agricultural news in marathi ,vegetable crop advisory,AGROWON, Maharashtra | Agrowon

भाजीपाला पीक सल्ला
सी. बी. बाचकर, एस. ए. पवार, डॉ. एम. एन. भालेकर
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

महत्त्वाच्या सूचना :

महत्त्वाच्या सूचना :

 • सपाट वाफ्यात लसणाच्या पाकळ्या टोकून लागवड करावी.
 • रांगडा कांद्याची लागवड केली असल्यास तण नियंत्रणासाठी लागवडीनंतर दहा ते बारा दिवसांनी ऑक्‍झिफ्लोरफेन १.२५ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
 • गादी वाफ्यावर टोमॅटो रोपवाटिका तयार करावी.
 • वाटाणा लागवड पूर्ण करावी.
 • सरी वरंब्यावर कोबी व प्लॉवर या पिकांची लागवड करावी.

पीकसंरक्षण :
सध्या ढगाळ व विषम वातावरणामुळे भाजीपाला पिकांवर रस शोषणाऱ्या किडी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे.
कांदा :
फुलकिडे
लक्षणे : कीड पानांतून रसशोषण करते. त्यामुळे कांदापातीवर पांढरट ठिपके किंवा चट्टे पडले दिसतात. प्रादुर्भाव वाढल्यास कांदाच्या मानेजवळ मोठ्या प्रमाणात पांढरे चट्टे पडल्याचे दिसतात.
नुकसान : कांद्याचे व्यवस्थित पोषण होत नाही. परिणामी वजनात व दर्जात घट होते.

करपा रोग :
लक्षणे : पानांच्या कडा करपतात. कालांतराने करपलेला भाग पानांच्या मध्य शिरेपर्यंत वाढतो.
नुकसान : प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत झाल्यास लोंबीतील बहुतांश दाणे भरत नाहीत.

फुलकीड व करपा रोग नियंत्रण :
प्रतिलिटर पाणी, डायमेथोएट (३० ईसी.) १.३ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी.) ०.६ मि.लि. अधिक मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट १ मि.लि.
 
मिरची :
चुरडा-मुरडा (लीफ कर्ल) रोग :
लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त पानाच्या आकारात बदल होतो. पाने काठाने गुंडाळली जातात. झाडाची वाढ खुंटते. पाने गुंडाळल्यामुळे झाड बोकडल्यासारखे दिसते.
नुकसान : झाडांना फुले लागत नाहीत. थोड्या प्रमाणात लागली तरी त्याचे फळात रूपांतर होत नाही.

 • रोगकारक विषाणूंचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी आणि कोळी या रस शोषक किडींमार्फत होतो.
 • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी १० याप्रमाणात लावावेत. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे एकरी १० या प्रमाणात लावावेत.  

फुलकिडे व मावा नियंत्रण : प्रतिलिटर पाणी
फिप्रोनील (५ ईसी.) १.५ मि.लि.
कोळी नियंत्रण : फेनपायरॉक्‍झीमेट (५ ईसी.) १ मि.लि. किंवा   फेनाझाक्विन (१० ईसी) २ मि.लि.

वांगी :
शेंडे व फळ पोखरणारी अळी नियंत्रण
लक्षणे : फिक्कट पांढऱ्या रंगाची अळी शेंड्यातून खोडात शिरते. खोडात शिरून आतील भाग पोखरून खाते.
नुकसान : झाडाचे शेंडे वाळून झाडाची वाढ खुंटते. तसेच फळे पोखरल्याने फळांचा दर्जा खालावतो.  
नियंत्रण :

 • दर आठवड्यास कीडग्रस्त शेंडे  खुडून नष्ट करावे.
 • कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.
 • हेक्‍टरी १०० ल्युसील्यूर कामगंध सापळे वापरावे. त्यातील ल्युर दोन महिन्याने बदलावा.

फवारणी प्रतिलिटर

 • क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा
 • इमामेक्‍टीन बेन्झॉएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा   
 • क्‍लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस.सी.) ०.४ मि.लि.  
 • गरजेनूसार अॅझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम) ३ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.

संपर्क : डॉ. एम. एन. भालेकर, ९८५०८९२७८२
(भाजीपाला पिके प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...