agricultural news in marathi,grapes crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

डाऊनी, भुुरीच्या प्रादुर्भावाची शक्यता
डॉ. एस. डी. सावंत
शुक्रवार, 15 जून 2018

सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यात शुक्रवार आणि त्यानंतर सर्वच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे. सांगली, सोलापूर, पुण्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः सांगली विभागामध्ये सांगलीच्या दक्षिणेकडील भागात रविवारी आणि सोमवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस सर्व विभागांमध्ये म्हणजेच पळशी,खानापूर, विटा, तासगाव, पलूस, वाळवा परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे.अशाच प्रकारचा पाऊस पुणे जिल्ह्यातील यवत, पाटस, सुपे, बारामती या विभागामध्ये सोमवार, मंगळवारी होण्याची शक्यता आहे.

सर्व द्राक्ष विभागांमध्ये येत्या आठवड्यात शुक्रवार आणि त्यानंतर सर्वच ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे. सांगली, सोलापूर, पुण्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये शनिवारपासून ते मंगळवारपर्यंत हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः सांगली विभागामध्ये सांगलीच्या दक्षिणेकडील भागात रविवारी आणि सोमवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस सर्व विभागांमध्ये म्हणजेच पळशी,खानापूर, विटा, तासगाव, पलूस, वाळवा परिसरात पाऊस होण्याची शक्यता आहे.अशाच प्रकारचा पाऊस पुणे जिल्ह्यातील यवत, पाटस, सुपे, बारामती या विभागामध्ये सोमवार, मंगळवारी होण्याची शक्यता आहे.  

जोरात सुरू झालेला मॉन्सून या आठवड्यामध्ये मंदावलेला दिसत आहे. विशेषतः नाशिक विभागात या आठवड्यात फारश्या पावसाची शक्यता नाही.परंतू २३,२४ तारखेनंतर सर्वच विभागामध्ये मॉन्सून पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात विशेषतः नाशिक, सोलापूर विभागांत होणाऱ्या पावसामुळे तापमानात बरीचशी घट झालेली आहे. २४ तारखेनंतरच्या पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढून कमाल तापमान बहुतांशी ३० अंश सेल्सिअच्या खाली जाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ असा, की सध्याच्या हलक्या पावसामध्ये कदाचित डाऊनी मिल्ड्यूचा सर्वत्र प्रसार झालेला दिसणार नाही; परंतु २३, २४ तारखेनंतरच्या पावसामध्ये डाऊनी मिल्ड्यू कार्यरत होण्याची दाट शक्यता सर्वच विभागात दिसते.  म्हणून २० ते २२ तारखेच्या दरम्यान सर्व बागांच्यामध्ये डाऊनीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारण्या घेणे फायद्याचे ठरेल.

शेंडा कापलेल्या बागांच्यामध्ये ताम्रयुक्त बुरशीनाशकाची (कॉपर हायड्रॉक्साईड २ ग्रॅम किंवा कॉपर आॅक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण अर्धा टक्का) फवारणी घ्यावी.
पुढील ५ ते ६ दिवसांमध्ये पाऊस जरी कमी झाला तरी सर्व विभागांच्यामध्ये वातावरण ढगाळ रहाणार आहे. झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये आर्द्रता बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे. अशा वातावरणामध्ये भुरी वाढण्याची शक्यता असते.
बागेत फेरफटका घेऊन भुरीचा प्रादुर्भाव झालेली पाने दिसतात का ? हे तपासावे. प्रादुर्भावास थोडीशी सुरवात झालेली असल्यास लगेच सल्फर (८० डब्लूजी) दीड ते दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

संपर्क : ०२०-२६९५६००१
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...