शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रे

तेलबियांचे मिश्रण करण्याचे यंत्र
तेलबियांचे मिश्रण करण्याचे यंत्र

भारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था आहे. काढणीपश्‍चात पीक व्यवस्थापन व प्रक्रिया याबाबत ही संस्था कार्य करते. संस्थेने विविध यंत्रे त्यादृष्टिकोनातून विकसित केली आहेत. तेलबियासाठी मिश्रण करण्याचे यंत्र : तेलबियांतून तेल काढण्याच्या आधी काही प्रक्रिया केल्या जातात. हे यंत्र अशा पुर्वप्रक्रियांसाठी (pre treatment) उपयोगी आहे. विद्युत मोटर किंवा माणसाच्या मदतीने चालवले जाते. यंत्राची ताशी क्षमता ४० ते ५० किलो असून हे बॅच टाईप कार्य करते.

एरंडी शेंगा वेगळ्या करणे व फोडणी यंत्र  : एरंडीच्या शेंगा वेगळ्या करून फोडण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. बिया काढल्यानंतर त्यांचे वर्गीकरण व सफाई करण्याची व्यवस्थाही या यंत्रामध्ये आहे. पीक कापणीनंतर १२ दिवसांपर्यंत शेंगा उन्हामध्ये वाळवल्या जातात. नंतर फोडून बिया वेगळ्या केल्या जातात. ओलाव्याचे प्रमाण ६.२२ टक्के असलेल्या ९८.५ टक्के बियांवर हे यंत्र कार्य करू शकते. यंत्राची क्षमता ताशी १८० किलो इतकी आहे. यंत्र लघुउद्योगासाठी उपयुक्त आहे.

लघु/तुरडाळ मिल : यंत्राचे मुख्य वैशिष्ट्य असे, की एकाच रोलरवर तीन ग्रेडच्या एमरीचे आवरण केलेले असते. तूर जास्त वेळ यंत्रामध्ये राहून टरफल काढणे व डाळ तयार करण्याचे काम व्यवस्थित व्हावे हा उद्देश आहे. यंत्राची क्षमता ताशी १०० किलो असून ७२ टक्के डाळ तयार होते. कुटीरउद्योगासाठी यंत्र उपयोगी आहे. केवळ ३ अश्‍वशक्तीच्या इंजिनाच्या सहाय्याने हे यंत्र काम करू शकते.

धान्य/फळे/भाज्या वाळवणी यंत्र : यंत्र बनविताना ऊर्जेचा योग्य वापर व पदार्थांचे एकसमान वाळवणे होईल याचा विचार केला आहे. एका वेळी ३० किलो चकत्या केलेली फळे ठेवली जाऊ शकतात. त्यांना वाळवण्यासाठी ६ ते १० तासांचा अवधी लागतो. संपर्क :डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४ (लेखक केंद्रिय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे प्रकल्प संचालक होते.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com