राहुरी येथे मधमाशीविषयक प्रशिक्षणाचे उद्या आयोजन

मधमाशी पालन
मधमाशी पालन

राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष महत्त्व आहे. मधुमक्षिका पालनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने रविवारी (ता. २०) महात्मा फुले कृषी विद्यापीठात विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केल्याची माहिती प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली. पाच लाख वसाहतींची आवश्‍यकता असताना राज्यात केवळ बारा हजार मधमाशा वसाहती आहेत. विविध कारणाने मधमाश्यांची संख्या कमी होत आहे. मधमाश्या पिकांकडे आकर्षित करण्यासाठी काकडी, कांदा, कारले या पिकांवर साखर पाणी, मध, मळी, गूळ पाणी, उस किंवा फळांचा रस यांची फवारणी उपयुक्त ठरते. प्रशिक्षणात दिनकर पाटील, डॉ. उत्तम सहाणे, नानासाहेब इंगळे मधमाशी पालनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या कल्पनेतून दोन वर्षांपूर्वी विद्यापीठात मधुमक्षिका पालन प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले गेले. चाळीस मधपेट्या कांदा बीजोत्पादनामध्ये डिसेंबर ते मार्च या कालावधीत ठेवून तुलनात्मक अभ्यास केला असता मधमाश्यांमुळे कांद्याची फुलधारणा व बियाण्यांचे प्रमाण वाढल्याचे आढळले. बियाणे उत्पादनात २८ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली.मधमाशीपालन ही एक चळवळ व्हावी, असा कृषी विद्यापीठाचा हेतू असून, या बाबतीत सर्व मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाईल.- डाॅ. के. पी. विश्वनाथा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com