agricultural news in marathi,farmer's experience of organic farming -sudhakar banait ,AGROWON,marathi | Agrowon

सेंद्रिय शेती : जमीन सुपीकता, सापळा पिकांवर दिला भर
गोपाल हागे
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

मधापुरी (जि. अकोला) येथील सुधाकर बाणाईत कापूस , तूर, सोयाबीन या पिकांसोबतच भाजीपाला पिकेही सेंद्रिय पद्धतीने घेतात. पिकांची फेरपालट, मिश्रपीक पद्धतीवर त्यांचा भर आहे. सुक्ष्म सिंचन, सापळा पिकांचा वापर करुन त्यांनी उत्पादनात सातत्य ठेवले आहे.  

मधापुरी (जि. अकोला) येथील सुधाकर बाणाईत कापूस , तूर, सोयाबीन या पिकांसोबतच भाजीपाला पिकेही सेंद्रिय पद्धतीने घेतात. पिकांची फेरपालट, मिश्रपीक पद्धतीवर त्यांचा भर आहे. सुक्ष्म सिंचन, सापळा पिकांचा वापर करुन त्यांनी उत्पादनात सातत्य ठेवले आहे.  

मुर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी (जि. अकोला) येथील सुधाकर बाणाईत गेल्या पंधरा वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करीत अाहे. शेती व्यवस्थापनाविषयी सांगताना ते म्हणाले, की माझ्याकडे ३२ एकर शेती अाहे. त्यातील सोळा एकर शेती बागायती आहे. माझी जमीन अत्यंत हलक्या प्रतीची अाहे. यात अाम्ही कापूस, सोयाबीन, तूर, व इतर पारंपरिक पिकांची लागवड करतो. सोळा एकरात पाणीपुरवठ्यासाठी दोन विहिरी आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी मी ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा वापर करतो. अोलिताची सोय झाल्यानंतर त्यात सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे नियोजन केले.
पहिल्यांदा मी शेतीची बांधबंदिस्ती, सुपीकतेवर भर दिला. शेतातील माती पावसामुळे वाहून जाणार नाही या दृष्टीने सोळा एकर शेती सहा भागांत विभागून त्यात ढाळीचे बांध टाकले. बांधावर फळझाडांची लागवड केली. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरू लागले. जमिनीत ओलावा टिकून राहिला. विहिरीची पाणी पातळी वाढली.

पीक फेरपालटीवर भर  :
माझ्याकडे दरवर्षी चार एकर कापूस, चार एकर तूर, चार एकर सोयाबीन आणि चार एकर भाजीपाला लागवड असते. भाजीपाल्यामध्ये प्रामुख्याने काकडी, दोडके, गंगाफळ, कारले या पिकांची लागवड करतो. पिकांची फेरपालट, मिश्रपीक पद्धतीवर मी भर दिला आहे. पडलेला पालापाचोळा जागच्या जागी जमिनीत मिसळणे सुरू केले. प्रत हलकी असल्याने या जमिनीत अोलावा टिकवून ठेवण्यासाठी हे फायदेशीर ठरले. रासायनिक खतांएेवजी मी गांडूळखत, शेणखताचा जास्तीत जास्त वापर सुरू केला. माझ्याकडे आठ जनावरे आहेत. त्यामुळे पुरेशा प्रमाणात शेणखत, गांडूळखत तयार करतो. याचबरोबरीने बायोडायनामिक पद्धतीने खत तयार करतो. शेणखतामध्ये जिवाणू संवर्धके, तसेच ट्रायकोडर्मा मिसळतो. फवारणीसाठी गोमूत्र, दशपर्णी अर्क वापरतो. गेल्या दहा वर्षांत सेंद्रिय कर्ब ०.९५ पर्यंत पोचला अाहे. जमीन भुसभुशीत झाली आहे. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारला, पिकांचे उत्पादन वाढू लागले आहे.
मी झेंडू, ज्वारी यासारख्या सापळा पिकांची लागवड करतो, तसेच कापूस, तुरीमध्ये मुगाचे आंतरपीक घेतो. शेतात ठिकठिकाणी पक्षी थांबे बसविलेले आहेत, तसेच चिकट सापळांच्या वापर करतो. गरजेनुरास दर आठ दिवसांनी दशपर्णी अर्क, निंबोळीवर आधारित कीडनाशकांचा वापर करतो. मला कपशाची एकरी सरासरी दहा क्विटंल, सोयाबीनचे नऊ क्विंटल उत्पादन मिळते. भाजीपाल्याची विक्री थेट बाजारपेठेत करतो. ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद आहे. सेंद्रिय शेती पद्धतीमुळे रासायनिक खते, कीडनाशकांच्या वापरात बचत झाली, जमिनीची पोत सुधारला. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत आहे. उत्पादनात सातत्य आहे. येत्या काळात मी प्रमाणीकरण करणार आहे.

संपर्क : सुधाकर बाणाईत, ९४२१७५१८५९

इतर ताज्या घडामोडी
कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं...येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो...कऱ्हाड, जि. सातारा  ः रखरखत्या उन्हात राबून...
कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील...पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख...औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
ग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९...अकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर...
यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा...वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी...
सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या...पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती...
सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा... सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण...
पुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख...पुणे  ः खरीप हंगामासाठी विभागीय कृषी...
हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात... हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी... नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार...
अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’ नगर  ः ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं...
जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे... जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत...
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...