agricultural news in marathi,news about inclusion of vitamin b -12 in veg diet, Agrowon, Maharashtra | Agrowon

शाकाहारामध्येही ‘बी १२’ जीवनसत्त्वाचा अंतर्भाव शक्य
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

शाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी केन्ट विद्यापीठातील संशोधकांनी जीवनसत्त्व बी १२ (कोबॅलमिन) अंतर्भाव करण्याचा सल्ला दिला आहे. वनस्पतिजन्य आहारातून त्याची पूर्तता होत नसल्याने या घटकाची कमतरता शाकाहारी (व्हेजिटेरियन किंवा व्हेगान्स) लोकांमध्ये आढळते.  

 

शाकाहारी आहार अधिक पोषक व संतुलित होण्यासाठी केन्ट विद्यापीठातील संशोधकांनी जीवनसत्त्व बी १२ (कोबॅलमिन) अंतर्भाव करण्याचा सल्ला दिला आहे. वनस्पतिजन्य आहारातून त्याची पूर्तता होत नसल्याने या घटकाची कमतरता शाकाहारी (व्हेजिटेरियन किंवा व्हेगान्स) लोकांमध्ये आढळते.  

 

विद्यापीठातील जैवशास्त्र विद्यालयातील संशोधक प्रा. मार्टिन वॉरेन यांच्या नेतृत्त्वाखालील गटाने बागेमध्ये वाढणारी क्रेस ही वनस्पती कोबॅलमीन घेऊ शकत असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांनी ११ आणि १२ मुलांच्या साह्याने विद्यालयाच्या बागेमध्ये क्रेस हे गवत माध्यमामध्ये बी १२ मिसळून वाढवण्याचा प्रयत्न केला. सात दिवसांमध्ये जमिनीमध्ये मिसळलेले बी १२ पानांपर्यंत पोचते. ही वनस्पती माध्यमामध्ये (माती किंवा अन्य) उपलब्ध असलेल्या कोबॅलमीनच्या प्रमाणानुसार शोषण करते. ते पानामध्ये जमा होते. असा पोषक घटकांचा अंतर्भाव असलेल्या पानांचा आहारामध्ये वापर केल्यास शाकाहारी व्यक्तींना फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे खाद्य वनस्पतीमध्येही प्रयोग करण्यात येणार असून, ते शाकाहारी व्यक्तींना खाण्यामध्ये कोणताही अडचण नसेल. त्यामुळे शाकाहारामध्ये बी १२ ची उपलब्धता करणे शक्य होईल.

 

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...