agricultural news in marathi,news regarding development of robot for apple harvesting, Agrowon, Maharashtra | Agrowon

सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता विद्यार्थ्यांची सृजनशीलता पणाला
वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक समस्यांवर मार्ग काढणे शक्य आहे. त्या अनुषंगाने सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीचे आव्हान कॅलिफोर्निया विद्यापीठातील यांत्रिकीकरण विभागाने विद्यार्थ्यांना दिले आहे. त्याला प्रतिसाद देत अमेरिका, कॅनडा आणि चीन येथील महत्त्वाच्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या १९ गटांनी भाग घेतला आहे.

तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक समस्यांवर मार्ग काढणे शक्य आहे. त्या अनुषंगाने सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीचे आव्हान कॅलिफोर्निया विद्यापीठातील यांत्रिकीकरण विभागाने विद्यार्थ्यांना दिले आहे. त्याला प्रतिसाद देत अमेरिका, कॅनडा आणि चीन येथील महत्त्वाच्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या १९ गटांनी भाग घेतला आहे.

शेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे आव्हान मोठे आहे. अनेक कामे ही त्यातील कौशल्यांच्या मागणीमुळे मनुष्यबळावरच अवलंबून असतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मनुष्यबळाची कमतरता प्रगत देशांमध्ये वेगाने जाणवत आहे. देण्यात आले होते. ‘२०१८ एएसएबीई स्टूडंट रोबोटिक्स चॅलेंज’ या स्पर्धेचे आयोजन कॅलिफोर्निया विद्यापीठातील कृषी यांत्रिकीकरण तज्ज्ञ अॅलिरेझा पौर्रेझा यांनी केले होते.

  • कृषी क्षेत्रावरील लोकसंख्येचा ताण सातत्याने वाढत असून, पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे आव्हान वाढत आहे. अशा स्थितीमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची आवश्यकताही वाढत आहे. प्रगत देशांमध्ये शेतीतील मनुष्यबळ वेगाने कमी होत असून, कामांसाठी माणसांची उपलब्धता होत नाही. शेतीतील यांत्रिकीकरणाचा, रोबोटिक्सचा वेग आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. यासाठी तरुण, विद्यार्थी यांच्या सृजनशीलतेची मदत घेण्यात येत असल्याचे अॅलिरेझा पौर्रेझा यांनी सांगितले.
  • यात प्राथमिक पातळीवरील पदवीपूर्व आणि पदवीधर अशा दोन प्रकारातील विद्यार्थी गटांनी भाग घेतला. त्यांच्यासाठी आव्हान होते, ते सफरचंदाची स्वयंचलित काढणीचे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये व्यावसायिकरीत्या सफरचंदाच्या फळबागांचे व्यवस्थापन केले जाते. सफरचंद बागेतील काढणीसाठी आवश्यक ती रोबोटिक यंत्रांचे आरेखन व निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात ८ फूट बाय ८ फूट क्षेत्रामधील बागेमधील चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

त्यातील उद्दिष्ट्ये :

  • सुमारे ८ योग्य रीतीने पक्व (गडद लाल रंगाची, योग्य आकार असलेल्या फळांची काढणी,
  • खराब, रोगग्रस्त, लहान आकारातील ८ फळे वेगळी करणे व नष्ट करणे.
  • अपक्व हिरवी फळे न तोडता झाडावर तशीच ठेवणे.
  • शुक्रवार (ता. १३) रोजी  या १९ गटांनी तयार केलेल्या रोबोटच्या चाचण्या डेट्रॉईट येथील ‘अमेरिकन सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चरल अॅण्ड बायोलॉजिकल इंजिनिअर्स’ च्या फार्मवर घेण्यात आल्या. त्यांचे परीक्षण संस्थेच्या आंतरराष्ट्रीय वार्षिक बैठकीमध्ये करण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...