agricultural news in marathi, vegetable crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

भाजीपाला सल्ला
डॉ. एस.एम.घावडे
बुधवार, 13 डिसेंबर 2017

डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या पंधरवड्यात तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते.सलग ३ ते ४ दिवस असेच तापमान राहिल्यास भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होतो. त्यापासून संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात.

थंडीपासून पिकांचे संरक्षण   

डिसेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण वाढून दुसऱ्या पंधरवड्यात तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते.सलग ३ ते ४ दिवस असेच तापमान राहिल्यास भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होतो. त्यापासून संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात.

थंडीपासून पिकांचे संरक्षण   

 • भाजीपाला पिकांना रात्रीच्या वेळी सिंचन करावे.
 • शक्य झाल्यास दुपारी धूर करून तो शेतात फिरवता येईल असे बघावे. यामुळे शेतातील तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते.
 • बागेभोवती शेवरी किंवा शिकेकाई आदी वनस्पतींची वाराप्रतिरोधक म्हणून लागवड करावी.
 • आवश्‍यकतेनुसार बागेभोवती संरक्षक कापड बांधावे.

कांदा

 • रोपांच्या लागवडीची तयारी करावी. त्यासाठी मध्यम ते भारी परंतु उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
 • शेतात आडवी उभी नांगरणी करून ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर वखरणी करुन जमीन भुसभुशीत करावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी १०-१२ टन मिसळावे. त्यानंतर पुन्हा वखरणीची पाळी द्यावी.
 • लागवडीसाठी २ X १ मीटर किंवा ३ X १.५ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. ठिबक सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी १.२० मीटर रुंदीचे बीबीएफ पद्धतीने वाफे तयार करावेत.
 • कांद्याची रोपे ६ ते ८ आठवडे वयाची लागवडीसाठी वापरावीत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रोपांची पुनर्लावड करावी.
 • रोपांच्या पुनर्लागवडीनंतर रोपांवर माना टाकणाऱ्या रोगाचा (डॅंपिंग ऑफ) प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रति गादीवाफा २५ ते ३० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी गांडुळ खत किंवा कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावे.
 • लागवडीपूर्वी सपाट वाफ्यात हलके पाणी देऊन नंतरच लागवड करावी. सपाट वाफ्यात १० X १० सें.मी.अंतरावर रोपांची लागवड करावी. बीबीएफ वाफ्यावर सुध्दा १० X १० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
 • कांदा रोपांना जास्त प्रमाणात खतमात्रा लागते. त्यासाठी हेक्टरी १०० किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद अशी खतमात्रा द्यावी. लागवडीवेळी संपुर्ण स्फुरद आणि अर्धे नत्र द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावी. खते दिल्यानंतर पिकाला हलके पाणी द्यावे.

पालक, मेथी लागवड

 • पालेभाज्यांमध्ये पालक व मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पालक आणि मेथीची लागवड जानेवारीअखेरपर्यंत करता येते. भाजीचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टीने टप्पाटप्याने १० ते १५ दिवसाच्या अंतराने बी पेरावे.
 • पालकाच्या आॅलग्रीन, पुसा ज्योती, पुसा हरीत या सुधारीत जातींची निवड करावी. मेथीच्या पुसा अर्ली बंचिग या जातीची निवड करावी.
 • लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी, कसदार आणि सुपीक जमीन निवडावी. एक हेक्टर क्षेत्रासाठी पालकाचे ३० ते ४० किलो आणि मेथीचे २५ ते ३० किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास थायरम २.५ ग्रॅम याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
 • पेरणी सपाट वाफ्यात करावी. पालकाच्या दोन ओळीतील अंतर २० ते ३० सें.मी. आणि मेथीच्या दोन ओळीतील अंतर २० सें.मी. ठेवावे. पालकाला प्रतिहेक्टरी ५० किलो नत्र द्यावे. मेथी या पिकास प्रतिहेक्टरी ५० किलो नत्र द्यावे. नत्र मात्रा दोन समान हप्त्यात ८ दिवसांचे अंतराने विभागून द्यावी.

वांगी, टोमॅटो रोपवाटिका

 • जानेवारी महिनाअखेरपर्यंत वांगी आणि टोमॅटो पिकांची लागवड करावी. वांगी पिकाच्या अरूणा, मांजरी गोटा, पुसा पर्पल राउंड, पुसा पर्पल लाॅंग या जातींची लागवड करावी. टोमॅटोच्या मारग्लोब, पुसा रूबी, पंजाब छुआरा, एस-१२०, भाग्यश्री, धनश्री, अर्का सौरभ इत्यादी सुधारित जातींची निवड करावी. वांगी व टोमॅटो लागवडीसाठी प्रतिहेक्टरी ५०० ते ६०० ग्रॅम बियाणे लागते.
 • टोमॅटो आणि वांगी यांच्या रोपनिर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. निवडलेल्या जागेची चांगली वखरून ती भुसभुशीत करून घ्यावी.
 • बी पेरणीसाठी १ मीटर लांब, १ मीटर रुंद आणि १५ सें. मी. उंच आकाराचे गादीवाफे तयार करावेत. एक हेक्टर लागवडीसाठी २० ते २५ गादीवाफ्यातील रोपे पुरेशी होतात.
 • वाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत २ किलो प्रति २ चौ. मीटर याप्रमाणात टाकून चांगले मिसळावे. रोपवाटिकेत प्रति २ चौ. मी. जागेला नत्र २ ग्रॅम, स्फुरद १० ग्रॅम व पालाश १० ग्रॅम अशी खते द्यावीत. संपूर्ण स्फुरद आणि पालाश व अर्धे नत्र बीपेरणीवेळी द्यावे. उर्वरित नत्र २० ते २५ दिवसांनी द्यावे.
 • पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २ ते ३ ग्रॅम थायरम याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. गादीवाफ्यावर ८ ते १० सें. मी. अंतरावर वाफ्याच्या रूंदीस समांतर ओळी तयार करून त्यामध्ये दाणेदार फोरेट (१० टक्के) २.५ किलो प्रतिहेक्टरी या प्रमाणात टाकावे. रोपवाटिकेतील माना टाकणाऱ्या रोगापासुन (डंपिंग ऑफ) वांगे व टोमॅटोच्या रोपांचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया (कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे) करावी.
 • लागवडीपूर्वी प्रतिवाफा २५ - ३० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी किंवा गांडूळ खत किंवा चांगले कुजलेले शेणखत टाकावे. त्यानंतर ओळीमध्ये २ सें. मी. खोलीवर बी टाकून त्यावर हलकासा मातीचा थर द्यावा. त्यानंतर वाफ्यात बी उगवेपर्यंत रोज सकाळी संध्याकाळी झारीने पाणी द्यावे.

संपर्क : डॉ. एस.एम.घावडे, ९६५७७२५८४४
(मिरची व भाजीपाला संशाेधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला)

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...