agricultural news in marathi,easy implements for farm produce processing, Agrowon, Maharashtra | Agrowon

शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रे
डॉ. रणजीत सिंह, डॉ. एस.डी. कुलकर्णी
सोमवार, 11 जून 2018

भारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था आहे. काढणीपश्‍चात पीक व्यवस्थापन व प्रक्रिया याबाबत ही संस्था कार्य करते. संस्थेने विविध यंत्रे त्यादृष्टिकोनातून विकसित केली आहेत.

तेलबियासाठी मिश्रण करण्याचे यंत्र :
तेलबियांतून तेल काढण्याच्या आधी काही प्रक्रिया केल्या जातात. हे यंत्र अशा पुर्वप्रक्रियांसाठी (pre treatment) उपयोगी आहे. विद्युत मोटर किंवा माणसाच्या मदतीने चालवले जाते. यंत्राची ताशी क्षमता ४० ते ५० किलो असून हे बॅच टाईप कार्य करते.

भारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत महत्त्वपूर्ण संस्था आहे. काढणीपश्‍चात पीक व्यवस्थापन व प्रक्रिया याबाबत ही संस्था कार्य करते. संस्थेने विविध यंत्रे त्यादृष्टिकोनातून विकसित केली आहेत.

तेलबियासाठी मिश्रण करण्याचे यंत्र :
तेलबियांतून तेल काढण्याच्या आधी काही प्रक्रिया केल्या जातात. हे यंत्र अशा पुर्वप्रक्रियांसाठी (pre treatment) उपयोगी आहे. विद्युत मोटर किंवा माणसाच्या मदतीने चालवले जाते. यंत्राची ताशी क्षमता ४० ते ५० किलो असून हे बॅच टाईप कार्य करते.

एरंडी शेंगा वेगळ्या करणे व फोडणी यंत्र  :
एरंडीच्या शेंगा वेगळ्या करून फोडण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. बिया काढल्यानंतर त्यांचे वर्गीकरण व सफाई करण्याची व्यवस्थाही या यंत्रामध्ये आहे. पीक कापणीनंतर १२ दिवसांपर्यंत शेंगा उन्हामध्ये वाळवल्या जातात. नंतर फोडून बिया वेगळ्या केल्या जातात. ओलाव्याचे प्रमाण ६.२२ टक्के असलेल्या ९८.५ टक्के बियांवर हे यंत्र कार्य करू शकते. यंत्राची क्षमता ताशी १८० किलो इतकी आहे. यंत्र लघुउद्योगासाठी उपयुक्त आहे.

लघु/तुरडाळ मिल :
यंत्राचे मुख्य वैशिष्ट्य असे, की एकाच रोलरवर तीन ग्रेडच्या एमरीचे आवरण केलेले असते. तूर जास्त वेळ यंत्रामध्ये राहून टरफल काढणे व डाळ तयार करण्याचे काम व्यवस्थित व्हावे हा उद्देश आहे. यंत्राची क्षमता ताशी १०० किलो असून ७२ टक्के डाळ तयार होते. कुटीरउद्योगासाठी यंत्र उपयोगी आहे. केवळ ३ अश्‍वशक्तीच्या इंजिनाच्या सहाय्याने हे यंत्र काम करू शकते.

धान्य/फळे/भाज्या वाळवणी यंत्र :
यंत्र बनविताना ऊर्जेचा योग्य वापर व पदार्थांचे एकसमान वाळवणे होईल याचा विचार केला आहे. एका वेळी ३० किलो चकत्या केलेली फळे ठेवली जाऊ शकतात. त्यांना वाळवण्यासाठी ६ ते १० तासांचा अवधी लागतो.

संपर्क :डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४
(लेखक केंद्रिय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे प्रकल्प संचालक होते.)

फोटो गॅलरी

इतर कृषी प्रक्रिया
सीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
प्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...
टोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...
दर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...
विविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....
प्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...
मावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...
अाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...
रोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...
शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...
प्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...
प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...
पाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
अर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...
मसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...