agricultural news in marathi,coconut crop advisory , Agrowon, Maharashtra | Agrowon

नारळ पीक सल्ला
डॉ. पी. बी. सानप, डॉ. व्ही. व्ही. शिंदे
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नवीन लागवड केलेल्या रोपांना आधार द्यावा. रोप लावल्यानंतर पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याने हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या ४५ सें. मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूस रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. नारळ रोप सैलसर बांधून ठेवावे.

नवीन लागवड :

नवीन लागवड केलेल्या रोपांना आधार द्यावा. रोप लावल्यानंतर पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याने हलू नये म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या ४५ सें. मी. अंतरावर रोपाच्या दक्षिणोत्तर बाजूस रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. नारळ रोप सैलसर बांधून ठेवावे.

नवीन लागवड :

  • नवीन लागवड केलेल्या बागेत स्वच्छता ठेवावी. जेथे रोप मेले आहे तेथे नवीन रोपाची लागवड करावी.  
  • नारळ बागेत प्रामुख्याने मोकाट पद्धतीने पाणी दिले जाते. त्यामुळे अळ्यात तणांचा प्रादुर्भाव होतो. जिथे ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते, तिथे नियंत्रित तण व्यवस्थापन करावे लागते. तसेच पाण्याचा योग्य वापर होतो.
  • तण नियंत्रणासाठी रोपांच्या अळ्यात जैविक आच्छादन किंवा प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. बागेत तण नियंत्रण करण्यासाठी ट्रॅक्‍टरने हलकी नांगरणी करावी. रोपांच्या मुळांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पहिली दोन वर्षे नारळ रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विणलेले झाप, झावळ्या, गवत, झाडांच्या फांद्या यांची कृत्रिम सावली करावी. रोपाच्या चारही दिशांना उंच वाढणारी केळी, पपई, एरंडी अगर गिरीपुष्पाची लागवड करावी. यामुळे रोपांना सावली मिळते. तसेच या पिकांपासून काही प्रमाणात उत्पन्नही मिळेल.

जुनी नारळ बाग

  • जुन्या नारळ बागेत स्वच्छता करावी. जेथे फळे येतात त्या ठिकाणी शिल्लक असलेले जुने नारळाचे देठ, फोकी, वांझ पोयी व इतर कचरा काढून बाग स्वच्छ करावी.
  • नारळाची मुळे तंतुमय प्रकारातील असतात. त्यामुळे सध्याच्या काळात झाडाच्या बुंध्यात मातीची भर द्यावी. त्यामुळे मुळांचे संरक्षण होऊन त्यांची अन्नग्रहण क्षमता वाढते.
  • योग्य पाणी व्यवस्थापन करावे. ज्या ठिकाणी पुरेसा पडलेला नसेल तेथे मोठ्या झाडांसाठी प्रतिझाड व प्रति दिन ६०लिटर पाणी द्यावे. लहान झाडांसाठी प्रति दिन प्रति झाड १५ लिटर पाणी द्यावे.
  • पावसाळा संपल्यावर झाडावर मोठ्या प्रमाणात नारळ लगडलेले असतात. ते काढून घ्यावेत. या नंतरच्या काळात फळांची नियमित काढणी करावी.
  • कमी उत्पादन म्हणजे प्रतिमाड प्रतिवर्षी सरासरी दहा नारळापेक्षा कमी उत्पादन देणारी झाडे बागेतून काढून टाकावीत. तेथे नवीन रोपे लावावीत.
  • बागेत स्वच्छता तसेच  इतर आंतरमशागतीची कामे करताना झाडाच्या बुंध्यांना जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

संपर्क : ०२३५२-२५५०७७
(प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)
 

इतर ताज्या घडामोडी
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...
धुळ्यात हरभरा खरेदी केंद्रांची संख्या... धुळे  ः धुळे जिल्ह्यातही हरभरा व तुरीला...
येवल्यातून यंदा २८७३ टन द्राक्ष निर्यात येवला, जि. नाशिक : उन्हाळा आला की ५० वर गावांची...
फळबाग लागवडीकडे नाशिकमधील शेतकऱ्यांची... नाशिक : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या...
अकोला जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...अकोला : जिल्ह्यात कृषी विभागात शंभरावर विविध पदे...
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...