फुले ०९०५७ : गुळासाठी उसाची नवीन जात

गुळासाठी उसाची जात कोएम ०९०७० व तिचे रोगमुक्त वाढे
गुळासाठी उसाची जात कोएम ०९०७० व तिचे रोगमुक्त वाढे

सध्या गूळनिर्मितीसाठी उसाची को ९२००५ ही जात प्रामुख्याने वापरली जाते. मात्र राज्याच्या बहुतांश भागात तिचे उत्पादन कमी मिळते. तसेच रोगांचा प्रादुर्भावही भरपूर प्रमाणात होतो. मात्र यंदा गुळउत्पादनासाठी पुर्वप्रसारित करण्यात आलेली ऊस जात कोएम ०९०५७ ही राज्यातील सर्वच भागात लागवडीस उत्तम असून उताराही चांगला आहे. भारतात ऊस उत्पादनापैकी जवळपास १६ टक्के ऊस गूळ उत्पादनासाठी वापरला जातो. सद्यस्थितीत को ९२००५  या जातीच्या उसाचा गूळनिर्मितीसाठी वापर केला जातो. मात्र या जातीत काही त्रुटी असल्यामुळे तिला कोएम ०९०५७ ही जात पर्याय आहे.  

को ९२००५ जातीतील त्रुटी

  • ही जात कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात, जास्त पावसाच्या, हलक्या, निचऱ्याच्या तांबड्या जमिनीत चांगली वाढते. मात्र मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील खोल काळ्या जमिनीत चांगल्याप्रकारे वाढत नाही.
  • जास्त पावसाच्या भागातही अलीकडे या जातीवर तांबेरा, तपकिरी ठिपके या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो.
  • कोएम ०९०५७ जातीबाबत

  • ही यावर्षी पूर्वप्रसारीत केलेली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जास्त पावसाच्या प्रदेशात तसेच मध्य महाराष्ट्रातील खोल काळ्या जमिनीतही ही जात उत्तम प्रकारे वाढते.
  • या जातीपासून उत्तम प्रतीचा गूळ तयार होतो.
  • कोएम ०९०५७ या जातीची पैदास को ९४०१२ या जातीवर को ७७५, को ९४००८, को ८६०११, आय.एस.एच. ६९, कोटी ८२०१, कोव्ही ९२१०२, को ८६२४९ आणि को ६२१९८ या नर जातींचा संकर करून केलेली आहे.
  • कोएम ०९०५७ जातीची वैशिष्ट्ये      

  • मध्यम ते भारी जमीन, काही प्रमाणात चोपण जमिनीतही चांगली येते.
  • १२ ते १४ महिन्यांत पक्व होते.
  • कोणत्याही रसायनाशिवाय फक्त भेंडीचा वापर करून या जातीपासून “अ” ग्रेडचा गूळ तयार होतो.
  • सरळ वाढते, खोल व काळ्या जमिनीत लोळत नाही.
  • पाण्याचा ताण सहन करते.
  • वाढ्यावर अजिबात कूस नाही.
  • उसाची जाडी (३.१७ सें.मी.) असून सरासरी वजनही (१.६४ किलो) इतर जातींपेक्षा अधिक आहे.
  • कांडी किडीस कमी प्रमाणात बळी पडते.
  • काणी रोगास प्रतिकारक्षम असून पानावरील तपकिरी ठिपके, तांबेरा या रोगांना कमी प्रमाणात बळी पडते.
  • तुरा उशिरा व कमी प्रमाणात येतो.
  • पाचट सहज निघते, त्यामुळे ऊस तोडणी सुलभ होते.
  • खोडवा मध्यम प्रतीचा आहे.
  • कोएम ०९०५७ जातीची वैशिष्ट्ये      

    ऊस व साखर उत्पादन

                         को.एम. ०९०५७ या ऊस जातीचे हंगामनिहाय उत्पादन

    क्र. हंगाम     ऊस उत्पादन (मे.टन प्रति हे.)     साखर उत्पादन (मे.टन प्रति हे.)
    १     सुरू    १११.७५     १४.२५
    २     पूर्व हंगाम     १२६.५१     १७.८८
    ३    खोडवा    ९५.७१     १३.०६

                      को. ९२००५ व को.एम.०९०५७ या जातींच्या गुळ उत्पादनाची तुलना

    क्र.    जात    ऊस उत्पादन (मे.टन प्रति हे.)     गूळ उत्पादन (मे. टन प्रति हे.)    गुळाच्या उत्पादनातील वाढ (टक्के)   गुळाची ग्रेड
    १     कोएम ०९०५७    १२३.०७     १६.६०     १२.१७     अ
    २     को ९२००५     ११८.०९    १४.८०     ---     अ

    संपर्क : डॉ. रामदास गारकर, ८२७५४७२९९५ (ऊस पैदासकार, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com