agricultural news in marathi,fruit crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

फळपीक सल्ला
डाॅ. यू. एन. आळसे, डी. डी. पटाईत
बुधवार, 30 मे 2018

फळझाडे :
आंबा

फळझाडे :
आंबा

 • नवीन बागेची लागवड करण्यासाठी आखणी करून खड्डे करावेत. १x १x १ मीटर आकाराचे जातीपरत्वे ६ ते १० मीटर अंतरावर खड्डे खोदून द्यावेत. हे खड्डे काळी माती, पालापाचोळा आणि सुपर फॉस्फेट (१ किलो प्रतिखड्डा) यांनी भरावेत. बुटक्या संकरित जातीसाठी कमी अंतर ठेवावे.
 • दोन वर्षांपेक्षा लहान असलेल्या झाडास सावली करावी. खोडावर/ सालीवर उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून खोडावर गवत बांधावे. तसेच झाडाच्या खोडाला बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी.
 • कलमीकरण केलेल्या खुंटावर नवीन आलेली फूट कापून काढावी.
 • झाडांना ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 • झाडाच्या आळ्यामध्ये वाळलेले गवत, पाचट किंवा इतर पालापाचोळा यांचे आच्छादन करावे.
 • कोरडवाहू क्षेत्रात लागवड केली असल्यास तेथे मटका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
 • कलमीकरण केलेल्या नवीन झाडास काठीचा आधार द्यावा.

मोसंबी

 • मोसंबीची आंबिया बहराची फळे धरली असल्यास तसेच नवीन लागवड केलेल्या बागेस ५ ते ७ दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे.
 • पाणी शक्यतो दुहेरी आळे पद्धतीने द्यावे.
 • कलमीकरण केलेल्या नवीन झाडास काठीचा आधार द्यावा.
 • झाडाच्या आळ्यामध्ये वाळलेले गवत, पाचट किंवा इतर पाला पाचोळा याचे आच्छादन टाकावे.
 • झाडांना बोर्डो पेस्ट (१० टक्के) पावसाळ्यापूर्वी लावावी.
 • पाण्याची कमतरता असल्यास आंबिया बहर धरू नये. बागेवर ६ टक्के केओलीनची (६० ग्रॅम प्रतिलिटर) फवारणी करावी.
 • पोटॅशियम नायट्रेटची ८ ते १० दिवसांच्या अंतराने १.५ ते २ टक्के तीव्रतेची (१५ ते २० ग्रॅम प्रतिलिटर) फवारणी करावी.
 • लिंबूवर्गीय फळझाडे : मृग बहराची फळे तोडून टाकावीत व जमिनीची नांगरट करावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे लिंबुवर्गीय फळझाडांना ३५ ते ५५ दिवसाचा ताण सुरू करावा. नवीन फळबागेसाठी आखणी करून खड्डे खोदणे सुरू करावे.
 • इतर फळझाडे : बोरीची छाटणी एप्रिलमध्ये केली नसल्यास मे महिन्यात लवकरात लवकर उरकून घ्यावी. पाण्याची उपलब्धता असल्यास सीताफळ आणि चिंच झाडांना पाणी सुरू करावे. लवकर फुले येण्यास मदत होईल व पुढे बाजारभाव चांगला मिळेल. चिकूची काढणी संपवावी. नारळ झाडास जमिनीच्या मगदुरानुसार ६ ते १० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

संपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ०२४५२- २२९०००
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...