agricultural news in marathi,goat farming advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

शेळीपालन सल्ला
अजय गवळी, विजयसिंह मदने-पाटील
रविवार, 17 जून 2018
 • करडांचे कप्पे मुख्यतः हवेशीर, कोरडे, उबदार असावेत. अन्यथा गारवा, आर्द्रतेमुळे अशक्त करडे दगावतात. गोठ्यातील तापमान वाढीसाठी विद्युत दिवे लावावेत. मात्र एल.इ.डी. दिवे नकोत.
 • आर्द्रतेमुळे कप्पे लवकर सुकत नाहीत. लेंड्या, मूत्र, पातळ हगवणीमुळे कप्प्यात ओलावा कायम राहून रोगराई सहज पसरते. त्यामुळे करडांची जागा दिवसातून ३-४ वेळेस बदलावी.  
 • फरशीपेक्षा माती, मुरूम यांनी घट्ट केलेली जमीन उबदार असते. त्यांना बसण्यासाठी कोरड्या गोणपाटाचा तसेच चुनखडीचा वापर करावा. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता शोषली जाते.
 • करडांचे कप्पे मुख्यतः हवेशीर, कोरडे, उबदार असावेत. अन्यथा गारवा, आर्द्रतेमुळे अशक्त करडे दगावतात. गोठ्यातील तापमान वाढीसाठी विद्युत दिवे लावावेत. मात्र एल.इ.डी. दिवे नकोत.
 • आर्द्रतेमुळे कप्पे लवकर सुकत नाहीत. लेंड्या, मूत्र, पातळ हगवणीमुळे कप्प्यात ओलावा कायम राहून रोगराई सहज पसरते. त्यामुळे करडांची जागा दिवसातून ३-४ वेळेस बदलावी.  
 • फरशीपेक्षा माती, मुरूम यांनी घट्ट केलेली जमीन उबदार असते. त्यांना बसण्यासाठी कोरड्या गोणपाटाचा तसेच चुनखडीचा वापर करावा. त्यामुळे जमिनीतील आर्द्रता शोषली जाते.
 • करडे पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. भिजलेल्या शेळ्यांजवळ करडे ठेऊ नयेत. करडांना स्वच्छ व निर्जंतुक पाणी द्यावे.
 • वातावरणातील अचानक बदलाने करडांना रोगांचा प्रादुर्भाव, अशक्तपणा येऊन वाढ खुंटते.पावसाळ्यापूर्वी तसेच नंतर प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. प्रतिजैविकांच्या गोळ्या आणि जीवनसत्त्वांची मात्रा पशुवैद्यकाच्या मदतीने द्यावी.
 • वाढीस लागलेली करडे क्षार कमतरता असल्यास  माती चाटतात. त्यामुळे पोटात जंतूंची वाढ होऊन  वाढ खुंटते. त्यामुळे करडांना  जन्मानंतर पहिल्या १५ दिवसांत व नंतर प्रत्येक महिन्याला असे वयाच्या ६ व्या महिन्यांपर्यंत जंतुनाशक द्यावे.
 • करडांच्या कप्प्यात मोकळी जागा असावी. त्यामुळे त्यांना मोकळे फिरणे, उड्या मारणे शक्य होईल. परिणामी ती अशक्त आणि दुर्बल राहत नाहीत.
 • दूध पिणाऱ्या करडांना आईजवळ जास्त वेळ ठेऊ नये. अन्यथा अतिप्रमाणात दूध पिऊन ती दगावू शकतात. त्यांच्याजवळ जास्त पाणीही ठेऊ नये. पहिल्या १५ ते २० दिवसांत अर्धा-एक तासासाठी दिवसातून ३ ते ४ वेळेस करडांना आईजवळ ठेवावे. नंतर त्यांना वेगळ्या कप्प्यात सोडावे.
 • करडांना शेळीचे दूध अपुरे होत असल्यास बाटलीने दूध पाजावे. त्यांना खाण्याची सवय लागण्यासाठी कप्प्यात हिरवा, लुसलुशीत चारा टांगून ठेवावा.
 • करडे कोंडण्यासाठी दुरडी, पाट्या किंवा मोठे पातेले यांचा वापर टाळा. यामुळे व्यवस्थित हालचाल न करता आल्याने श्वसनाचे आजार पसरतात.
 • अशक्त करडांवर पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. वयाच्या तिसऱ्या महिन्यानंतर नर आणि मादी वेगळे करावेत.

संपर्क : अजय गवळी ः ८००७४४१७०२
( पशुजैवतंत्रज्ञान विभाग, के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...