agricultural news in marathi,implement manufacturers hope good season, Agrowon, Maharashtra | Agrowon

कृषी अवजार निर्मात्यांना चांगल्या हंगामाची अपेक्षा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 मे 2018

गेल्या काळात झालेली नोटाबंदी, त्यानंतर लागू झालेली जीएसटी यासारख्या धोरणांचा कृषी यंत्रनिर्मात्यांना मोठा फटका सहन करावा लागला. गेले दोन हंगाम हा व्यवसाय मंदीच्या सावटाखाली अाला होता. किमान अागामी हंगाम तरी अाता यातून बाहेर काढेल, अशी अपेक्षा हे यंत्र निर्माते व्यक्त करीत अाहेत.

गेल्या काळात झालेली नोटाबंदी, त्यानंतर लागू झालेली जीएसटी यासारख्या धोरणांचा कृषी यंत्रनिर्मात्यांना मोठा फटका सहन करावा लागला. गेले दोन हंगाम हा व्यवसाय मंदीच्या सावटाखाली अाला होता. किमान अागामी हंगाम तरी अाता यातून बाहेर काढेल, अशी अपेक्षा हे यंत्र निर्माते व्यक्त करीत अाहेत.

नागपूर -अौरंगाबाद मार्गाने जाताना उंद्री (ता. चिखली) नावाचे गाव लागते. हे गाव कृषी यंत्रनिर्मितीसाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेशात लौकिकास अालेले अाहे. गेली २५ ते ३० वर्षे हा व्यवसाय या गावात टिकून अाहे. काळानुरूप त्याचा सातत्याने विस्तारही झाला. अागामी हंगामासाठी सध्या शेतकऱ्यांची जशी हालचाल सुरू झाली, तशीच लगबग या गावात यंत्रनिर्मिती करणाऱ्यांमध्ये अाहे.

हंगामाच्या दृष्टीने ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्र, नांगर, रोटाव्हेटर, तसेच बैलांच्या साह्याने काम करू शकणारी अवजारे बनविले जातात. या ठिकाणची अवजारे सर्वत्र प्रसारित होत असतात. गेल्या काही वर्षांत शेतीत जसे यांत्रिकिकरण वाढले, तशी या यंत्रचलित अवजारांच्या मागणीत वाढच झाली. शिवाय शासनाने उन्नत शेती अभियानातून यांत्रिकरणाला प्रोत्साहन देत ट्रॅकर व इतर अवजारांचे अनुदानावर वाटप केल्याचा फायदा या व्यवसायाला होत अाहे.

नोटाबंदीनंतर या व्यवसायाची मोठी हानी झाली. शेतीला लागणाऱ्या अवजारांची मागणीच घटली होती. नंतरच्या काळात जीएसटी लागू झाल्याने दरातही वाढ झाली. याचा सारासार परिणाम या व्यवसायाने भोगला. लोखंडाच्या दरात होणारी वाढ हीसुद्धा अवजारांच्या किंमतवाढीला कारणीभूत ठरत असते.  अाता परिस्थितीत थोडी सुधारणा दिसून येत असल्याने या अवजारांची विक्री वाढेल असे व्यावसायिकांना वाटते अाहे. उंद्रीसारख्या गावात ३० ते ३५ निर्मात्यांकडे अवजारे, यंत्र बनविण्याचे काम सुरू अाहे. येणाऱ्या हंगामात शेतकऱ्याला जसे चांगले पीकपाणी येईल अशी अपेक्षा राहते, तशीच अाशा शेतकरी अवजारे विकत घेण्यासाठी

रोजगारनिर्मिती करणारा उद्योग
शेती अाधारित यंत्र-अवजारे बनविणारा हा उद्योग उंद्री गावात सर्वाधिक फोफावला. २५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उद्योगांची संख्या सध्या ३० ते ३५ दरम्यान पोचली. या माध्यमातून ३०० ते ३५० जणांना वर्षभर रोजगार मिळाला. असंख्य शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या हातांना यातून काम मिळाले. सध्या उंद्री व लगतच्या काही गावांतील बेरोजगारांची संख्या कमी करण्यास या उद्योगाने मोठा हातभार लावला अाहे.

प्रतिक्रिया :
मागील काही हंगामात शेतीला लागणाऱ्या अवजारांना कमी मागणी होती. त्याचे चटके या उद्योगाने भोगले. यंदा किमान ही परिस्थिती बदलेल असे वाटते अाहे. विविध यंत्र, अवजारे बनविण्यासाठी कारागिरांचे हात दिवसरात्र झटत अाहेत. चांगले दिवस यावेत हीच अपेक्षा.
अप्पाजी गुंजकर,अवजारे निर्माता, उंद्री, जि. बुलडाणा

इतर ताज्या घडामोडी
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...
येवला तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी वणवणनाशिक : कमी पावसामुळे येवला तालुक्यात पाणीटंचाई...
हवामानविषयक समस्यांमुळे शेतीवर परिणाम ः...परभणी ः जागतिक तापमान वाढ, पावसातील अनियमितता,...
मतदार यादीत वाढला महिलांचा टक्कानगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा...
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना...परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे...
गुलटेकडीत भाजीपाल्याची आवक कमी; दर वाढलेपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
यंदा मतदानात महिला पुरुषांना मागे टाकणारनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये पुरुषांपेक्षा...
शक्तिशाली उल्कापातापासून बचावली पृथ्वीपुणे ः अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’...
संत्रा बागांना उरला केवळ टॅंकरचा आधारअमरावती : संत्रा बागा जगविण्यासाठी...
मराठवाड्याच्या पाण्यासाठी फक्त बोलून...परभणी : केवळ जायकवाडीच्या हक्काच्या...
राज्यात चार हजाराने मतदान केंद्रे वाढलीमुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात...
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचा...मुंबई : गेले सहा महिने विविध समविचारी पक्षांशी...
चंद्रपूर : बांगडेंच्या उमेदवारीने...चंद्रपूर : गेल्या पंधरवाड्यापासून चंद्रपूर...
प्रियांका गांधींचा नागपुरात होणार रोड शोनागपूर ः काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ...
अमरावती लोकसभेसाठी होईल दुहेरी लढतअमरावती : शिवसेनेकडून दोनदा संसदेत गेलेल्या...
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...