agricultural news in marathi,news about probiotics in diet of honey bee, Agrowon, Maharashtra | Agrowon

मधमाश्यांच्या आहारातील प्रोबायोटिक्स वाचवते बुरशीजन्य रोगापासून
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

गेल्या वीस वर्षांपासून मधमाश्यांच्या वसाहती नष्ट
होण्याचे प्रमाण युरोप आणि उत्तम अमेरिकेमध्ये वेगाने वाढत आहेत. त्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे नोजमॉसिस या बुरशीचा प्रादुर्भाव. वसाहतीतील बुरशीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मधमाश्यांच्या आहारामध्ये प्रोबायोटिक्स घटकांचा वापर फायद्याचा ठरू शकतो. प्रोबायोटिक्स घटकांच्या आहारातील वापरामुळे बुरशीजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर ४० टक्क्याने कमी होऊ शकत असल्याचे युनिव्हर्सिटे लावल येथील संशोधकांनी ‘फ्रंटियर्स इन इकॉलॉजी अॅण्ड इव्हॅल्युशन’मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये नमूद केले आहे.

गेल्या वीस वर्षांपासून मधमाश्यांच्या वसाहती नष्ट
होण्याचे प्रमाण युरोप आणि उत्तम अमेरिकेमध्ये वेगाने वाढत आहेत. त्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे नोजमॉसिस या बुरशीचा प्रादुर्भाव. वसाहतीतील बुरशीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी मधमाश्यांच्या आहारामध्ये प्रोबायोटिक्स घटकांचा वापर फायद्याचा ठरू शकतो. प्रोबायोटिक्स घटकांच्या आहारातील वापरामुळे बुरशीजन्य रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर ४० टक्क्याने कमी होऊ शकत असल्याचे युनिव्हर्सिटे लावल येथील संशोधकांनी ‘फ्रंटियर्स इन इकॉलॉजी अॅण्ड इव्हॅल्युशन’मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये नमूद केले आहे.

नोसेमॉसिस (त्यालाच नोसेमा रोग असेही म्हणतात) हा नोसेमा सेरानाई या एकपेशीय बुरशीमुळे होतो. ही बुरशी मधमाश्यांच्या शरीरामध्ये आहारासोबत प्रवेश करते आणि पचनसंस्थेच्या भित्तिकांवर वाढते. सामान्य स्थितीमध्ये या बुरशीचा मधमाशीसाठी फारशी हानीकारक नसते. मात्र, मधमाशीमध्ये ताणाची स्थिती आल्यानंतर प्रतिकारक शक्ती कमी होते. त्या वेळी मध्ये ही बुरशी मधमाशीच्या अन्न शोधणे, दिशांची माहिती, नवजात अळ्यांची काळजी घेणे अशा विविध क्रियांवर मर्यादा आणते असल्य. परिणामी मधमाश्यांचा मृत्यूचा दर वाढत असल्याचे युनिव्हर्सिटे लावल येथील शास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील प्रा. निकोलक डेरोमी यांनी सांगितले.  

नोसेमॉसिस वर उपचार करण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो. मात्र, बुरशीमध्येही प्रतिजैविकांमध्ये प्रतिकारकता विकसित होत असल्याने त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे. त्या प्रमाणे प्रतिजैविके पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूंनाही मारतात. त्यामुळे या रोगावर चांगला उपाय शोधण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न चालू होते.

डेरोमी यांनी प्रयोगशाळेमधील जाळ्यांमध्ये केलेल्या प्रयोगामध्ये मधमाश्यांमध्ये नोसेमॉसिस रोखणे आणि उपचार करणे यातील चार प्रोबायोटिक घटकांची कार्यक्षमता मोजण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोन प्रोबायोटिक घटक बॅक्टोसेल आणि लेव्हूसेल हे पोर्क, चिकन, कोळंबी आणि सॅलमोनॉईड उद्योगात वापरले जातात. अन्य दोन प्रोबायोटिक घटक आरोग्यपूर्ण मधमाश्यांच्या पचनसंस्थेतील वेगळे केलेले जिवाणू आहेत. हे चारही प्रोबायोटिक घटक साखरेच्या पाण्यात मिसळून मधमाश्यांना देण्यात आले. दोन आठवड्यांच्या चाचण्यानंतर प्रोबायोटिक घटक देत असलेल्या मधमाशी गटामध्ये मृत्यूचा दर हा २० ते ४० टक्क्याने कमी झाल्याचे दिसून आले.  या प्रोबाटिक घटकामुळे मधमाशीतील बुरशीचा प्रादुर्भाव कमी झाला नसला तरी तो सहन करण्याची मधमाश्यांची क्षमता वाढल्याचे निदर्शनास आले.

 

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...