agricultural news in marathi,banana crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

केळी सल्ला
डॉ. एन. बी. शेख, ए.आर. मेंढे, डॉ. के.बी. पवार
शनिवार, 23 जून 2018

मृग बाग :
जुनी मृग बाग

मृग बाग :
जुनी मृग बाग

 • फळवाढीच्या व कापणीच्या अवस्थेत असणाऱ्या जुन्या मृगबागेतील पक्व झालेल्या घडांची २५ ते ३० सें. मी. दांडा राखून कापणी करावी. कमीत कमी हाताळणी करून घड पॅकिंग हाऊसपर्यंत न्यावा. कापणी झालेल्या झाडांची सर्व पाने कापून बागेबाहेर न्यावीत.
 • घडाचे व घडदांड्यांचे संरक्षण होण्यासाठी घडावर ६ टक्के सच्छिद्रतेच्या पाॅलिथीन पिशव्यांचे आवरण करावे. खोडाला बांबू किंवा पाॅलिप्रॉपीलीनच्या पट्ट्या लावून निसवलेल्या झाडांना आधार द्यावा. दोन बांबूंची कैंची (कात्री) करून आधार दिल्यास फायद्याचे ठरते.  
 • बागेत लागवडीनंतर २५५ व ३०० दिवसांनी जमिनीतून द्यावयाची खतमात्रा युरिया ३६ ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश ८३ ग्रॅम या प्रमाणात खोडापाशी खड्डा करून द्यावी. २९ ते ४० आठवड्याच्या केळी बागेसाठी युरिया ५.५ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ७ किलो प्रति हजार झाड याप्रमाणात ठिंबक संचातून द्यावे. बागेमधील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी निचऱ्याची व्यवस्था करावी.

नवीन मृगबाग

 • नवीन मृगबाग लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून घ्यावी. शेतात शेणखत प्रतिझाड १० किलो याप्रमाणात पसरवून घ्यावे. लागवडीसाठी योग्य अंतरावर खड्डे पाडावेत. लागवडीचे अंतर किमान ५ x ५ फूट इतके ठेवावे.
 • बेणे निवड - केळी लागवडीसाठी मुनवे निरोगी आणि जातीवंत मातृबागेतूनच निवडावेत. शक्यतो आवश्‍यक बेण्यांच्या संख्येच्या दुप्पट बेणे काढावेत. अशा बेण्यातून ३ ते ४ महिने वयाचे, ४५०-७५० ग्रॅम वजनाचे, उभट किंवा नारळाच्या आकाराचे कंद लागवडीसाठी निवडावेत.
 • बेणे प्रक्रिया - निवडलेल्या चांगल्या बेण्यावर भौतिक, रासायनिक बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते.
 • भौतिक बेणेप्रक्रिया - बेण्यावरील माती, मुळ्या कोयत्याने काढाव्यात. बेण्यावर ३-४ रिंगा ठेवून इतर भागाची साल १ सें.मी. खोलीपर्यंत तासावी. या संस्कारामुळे सूत्रकृमीच्या प्रादुर्भावापासून बेण्याचे संरक्षण होते. तसेच खोडकिडीचा उपद्रव आढळल्यास असे बेणे वेगळे करता येते.
 • रासायनिक बेणे प्रक्रिया : भौतिक बेणेप्रक्रिया केलेल्या बेण्यावर रासायनिक प्रक्रिया केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या सूत्रकृमी आणि करपा (सिगाटोका) या राेगांपासून संरक्षण मिळते. रासायनिक बीजप्रक्रिया करण्यासाठी १ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात मिश्रण तयार करून लागवडीपूर्वी कंद त्या द्रावणात ३० ते ४० मिनिटे बुडवून मग लागवडीसाठी वापरावीत.
 • लागवडीसाठी उति संवर्धित रोपांचाही उत्तम पर्याय आहे. दर्जेदार जातींची विषाणू निर्देशांक तपासलेली निरोगी रोपे खात्रीशीर उत्पादकांकडून खरेदी करावीत. ऊतिसंवर्धित रोपे एक सारख्या वाढीची, ३० ते ४५ सें.मी. उंचीची किमान ६ ते ७ पाने असलेली असावीत. उतीसंवर्धित रोपांची लागवड करावयाची असल्यास ती शक्यतो १-२ पाऊस पडल्यावर जमिनीत पुरेसा ओलावा असल्यावरच करावी. लागवडीपूर्वी शेतात ठिबक सिंचन यंत्रणा बसवावी. केळी लागवड योग्य पद्धतीने करावी.
 • योग्य फुलीवर कुदळीने खड्डा घेऊन त्यात खोड / रोप लावावे. लागवडीनंतर प्रतिदिन प्रतिझाड किमान ५ लिटर पाणी द्यावे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रोपाभोवतालची माती पायाने दाबावी.
 • अतिवृष्टीबरोबरच वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटतात. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रियेचा वेग मंदावतो. तसेच वाऱ्यामुळे झाडे कोलमडूनही फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी केळी बागेभोवती २ मीटर अंतरावर सजीव कुंपणाच्या दोन
 • ओळी केळी लागवड करते वेळीच लावाव्यात. सजीव कुंपणासाठी शेवरी, बांबू, सुरू व गजराज गवत यांची लागवड करावी.

