनीत फुले चित्रा,
  • फुले सुचित्रा या जातींची पेरणी करावी. भारी जमिनीत फुले यशोदा, फुले वसुधा या जातींची पेरणी करावी.
  • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधकाची (३०० मेश), त्यानंतर २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जीवाणूंची प्रक्रिया करावी.
  • हेक्टरी ५० किलाे नत्र, २५ किलो स्फुरद व २५ किलो पालाश अशी खते द्यावीत. नत्र दोन हप्त्यात विभागून द्यावे. जमिनीत कमी ओलावा असल्यास पेरणीवेळी २५ किलो नत्र द्यावे. उर्वरित नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. स्फुरद २५ किलो व पालाश २५किलो पेरणीच्या अगोदर द्यावे.
  • जिरायती ज्वारीमध्ये पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने द्यावी. त्यामुळे तणांचे नियंत्रण व पिकाला मातीची भर दिली जाते. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी अखंड फासाच्या कोळप्याने करावी. तिसरी कोळपणी पेरणीनंतर ८ आठवड्यांनी जमिनीत पडणाऱ्या भेगा बुजवण्यासाठी दातेरी कोळप्याने करावी.
  • बागायती ज्वारीस पहिली कोळपणी पेरणीनंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी. दुसरी कोळपणी ४ ते ५ आठवड्यांनंतर अखंड फासाच्या कोळप्याने करावी.
  • ज्वारीच्या गर्भावस्थेत म्हणजेच पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पहिले पाणी व पोटरी अवस्था म्हणजे ५० ते ६० दिवसांनी पाणी द्यावे. एकच पाणी उपलब्ध असल्यास पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.
  •  

संपर्क : डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)

टॅग्स

इतर तृणधान्ये
रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरारब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण...
भातपिकावर तपकिरी तुडतुडे, लष्करी...मुसळधार पावसानंतर सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली...
गहू लागवड कशी करावी?जिरायती भागात पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या...
लागवड खपली गव्हाचीखपली गव्हाची काळी कसदार तसेच हलक्या, चोपण...
भातावरील पर्ण करपा, कडा करपा रोग...राज्यात भातामध्ये अनेक ठिकाणी पर्ण करपा व कडा...
गोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक गोड ज्वारी ही आपल्या नेहमीच्या खरीप...
ज्वारी पीक संरक्षण किडींचा एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून...
​ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो....
उन्हाळी ज्वारी लागवड तंत्रज्ञान उन्हाळी हंगामातसुद्धा मराठवाड्यामध्ये विशेषतः...
रब्बी ज्वारी वाण आणि लागवड तंत्रज्ञानरब्बी ज्वारी वाण मध्यम ते भारी जमीन आणि मध्यम...
खरीप ज्वारी लागवड तंत्रज्ञानज्वारी हे उष्ण तसेच अर्थशुष्क उष्ण कटीबंधीय...
जागतिक मानांकनामुळे मंगळवेढ्याच्या...प्रसिद्ध आहार विशेषज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आपल्या...
भातावरील करपा रोगाचे नियंत्रणकरपा ः रोगकारक बुरशी : Pyricularia oryzae...
गहू लागवड तंत्रज्ञानजमीन : पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते...
भात पिकातील आंतरमशागतीसाठी कोनोविडर...भात पिकाची आंतरमशागत चिखलातच करावी लागते. त्याला...