वासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण यावर चर्चासत्र

वासरातील प्राणघातक हगवण
वासरातील प्राणघातक हगवण

मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या गोरेगाव परिसरामध्ये सोमवारी (ता. २५) वासरातील प्राणघातक हगवणीचे नियंत्रण या विषयावर महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यावर आधारित चाचणी परीक्षेचेही आयोजन केले होते.

व्हिरबॅक अॅनिमल हेल्थ या संस्थेतर्फे ‘वासरातील प्राणघातक हगवण व नियंत्रण’ या विषयावर डॉ. उत्तरेश्वर सुरवसे यांनी व्याख्यान दिले. व्याख्यानानंतर संस्थेतर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चाचणी परीक्षाही घेण्यात आली. या परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयस्तरीय बक्षीस आणि प्रशस्तीपत्र मिळणार आहे. हे तीन विद्यार्थी व्हिरबॅक अॅनिमल हेल्थतर्फे आयोजित राष्ट्रीय चाचणी परीक्षेसाठी पात्र राहतील. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी डॉ. आर. व्ही. गायकवाड, डॉ. डी. यु. लोखंडे, डॉ. जी. यु. यादव व डॉ. एस. डी. त्रिपाठी या पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. एल. धांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाचे सर्व विद्यार्थ्यांनी यात सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com