पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजन

पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजन
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजन

पावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध पाण्याचा साठादेखील अनिश्चित असतो. अशा परिस्थितीत पुरेसा पाऊस झाल्यानंतर कोणते पीक घ्यावे हा प्रश्न असतो. अवर्षणप्रवण विभागात उत्पादनात स्थिरता येण्यासाठी शिफारशीनुसार पीक लागवडीचे नियोजन फायदेशीर ठरते. गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण हे अनियमित झाले आहे. कमी कालावधीत जास्त पाऊस किंवा दोन पावसांत मोठा खंड पडत असल्यामुळे पीक उत्पादन निश्चित स्वरूपात मिळत नाही. हे लक्षात घेऊन पावसाच्या आगमनानुसार पीक लागवडीचे नियोजन करावे.

पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजन १५ जुलैपर्यंत पाऊस  : पिके : सोयाबीन, कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, तूर, सूर्यफूल, तीळ, मका,कांदा. आंतरपिके : बाजरी + तूर (२ः१) , सूर्यफूल + तूर (२ः१), सोयाबीन + तूर (३ः१), गवार + तूर (२ः१) चारा पिके :  गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका गवतवर्गीय पिके : फुले गोवर्धन, फुले जयवंत. १६ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पाऊस : पिके : सूर्यफूल, तूर*, हुलगा, एरंडी, बाजरी, तीळ, सोयाबीन*, मका, रांगडा कांदा आंतरपिके : सूर्यफूल + तूर (२ः१), तूर + गवार (१ः२), बाजरी + तूर (२ः१) चारा पिके : गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका गवतवर्गीय पिके : फुले गोवर्धन, फुले जयवंत टीप : * मध्यम कालावधीच्या जाती निवडाव्यात. संरक्षित पाणी व्यवस्थापन आवश्यक.

१ आॅगस्ट ते १५ आॅगस्टदरम्यान पावसाचे आगमन : पिके : सूर्यफूल, तूर, एरंडी, रांगडा कांदा, मका, हुलगा, तीळ चारा पिके : गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका गवतवर्गीय पिके : फुले गोवर्धन, फुले जयवंत टीप : कमी पाणी व्यवस्थापनांतर्गत तांबडा भोपळा, गवार  या पिकांची लागवड करावी.रब्बी ज्वारीसाठी पाणी संवर्धनाचे नियोजन करावे.

१६ आॅगस्ट ते ३१ आॅगस्टदरम्यान पावसाचे आगमन पिके : सूर्यफूल, तूर*, एरंडी, रांगडा कांदा, मका चारा पिके : गोड ज्वारी (फुले गोधन, रुचिरा, अमृता), मका गवतवर्गीय पिके : फुले गोवर्धन, फुले जयवंत टीप : *मध्यम कालावधीच्या जाती निवडाव्यात. संरक्षित पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. पीक व्यवस्थापन :

  • पाणीटंचाईच्या काळात कोळपणी ही महत्त्वाची आंतरमशागत अाहे. यामुळे उपलब्ध ओलाव्याचे संवर्धन होण्यास मदत होते. तसेच तणनियंत्रणाबरोबरच जमीन भुसभुशीत होऊन भेगा बुजल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो.
  • आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. काडी कचरा, उसाचे पाचट, तूरकाट्या, ज्वारीची धसकटे, वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे.
  • आच्छादन केल्यामुळे पिकास ३५ ते ५० मिलिमीटर ओलावा मिळतो.
  • रोपांची विरळणी करून जमिनीतील अन्न व पाणी यांची बचत करावी. हे अन्न, पाणी इतर रोपांना मिळून ती ताण सहन करतात.
  • खतांचा वापर, पीकसंरक्षण ही कामे वेळेवर केल्याने पिकांचे तेज चांगले राहते. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
  • पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी पिकास सरी आड सरी पद्धतीने पाणी द्यावे.
  • पिकांच्या पानांची संख्या कमी करून पर्ण बाष्पीभवन कमी होते.पाणीटंचाई कालावधीतील तूर आणि सोयाबीन आंतरपीक
  • पद्धत :

  • पाणीटंचाईच्या काळात सहा फुटांवर तुरीची पेरणी करून दोन रोपांतील अंतर एक फूट ठेवावे.
  • तुरीच्या मधल्या पट्ट्यामध्ये संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास सोयाबीनच्या दीड फुटाच्या अंतराने तीन ओळी पेराव्यात किंवा मधल्या पट्ट्यात रिजरने खोल सरी काढून त्यामध्ये पावसाच्या पाण्याचे संधारण करावे. किंवा
  • तूर आणि सोयबीन आंतरपीक घेताना तीन फुटांवर सलग सरी पाडाव्यात. एक आड एक वरंब्यामध्ये तूर व सोयाबीनची टोकण करावी. तुरीची लागवड वरंब्याच्या मध्यभागी (१८०  सें. मी. X ३० सें. मी.) आणि सोयाबीन वंरब्याच्या दोन्ही बगलांमध्ये (४५ सें. मी. X १० सें. मी.) लागवड करावी.
  •  जमिनीच्या खोलीनुसार पीक नियोजन:

    जमिनीची खोली (सें.मी.)    उपलब्ध ओलावा (मि.मी.)     पीक नियोजन
    ७.५ पेक्षा कमी    १५-२०  गवत, वन शेती, कोरडवाहू फळबाग
    ७.५ ते २२.५     ३०-३५     गवत, हुलगा, मटकी, एरंडी, वनशेती व फळबाग, बाजरी+हुलगा/मटकी (२ः१) आंतरपीक
    २२.५ ते ४५   ४०-६०       सलग सूर्यफुल, बाजरी, तुर व बाजरी+तुर आंतरपीक (२ः१) यामध्ये ३ः१ याप्रमाणे मटकी पट्टा ते पेर पद्धत

    जमिनीचा प्रकार, उपलब्ध पाण्याच्या पाळ्यानुसार पीक नियोजन

    पाण्याची परिस्थिती     जमिनीचा प्रकार     उपलब्ध पाण्याच्या पाळ्यांची संख्या     पिके     आवश्‍यक पाण्याच्या पाळ्या
    भरपूर पाणी     मध्यम ते भारी जमीन     ६ ते ८   भुईमुग मका सूर्यफूल सोयाबीन   ३-४ २-३ २-३ २-३
    मध्यम पाणी    मध्यम ते भारी जमीन   ४ ते ६   भुईमुग मका सूर्यफुल सोयाबीन   १-२ २-३ ३-४ २-३
    पाण्याची परिस्थिती   जमिनीचा प्रकार  उपलब्ध पाण्याच्या पाळ्यांची संख्या    पिके     आवश्‍यक पाण्याच्या पाळ्या
    कमी पाणी    मध्यम ते भारी जमीन     ३ ते ४     बाजरी भुईमुग मुग     १-२ १-२ १
    अत्यंत कमी पाणी    मध्यम ते भारी जमीन     २    बाजरी मुग    १

    संपर्क : ०२३२४-२४३२३९ (प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com