agricultural news in marathi, usefulness of indoor plants for air purification, Agrowon, Maharashtra | Agrowon

हवेच्या शुद्धीकरणासाठीही इनडोअर वनस्पती ठरू शकतात उपयुक्त
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

वाढत्या शहरीकरणासोबतच प्रदूषणाची समस्याही वेगाने वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या शोभेच्या वनस्पतींचा उपयोग होऊ शकत असल्याचे संशोधकांचे मत आहे. इटली येथील राष्ट्रीय संशोधन परिषदेतील वनस्पती शरीरशास्त्रज्ञ फ्रेडेरिको ब्रिली आणि सहकाऱ्यांनी योग्य इनडोअर झाडांच्या निवडीसोबत हवा शुद्धीकऱणाच्या तंत्राचा वापर करण्याचा एक पर्याय ‘ट्रेण्डस इन प्लॅंट सायन्स’ मध्ये प्रकाशित लेखातून सुचवला आहे.

वाढत्या शहरीकरणासोबतच प्रदूषणाची समस्याही वेगाने वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या शोभेच्या वनस्पतींचा उपयोग होऊ शकत असल्याचे संशोधकांचे मत आहे. इटली येथील राष्ट्रीय संशोधन परिषदेतील वनस्पती शरीरशास्त्रज्ञ फ्रेडेरिको ब्रिली आणि सहकाऱ्यांनी योग्य इनडोअर झाडांच्या निवडीसोबत हवा शुद्धीकऱणाच्या तंत्राचा वापर करण्याचा एक पर्याय ‘ट्रेण्डस इन प्लॅंट सायन्स’ मध्ये प्रकाशित लेखातून सुचवला आहे.

औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशांमधील बहुतांश लोकांचा ८० टक्क्यांपर्यंत वेळ हा घर आणि कार्यालयामध्ये जातो. ही कार्यालये बंदिस्त आणि वातानुकुलीत असतात. मात्र, अलीकडे या नियंत्रित वातावरणामध्ये रेंगाळणाऱ्या विषारी वायू उदा. कार्बन मोनॉक्साईड, ओझोन आणि अन्य सेंद्रिय वायू यांचे विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर दिसू लागले आहेत. हे वायू प्रामुख्याने बाह्य प्रदूषण, फर्निचर, रंग, कार्पेट आणि कार्यालयातील उपकरणाद्वारे पसरतात.
या वायूंच्या शोषणाचे काम वनस्पती चांगल्याप्रकारे करू शकतात. खरेतर नासा या संशोधन संस्थेमध्ये याविषयावर १९८० पासून काम करत आहे. सध्या घरे किंवा कार्यालयामध्ये वनस्पतींचा वापर शोभेच्या दृष्टीकोनातून होतो. मात्र, अधिक सजगतेने इनडोअर झाडांचा वापर केल्यास आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. या वनस्पतींचा वापर स्मार्ट सेन्सर नेटवर्क आणि अन्य संगणकीय तंत्रज्ञानांसोबत करण्याची आवश्यकता ब्रिली व्यक्त करतात. त्यातून उपयुक्ततेमध्ये वाढ होणार आहे.

हवेच्या शुद्धीकरणासाठी वनस्पतींची उपयुक्तता

  • कार्बन डायऑक्साईडचे शोषण
  • ऑक्सिजनचे उत्सर्जन
  • बाष्पोत्सर्जनाद्वारे आर्द्रतेमध्ये वाढ

सूक्ष्मजीवही महत्त्वाचे...
कोणत्याही वनस्पतीच्या वाढीसाठी सूक्ष्मजीवांची ( जिवाणू आणि बुरशी) आवश्यकता असते. हे घटक वनस्पतीच्या सर्व अवयवांवर असतात. त्यातील अनेक सूक्ष्मजीव प्रदूषणकारी घटकांच्या शोषणामध्ये मोलाची भूमिका निभावतात. मात्र, काही प्रजाती मानवी आरोग्यासाठी त्रासदायक (उदा. अॅलर्जी) ठरू शकतात. अशा उपयुक्त आणि त्रासदायक प्रजातींची नेमकी ओळख पटवणे गरजेचे आहे आणि त्या नेमक्या कोणत्या झांडावर आढळतात, याचाही वेध घेण्यासाठी अभ्यास केला जात आहे.
 

इतर टेक्नोवन
सोडियम क्षारांचे अाधिक्य असलेल्या...जमिनीमध्ये सोडियम क्षारांचे प्रमाण वाढत असून,...
सातत्यपूर्ण ध्यासातून नावीन्यपूर्ण,...नाशिक जिल्हा द्राक्षशेतीसोबत अत्याधुनिक...
सूर्यफूल बियांपासून लोण्याची घरगुती...दुग्धजन्य लोण्याला तितकाच समर्थ पर्याय म्हणून...
अवजारांच्या वापरातून खर्च होईल कमीपीक उत्पादनाचा ३० ते ४० टक्के खर्च  शेती...
अल्पभूधारकांसाठी अधिक स्वस्त, कार्यक्षम...भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडतील अशी...
सूर्यफूल बियांपासून प्रक्रियायुक्त...आपल्याकडे सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेलासाठी...
शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...
परागीकरण करणारा रोबो ः ब्रॅम्बल बीआपण जी फळे किंवा भाज्या खातो, त्यांच्या...
मातीतील आर्द्रतेच्या माहितीसाठ्यावरून...अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्था (नासा)...
बुद्धिकौशल्यातून लालासो झाले शेतीतील ‘...अशिक्षित असले तरी लालासो भानुदास साळुंखे-पाटील...
पेरा शेणखताच्या ब्रिकेट्स...मंगळवेढा (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी...
आरोग्यासाठी पोषक पारंपरिक गहू जातींवरील...सामान्यतः गहू हा बहुसंख्य लोकांच्या आहाराचा मुख्य...
कृषी अवजार निर्मात्यांना चांगल्या...गेल्या काळात झालेली नोटाबंदी, त्यानंतर लागू...
‘क्रॉप कव्हर’ तंत्राने वाढवली पिकाची...वर्धा जिल्ह्यातील रोहणा येथील अविनाश कहाते व...
चेरी टोमॅटोच्या काढणीसाठी ‘इलेव्हेटेड...अधिक उंचीपर्यंत वाढणाऱ्या वेली किंवा फळझाडांमध्ये...
क्षारयुक्त जमिनीच्या शास्त्रीय...जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन त्या खराब...
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...
जलशुद्धीकरणासाठी सूर्यप्रकाशावर आधारीत...सूर्यप्रकाशाच्या साह्याने पाण्याचे शुद्धीकरण...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
शालेय विद्यार्थी झाले कृषी संशोधकजळगावात जैन हिल्स येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘...