agricultural news in marathi,news regarding use of liquid carbon di oxide for plants, Agrowon, Maharashtra | Agrowon

द्रवरूप कार्बन डायऑक्साईड ठरेल पिकांसाठी फायद्याचा
वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

द्रवरूप कार्बन डायऑक्साईडच्या फवारणीमुळे लेट्यूस भाज्याच्या उत्पादनामध्ये चार पटीने वाढ होत असल्याचे अमेरिकेतील झालेल्या चाचण्यामध्ये दिसून आले आहे. सध्या कॅलिफोर्नियामध्ये पिकांच्या उत्पादन वाढीसाठी हरितगृहांमध्ये वायुरूप कार्बन डायऑक्साईडचा वापरही वाढत आहे.

द्रवरूप कार्बन डायऑक्साईडच्या फवारणीमुळे लेट्यूस भाज्याच्या उत्पादनामध्ये चार पटीने वाढ होत असल्याचे अमेरिकेतील झालेल्या चाचण्यामध्ये दिसून आले आहे. सध्या कॅलिफोर्नियामध्ये पिकांच्या उत्पादन वाढीसाठी हरितगृहांमध्ये वायुरूप कार्बन डायऑक्साईडचा वापरही वाढत आहे.
लेट्यूस भाजीचे जागतिक मार्केट २६.८ दशलक्ष टन प्रतिवर्ष इतके असून, त्यातील अमेरिकेमध्ये ४ दशलक्ष टन प्रतिवर्ष (१५.२ टक्के) इतके उत्पादन अमेरिकेमध्ये होते. त्यातील ९० टक्के अमेरिकन लेट्यूस हे कॅलिफोर्निया राज्यामध्ये होते. लेट्यूसची घाऊक बाजारातील किंमत १.१७ डॉलर प्रतिकिलो असून, एकूण जागतिक बाजारपेठेमध्ये प्रतिवर्ष सुमारे ३० अब्ज डॉलर इतकी उलाढाल आहे. त्यामुळे या पिकामध्ये उत्पादनवाढीच्या मोठ्या संधी आहेत.  
अमेरिकेतील मिन्निसोटा येथील सेंट क्लाऊड राज्य विद्यापीठामध्ये द्रवरूप कार्बन डायऑक्साईडच्या लेट्यूस या भाजीवर फवारण्या घेण्यात आल्या. दर १५ मिनिटांनी चार तासांसाठी घेतलेल्या या फवाऱ्यामुळे रोमेन लेट्यूस भाज्यांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण चार पटीने वाढल्याचे दिसून आले. अधिक हरितद्रव्य असल्यास पिकाची वाढ वेगाने आणि अधिक प्रमाणात होते. टोरॅंटो येथील सीओ२ ग्रो या खासगी कंपनीने द्रवरुप कार्बन डायऑक्साईड फवारणीसाठी तयार केला आहे.
लेट्यूस उत्पादनामध्ये द्रवरूप कार्बन डायऑक्साईडच्या फवारणीचे प्रयोग घेण्यात आले. त्यातून मिळणारे उत्पादन हे कमी पाण्यात होऊ शकते. सेंट क्लाऊड यांच्या अहवालानुसार प्राथमिक प्रयोगांमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या द्रवरूप फवारणीमुळे वनस्पतीअंतर्गत वेगाने शरीरशास्त्रीय बदल झाल्याचे आढळले. प्रयोगाच्या एकूण आकडेवारीवरून अशा कर्ब फवारणीतून पिकांच्या वाढीला लक्षणीय चालना मिळत असल्याच्या गृहीतकाला पाठबळ मिळते.  
याआधी गुयेल्फ विद्यापीठामध्ये झालेल्या चाचण्यामध्ये रोमेन लेट्यूसच्या उत्पादनामध्ये विशेषतः बायोमासमध्ये १०० टक्के वाढ दिसून आली होती. त्याची तुलना ८०० पीपीएम कार्बन डायऑक्साईड वायूचा पुरवठा केलेल्या लेट्यूस पिकाशी करण्यात आली.

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...