जैवविविधतेच्या नेमकेपणासाठी विचार आवश्यक

जैवविविधतेच्या नेमकेपणासाठी विचार आवश्यक
जैवविविधतेच्या नेमकेपणासाठी विचार आवश्यक

जैवविविधता आणि त्यातील बदलांचा नेमका मागोवा घेण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि खंड पातळीवरील बदलांचाही अंदाज घेण्याची आवश्यकता येल विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने उत्तर अमेरिकेतील घरटे करणाऱ्या पक्ष्यांच्या गेल्या ५० वर्षांतील माहितीसाठा आणि आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जैवविविधतेतील बदल आणि त्यातील फरक लक्षणीयरीत्या आढळले आहेत. हे संशोधन ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

मॅक्स प्लॅंक-येल सेंटर फॉर बायोडायव्हर्सिटी मूव्हमेंट अँड ग्लोबल चेंज येथील प्रा. वॉल्टर जेट्झ यांनी सांगितले, की जैवविविधतेमध्ये स्थानिक आणि जागतिक पातळीवर सातत्याने बदल होत आहेत. काही स्थानिक प्रजाती लुप्त होतात, तर काही प्रजाती नव्याने आढळतात. अमेरिकेतील आणि जगभरातील पक्ष्यांचा अभ्यास करताना काही पॅटर्न लक्षात येतात. मात्र, एखाद्या प्रजातीचा स्थानिक किंवा प्रदेशपातळीवर अल्पसा ऱ्हास दिसत असला तरी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर त्या प्रजातीमध्ये वाढ दिसून येऊ शकते. तरीही जागतिक किंवा खंडात्मक पातळीवर एकूण विचार करता प्रजातीचा ऱ्हास होत असल्याचेही लक्षात येते. एकूण जैवविविधतेचा विचार करताना संख्यात्मक पातळीपेक्षा स्केलचा विचार आवश्यक असल्याचे मत मार्ता जार्झियाना यांनीही व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, जैवविविधता शास्त्र म्हणून अभ्यासणाऱ्या संशोधकांनी एकाच वेळी विविध पातळ्यांवर विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com