ज्वारीच्या संकरित जातींचा वापर फायदेशीर

ज्वारीच्या संकरित जातींचा वापर फायदेशीर
ज्वारीच्या संकरित जातींचा वापर फायदेशीर

ज्वारीच्या संकरित जातींचे सुधारित जातींपेक्षा अधिक धान्य व कडबा उत्पादन मिळते. लवकर पक्व होणाऱ्या, चमकदार दाणे असणाऱ्या व रोगकिडींना प्रतिकारक्षम अशा अनेक संकरित जाती आहेत. त्यामुळे अशा जातींची खरीप हंगामातील पेरणीसाठी निवड केल्यास ते फायदेशीर ठरते. सीएसएच – १४ अखिल भारतीय स्तरावर १९९२ साली शिफारस केलेल्या या वाणापासून हेक्टरी ३७-४० क्विंटल धान्याचे, तर ८५-९० क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते. १००-१०५ दिवसांत काढणीस तयार होते.

सीएसएच – १६ मध्यम ते भारी जमिनीसाठी हे वाण प्रसारित केले आहे. १०५-११० दिवसांत पक्व होते, उंची १९०-२०० सें.मी. असून, धान्य उत्पादन ४०-४५ क्विंटल तर कडबा उत्पादन ९५ ते १०० क्विंटल प्रतिहेक्टर मिळते. सीएसएच – २३ हे संकरित वाण लवकर परिपक्व (१०५ दिवस) होते. दाण्यावरील बुरशी रोगास प्रतीकारक्षम असून, हेक्टरी ४० क्विंटल धान्याचे, तर ८०-९० क्विंटल कडबा उत्पादन मिळते. सीएसएच – ३० हे वाण लवकर येणारे असून, बुरशी, खोडमाशी अाणि खोडकिड्यास सहनशील आहे. दाण्याचा रंग मोत्यासारखा पांढरा असून, भाकरी आणि कडब्याची प्रत उत्तम आहे. हेक्टरी ३८-४० क्विंटल धान्याचे, तर ९०-१०० क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते.

सी. एस. एच. २५ (परभणी साईनाथ) उंच वाढणारे आणि धान्य, कडबा उत्पादन अशा दुहेरी हेतूसाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे प्रसारित करण्यात अाले अाहे. बुरशी रोगास प्रतिकारक असून, ११८-१२० दिवसांत पक्व होते. हेक्टरी ४०-४५ क्विंटल धान्य उत्पादन आणि १२०-१३० क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते. एस. पी. एच. १६४१ हे दुहेरी उपयुक्त संकरित वाण राज्यस्तरावर प्रसारित करण्यात आले. दाण्यावरील बुरशी रोग, खोडमाशी व खोडकिडीस सहनशील असून, भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे. हेक्टरी ४५ ते ५० क्विंटल धान्य, तर १४२ ते १४५ क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळते.

संपर्क : डॉ. एस. पी. म्हेत्रे, ०२४५२ - २२११४८ (ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com