पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार साजरा

मधमाशी संवर्धन
मधमाशी संवर्धन

संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून जाहीर झाला. मधमाश्यांसह इतरही परागसिंचक कीटकांचे महत्त्व जाणून त्यांचे संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवण्यासाठी रविवारी (ता. २०) पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिवस जगभर साजरा करण्यात येणार आहे.

गतवर्षी जागतिक मधमाशी दिवस प्रकल्पाचे प्रमुख आणि प्रजासत्ताक स्लोव्हेनियाचे उपपंतप्रधान डेजान झिदान यांनी संयुक्त राष्ट्रसंघात सादर केलेल्या ठरावास ११५ देशांचा पाठिंबा मिळाला. मधमाशी संरक्षणासाठी सर्व देशांनी जनजागृतीची मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले होते.   मधमाश्या फुलांतील पुष्परस गोळा करून मध तयार करतात, तसेच परागसिंचन करून पिकांच्या उत्पादनातही लक्षणीय भर घालतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घालतात. मधमाशीस ‘महाराष्ट्राचा कीटक’ असा दर्जा देऊन, मधमाश्यांच्या संरक्षणाची गरज पुणे येथील केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक डॉ. र. पु. फडके यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया मधमाश्यांच्या संरक्षणाबाबत केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे. त्यांच्या संरक्षणाचा संदेश जगभरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचविण्याचे काम प्रत्येक देशांनी करायला हवे. तसेच प्रत्यक्ष कृती कार्यक्रमही हाती घ्यायला हवेत. डेजान झिदान , (प्रमुख, जागतिक मधमाशी दिवस प्रकल्प ) अमेरिकेने टास्क फोर्स गठीत करून मधमाश्यांच्या वसाहती वाढविल्या. आपल्या देशात, राज्यातसुद्धा मधमाश्यांचे संवर्धन, संरक्षणासाठी अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा लागेल. डॉ. र. पु. फडके, ( निवृत्त संचालक, केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्था, पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com