फळवर्गीय भाजीपाला सल्ला

 मिरचीवरील चुरडामुरडा व टोमॅटोवरील फळसड
मिरचीवरील चुरडामुरडा व टोमॅटोवरील फळसड

मिरची रोगनियंत्रण : चुरडा- मुरडा नियंत्रण रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी या किडींमार्फत होतो. त्यासाठी पिकात पांढऱ्या माशीसाठी पिवळे व फुलकिड्यांसाठी निळे चिकट सापळे एकरी १२ या प्रमाणात वापरावेत. फुलकिडे, मावा नियंत्रण : फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी फिप्रोनील (५ ई.सी.) १.५ मि.लि. वेळ : प्रादुर्भाव दिसताक्षणी फवारणी आवश्‍यक कोळी नियंत्रण : फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी   फेनपायरॉक्झिमेट  (५ ई.सी.) १ मि.लि. किंवा फेनाक्झाक्विन (१० ई.सी.) २ मि.लि. पानांवरील ठिपके :   सरकोस्पोरा : रोगकारक बुरशी : सरकोस्पोरा लक्षणे : पानांवर गोलाकार, लहान डाग दिसून येतात. पाने पिवळी पडून गळतात. फळांवर पांढरे चट्टे पडतात. अल्टरनेरिया :    रोगकारक बुरशी :अल्टरनेरिया सोलॅनी लक्षणे : बुरशीमुळे तपकिरी रंगाचे आकारहीन डाग पानांवर दिसतात. डागांमध्ये एकात एक गोलाकार अशी वलये असतात. लहान डाग एकमेकांत मिसळून मोठे चट्टे होतात. पाने करपतात अाणि पानगळ होते. नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम वेळ : प्रादुर्भाव दिसताच त्वरित

टोमॅटो : रोगनियंत्रण : फळसड  : फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम पर्णगुच्छ व जी.एन.बी.व्ही. प्रसार : पर्णगुच्छ हा रोग पांढरी माशीमार्फत आणि टॉस्पोव्हायरस हा फुलकिड्यांमार्फत होतो. पांढरी माशी, फुलकिडे, मावा नियंत्रण फवारणी प्रतिलिटर पाणी इमिडाक्लोप्रिड ०.५ मि.लि. किंवा फिप्रोनील १.५ मि.लि. लवकर येणारा करपा प्रादुर्भावाचे ठिकाण : पानांवर किंवा फळांवर नियंत्रण : झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त पाने, फळे गोळा करून व्यवस्थित जाळून नष्ट करावीत. ती बांधावर किंवा टोमॅटो प्लॉटशेजारी  टाकू नयेत. फवारणी प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम सूचना : रोगाची लक्षणे दिसताच गरजेनुसार १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. टीप : फवारणी नॅपसॅक पंपाने करावी.

संपर्क : डाॅ. एम. एन. भालेकर, ०२४२६- २४३३४२ (अखिल भारतीय समन्वयित संशाेधन प्रकल्प, भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com