agricultural news in marathi,crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

कृषी सल्ला : बागायती कापूस, ऊस, मका, डाळिंब  
कृषि विद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जि. नगर
शुक्रवार, 22 जून 2018

हवामानाची स्थिती :
पुढील पाच दिवस कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस राहील व किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आर्द्रता ७४ ते ८१ टक्के राहील, तर किमान आर्द्रता ३६ ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी १२ ते २० कि.मी. राहील.

हवामानाची स्थिती :
पुढील पाच दिवस कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअस राहील व किमान तापमान २२ ते २५ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल आर्द्रता ७४ ते ८१ टक्के राहील, तर किमान आर्द्रता ३६ ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा वेग ताशी १२ ते २० कि.मी. राहील.

  • अद्याप पेरणी न झालेल्या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी.
  • ज्या ठिकाणी खरीप पिकांची पेरणी झालेली असेल, त्या ठिकाणी पुढील काळाकरीता संरक्षित सिंचनाची सोय करावी.

बागायती कापूस
मावा, तुडतुडे इत्यादी रस शोषक किडींचा आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. लेडीबर्ड बीटल, क्रायसोपा यांसारख्या मित्र किडींचे संवर्धन करावे.

ऊस
पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी, शिफारशीत कीटकनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.

मका
खोडकिडीच्या नियंत्रणासाठी उगवण झाल्यावर आठ-दहा दिवसांनी शिफारशीत कीटकनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.

डाळिंब  
फुलकिडीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅड (२.५ एस. सी.) १ मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

जमिनीनुसार पिकांची निवड

  • भारी - कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन
  • मध्यम - सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी
  • हलकी - बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी

टीप : पावसाळ्यात फवारणी करताना सरफॅक्टंट (स्टिकर)चा वापर करावा.

संपर्क : कृषि विद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जि. नगर

इतर अॅग्रोगाईड
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...
योग्य प्रमाणामध्ये वापरा विद्राव्य खतेविद्राव्य खते प्रामुख्याने फवारणीद्वारे दिल्याने...
परतीच्या मॉन्सूनला लवकरच सुरवातओदिशाच्या उत्तरेस व दक्षिणेस हवेचे दाब कमी होऊन...
भातावरील रोगांचे नियंत्रणकरपा ः   बुरशी ः पायरीक्‍युलॅरिया...
पिकांचे संतुलित पोषण महत्त्वाचे...अन्नद्रव्ये पिकांना पुरेशी आहे‏त किंवा नाहीत हे‏...
फळपीक सल्लापेरू १) मिलिबग ः डायमेथोएट १.५ मि.लि. किंवा क्‍...
‘स्टिंक बग’मुळे वाढतेय कापसातील बोंडसडनांदेड व यवतमाळ जिल्ह्यांतील सीमावर्ती भागामध्ये...
मोसंबी फळगळीवरील उपाय कारणे   रोगग्रस्त, कीडग्रस्त...
सोयाबीनवरील पिवळा मोझॅकचे नियंत्रणसध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य...
तयारी रांगडा कांदा लागवडीची...रांगडा कांदा लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड...
गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी कामगंध... यावर्षी अगदी सुरवातीपासून कपाशीवर बोंड अळीचा...
हळद पिकातील रोगांचे नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
औषधी करटोली१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex....
अडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापनअडसाली उसासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन पीक...
तुरीमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...तूर पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...
रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...