उपवासाने मूलपेशींच्या क्षमतेत होते वाढ

२४ तास उपाशी ठेवलेल्या उंदराच्या आतड्यातील मूलपेशींद्वारे अधिक प्रमाणात ऑर्गेनॉईडची निर्मिती होते. (उजव्या बाजूला) तुलनेसाठी नियमित आहार घेतलेल्या उंदराच्या पेशी. (डावीकडे)
२४ तास उपाशी ठेवलेल्या उंदराच्या आतड्यातील मूलपेशींद्वारे अधिक प्रमाणात ऑर्गेनॉईडची निर्मिती होते. (उजव्या बाजूला) तुलनेसाठी नियमित आहार घेतलेल्या उंदराच्या पेशी. (डावीकडे)

वाढत्या वयाबरोबरच मूलपेशींच्या कार्यक्षमतेमध्ये होणारी घट रोखण्यासाठी २४ तासांचा उपवास फायद्याचा ठरत असल्याचे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील नवीन अभ्यासात दिसून आले आहे. या प्रयोगामध्ये केवळ वृद्धच नव्हे तर तरुण उंदरातील मूलपेशींची क्षमता उपवासामुळे वाढत असल्याचे आढळले आहे.

जसेजसे वय वाढत जाते, तसे माणसांच्या आतड्यातील पेशींची निर्मिती होण्याची क्षमता कमी होत जाते. त्यासाठी स्रोत म्हणून कार्य करणाऱ्या मूलपेशींचे काम कमी अथवा बंद झाल्याने पचनसंस्थेमधील प्रादुर्भावांचे प्रमाण वाढते. या मूलपेशींच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी २४ तासांचा उपवास उपयुक्त ठरत असल्याचे एमआयटी येथील जीवशास्त्रज्ञ प्रा. डेव्हिड सबातिनी यांना आढळले आहे. अशा उपवासाचा फायदा वृद्धासोबतच तरुण उंदरांमध्ये झालेला आढळला. उपवासाच्या स्थितीमध्ये पेशी ग्लुकोजऐवजी मेदाम्लांचे विघटन सुरू करतात. या बदलामुळे मूलपेशी अधिक कार्यान्वित होऊन नवीन निर्मिती करू लागतात. त्याचप्रमाणे चयापचयाच्या प्रक्रियेलाही वेग येतो. त्याचा फायदा पचनसंस्थेचे विकार आणि केमोथेरपी उपचार सुरू असणाऱ्या कर्करोगी रुग्णांना होत असल्याचे संशोधकांचे मत आहे. हे संशोधन ‘जर्नल सेल स्टेमसेल’ मध्ये प्रकाशित झाले आहे. (स्रोत ः मारिया मिहायलोव्हा, चिया- वेई चेंग)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com