झाडावरील अतिपानोळ्याचाही चिंचेच्या परपरागीभवनामध्ये अडथळा निर्माण होतो.
झाडावरील अतिपानोळ्याचाही चिंचेच्या परपरागीभवनामध्ये अडथळा निर्माण होतो.

चिंच फळधारणेसाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आवश्‍यक

चिंच फळझाडाच्या फळधारणेसाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलित प्रमाणात पुरवठा करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्याशिवाय पाण्याची अतिरिक्त मात्रा न देणे, पानोळा व्यवस्थापन व व्योग्य पाणीव्यवस्थापन या बाबीही महत्त्वाच्या आहेत. अन्नद्रव्यांचे व संजीवकांचे असंतुलन : चिंच बागांना लागवडीनंतर रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांची पुरेशी मात्रा दिली जात नाही.  मात्र वाढ, फुलधारणा व फळधारणेसाठी खते, सूक्ष्म मूलद्रव्ये व संजीवके यांची आवश्‍यकता असते. त्यांच्या कमतरतेमुळे झाडे खुरटलेली राहून फळधारणेवर विपरित परिणाम होतो. उपाययोजना : पिकास जुन - जुलै महिन्यात २५ किलो कुजलेले शेणखत अधिक नत्र २०० ग्रॅम, स्फुरद २०० ग्रॅम व पालाश २०० ग्रॅम प्रतिझाड अशी खते द्यावी. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रतिझाड अमोनियम सल्फेट २५० ग्रॅम किंवा युरिया १०० ग्रॅम द्यावे. संजीवकांच्या फवारण्या कराव्यात. फवारणी

  • वेळ : चिंच काढणीनंतर फुलधारणा होण्यापूर्वी
  • प्रमाण : प्रतिलिटर पाणी क्लोरमॅक्वाट क्लोराईड १.५ ग्रॅम किंवा इथेफाॅन ०.५ ग्रॅम अधिक एन.ए.ए. १०० मिलिग्रॅम अधिक झिंक सल्फेट ५ ग्रॅम अधिक फेरस सल्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १५ ग्रॅम
  • सूचना : १५ दिवसांच्या अंतराने ३ वेळा फवारावे.
  • अतिपानोळ्याचा परपरागीकरणासाठी अडथळा : चिंचेस भरपूर पाने असतात. परिणामी परागकण पानांमध्ये अडकून मादी फुलांजवळ पोचत नाहीत. त्यामुळे निसर्गत: परपरागीकरण कमी होते. एखाद्यावर्षी जादा तर पुढीलवर्षी कमी फळधारणा होते. उपाययोजना : फळांची मार्च - एप्रिलमध्ये तोडणी करताना काठीने पानोळ्यास झोडून तो झाडून टाकावा. म्हणजे परपरागीकरणासाठी मोठ्या पानोळ्याचा अडथळा होत नाही. काठीने झोडपल्याने फुटव्यांचीही संख्या वाढते.

    सलग बागांची लागवड नसणे : बांधांवर एकटेदुकटे झाड असल्यास परपरागीकरण कमी होते. सलग बागातही दोन झाडांतील अंतर कमी असल्यास  बागेत हवा खेळती राहत नाही. चिंचेच्या सर्व फांद्यांना अधिक काळ ऊन हवे असते. अन्यथा सावलीतील फांद्या फळाशिवाय व उन्हातील फांद्यांना अधिक फळे येतात. उपाययोजना : बांधांवर चिंचेची अनेक झाडे लावावीत. शेतात लागवडीसाठी दोन झाडातील अंतर ३३ x ३३ फूट ठेवल्यास भरपूर हवा खेळती राहते.

    संपर्क : डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४,   (विभागीय फळसंशोधन केंद्र, हिमायतबाग, आैरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com