agricultural news in marathi,elevated cart for harvesting of cherry tomato, Agrowon, Maharashtra | Agrowon

चेरी टोमॅटोच्या काढणीसाठी ‘इलेव्हेटेड कार्ट’
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

अधिक उंचीपर्यंत वाढणाऱ्या वेली किंवा फळझाडांमध्ये व्यवस्थापन, छाटणी व काढणी यासारख्या नित्य कामांमध्ये अडचणी येतात. पर्यायाने कामाचा वेग कमी होऊन अधिक मनुष्यबळ लागते. हे टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार उंच होणारी ढकलगाडी (इलेव्हेटेड कार्ट) उपयुक्त ठरू शकते.

 

अधिक उंचीपर्यंत वाढणाऱ्या वेली किंवा फळझाडांमध्ये व्यवस्थापन, छाटणी व काढणी यासारख्या नित्य कामांमध्ये अडचणी येतात. पर्यायाने कामाचा वेग कमी होऊन अधिक मनुष्यबळ लागते. हे टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार उंच होणारी ढकलगाडी (इलेव्हेटेड कार्ट) उपयुक्त ठरू शकते.

 

परदेशामध्ये हरितगृहामध्ये चेरी टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात होते. ही वेल उंच वाढते. त्यावर पाने व फळे काढण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत. त्याच प्रमाणे नेदरलॅंड येथील संशोधन संस्थेतील बियाणे पैदासकारांनाही टोमॅटोच्या व्यवस्थापनामध्ये अडचणी येत. खास या पैदासकारांना पाने काढणे सोयीचे व्हावे, यासाठी सुरवातीला स्टिंक्स सर्व्हिसेस या कंपनीतर्फे उंच होणाऱ्या ढकलगाडीची निर्मिती करण्यात आली. त्याविषयी माहिती देताना निर्माते स्टिंक्स सर्व्हिसेसचे वॉऊटर स्टिंक्स म्हणाले की, शेतीमध्ये शेतीमालाची काढणी आणि वाहतूक करताना त्यातील खराब रस्त्यामुळे किंवा खाचखळग्यामुळे वाहन चालवता अडचणी येतात. त्याच प्रमाणे उंची वाढवल्यानंतर कार्ट कलंडण्याचाही धोका असतो. हा टाळण्यासाठी यामध्ये खास उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे टोमॅटोमधील पाने काढण्याच्या कामाचा वेग वाढतो. एक वर्षापूर्वी संपूर्ण चाचण्यानंतर पाने काढण्याची कार्ट बाजारात आणण्यात आली.
अशाच प्रकारे गुलाबाच्या काढणीसाठीही एक ट्रॉली तयार करण्यात आली आहे. लांब दांड्याची फुले अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची व ठेवण्याची सोय आहे.

 

वेबसाईट ः www.steenks-service.nl

वैशिष्ट्ये

  • ही ढकलगाडी आकाराने लहान असून, दोन ओळीमधून व्यवस्थित जाऊ शकते.
  • कार्टची गतीशीलता उत्तम असून, ड्रायव्हिंगही सुलभतेने करता येते.
  • सुरक्षिततेच्या दृष्टीने या कार्टला रेलिंग असले तरी आवश्यकतेनुसार ते खाली करता येते. त्यामुळे कोणत्याही कामासाठी वापरता येते.
  • या कार्टमध्ये प्लॅटफॉर्मची उंची साध्या तंत्राने आवश्यकतेनुसार वर खाली करता येते. त्यासाठी त्यात एक कंट्रोल पॅनेल असून, बॅटकी चार्जरही देण्यात आला आहे.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...