कांदेबाग

 • कांदेबाग केळीमध्ये काही प्रमाणात निसवण्याची क्रिया सुरू होईल. निसवलेल्या घडातील पूर्ण फण्या उमलल्यानंतर त्याचे केळ फूल कापावे व बागेबाहेर नेऊन नष्ट करावे. निर्यातयोग्य दर्जाची केळी मिळण्यासाठी घडावर ८ ते १० फण्या ठेवून खालील बाजूच्या फण्या धारदार विळ्याच्या सहाय्याने व्यवस्थितपणे कापून टाकाव्यात.
 • केळीचा घड पूर्ण निसवून केळफुल कापल्यानंतर व फण्या विरळणी नंतर घडावर पोटॅशियम डाय हायड्रोजन फाॅस्फेट ०.५ टक्के (५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) अधिक युरिया १ टक्का (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) यांच्या एकत्रित द्रावणाच्या दोन फवारण्या कराव्यात. किंवा केळफूल कापल्यानंतर एकदा व त्यानंतर ३० दिवसांनी पुन्हा १० लिटर पाण्यात सल्फेट आॅफ पोटॅश २० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणात मिसळून फवारणी करावी.
 • आवश्‍यकतेनूसार केळी घडांना बांबू किंवा पाॅली प्राॅपिलीन पट्टीच्या सहाय्याने आधार द्यावा. एकूण झाडांपैकी ७० टक्के बागेची निसवण झाल्यास ४ ते ५ महिने वयाचे पिल खोडवा म्हणून ठेवावे.
 • ज्या बागा अद्याप निसवणपूर्व अवस्थेत आहेत अशा बागांना लागवडीनंतर ३०० दिवसांनी द्यावयाची खतमात्रा प्रतिझाड युरिया ३६ ग्रॅम अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ८३ ग्रॅम द्यावे.  

संपर्क : डॉ. एन. बी. शेख, ७५८८०५२७९२
(केळी संशोधन केंद्र, जळगाव.)

इतर अॅग्रोगाईड
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
जमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...
द्राक्ष बागेतील अतिथंडीचे परिणाम,...द्राक्षलागवडीखालील भागात (मुख्यतः नाशिक जिल्हा)...
थंडी : केळी पीक सल्ला१) सध्याच्या थंडीमुळे नवीन लागवड केलेल्या...
वाढत्या थंडीपासून द्राक्षबागेचे संरक्षणउत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील...
केळी पीक व्यवस्थापन सल्ला उन्हाळ्यातील अधिक तापमान, वेगाने वाहणारे वारे...
आंबा, काजू पीक व्यवस्थापन सल्ला सध्याच्या काळातील थंडीमुळे आंबा कलमांना चांगला...
बायोडायनॅमिक शेती पद्धतीचे महत्त्व,...बायोडायनामीक शेती पद्धतीचे उद्गाते डॉ. रुडॉल्फ...
मिरची रोपवाटिकेतील पीक संरक्षणसध्या अनेक ठिकाणी रोपवाटिका ते फळे लागण्याच्या...
संत्र्यावरील सिट्रस सायला किडीचे...संत्रा पिकामध्ये नवती फुटण्यास सुरवात झाल्यानंतर...
वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी ः मुरघासपावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याचे...
लागवड उन्हाळी तिळाचीउन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
गहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...
जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उपाययोजनाजमिनीचे आरोग्य म्हणजेच मातीचे जैविक, भौतिक व...
सुधारित शाबूकंदामुळे कमी होतील लोह,...जनुकीय सुधारणेच्या माध्यमातून शाबूकंदामध्ये...
गहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...
तंत्रज्ञान वैशाखी मूग लागवडीचेउन्हाळ्यातील जास्त तापमान मूग पिकाच्या वाढीसाठी...
डाळिंब पिकातील अन्नद्रव्ये कमतरतेची...डाळिंबाचे उत्पादनक्षम आयुष्य हे जमिनीच्या...
पाणी व्यवस्थापनासाठी नियमन तूट सिंचनराज्यामध्ये अनेक भागांत सध्या दुष्काळी वातावरण...
ढगाळ वातावरणासह थंडीची शक्यता; भुरी,...सर्व द्राक्ष विभागांमध्ये सध्या निरभ्र वातावरण...