agricultural news in marathi,news regarding use of nematodes for pest control , Agrowon, Maharashtra | Agrowon

जैविक नियंत्रणासाठी उपयुक्त सूत्रकृमींचे पुनरुत्पादन प्रयोगशाळेत शक्य
वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

सी. इलेगन्स या सूत्रकृमीच्या संबंधित अन्य प्रजातीमध्ये जननग्रंथीच्या विकासामध्ये बदल होत असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. संशोधकांनी स्टेईनेरईमा कार्पोकॅपसीई या सूत्रकृमीवर लक्ष केंद्रित केले आहे. लॉन आणि शेतीमध्ये कीटकांच्या जैविक नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या या सूत्रकृमींचे प्रयोगशाळेमध्ये पुनरुत्पादन शक्य करण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ नेमॅटोलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सी. इलेगन्स या सूत्रकृमीच्या संबंधित अन्य प्रजातीमध्ये जननग्रंथीच्या विकासामध्ये बदल होत असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. संशोधकांनी स्टेईनेरईमा कार्पोकॅपसीई या सूत्रकृमीवर लक्ष केंद्रित केले आहे. लॉन आणि शेतीमध्ये कीटकांच्या जैविक नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या या सूत्रकृमींचे प्रयोगशाळेमध्ये पुनरुत्पादन शक्य करण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ नेमॅटोलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सूत्रकृमी हे सर्वात सोपी प्रणाली असलेले सजीव असूनही, त्याविषयी फारच कमी माहिती संशोधकांना उपलब्ध झालेली आहे. आतापर्यंत सी. इलेगन्स या सूत्रकृमीची जनुकीय संरचना उलगडली असून, त्यांचा वापर प्रयोगशाळेमध्ये विशेषतः न्युरॉन्सच्या अभ्यासासाठी गीनिपिग म्हणून केला जातो. अनेक वर्षांपासून अन्य सूत्रकृमी प्रजातींमध्येही न्युरॉन्सची रचना समान असल्याचे मानले जात होते. इल्लिनॉईज विद्यापीठातील पीक शास्त्र विभागातील सहाय्यक प्रा. नॅथन स्क्रोईडर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सूत्रकृमीच्या जननग्रंथीच्या वाढीच्या फरकावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचे विद्यार्थी हुंग क्षुयान बुई यांनी सूत्रकृमीच्या स्टेईनेरईमा कार्पोकॅपसीई या प्रजातीचा अभ्यास सुरू केला.
सर्व सूत्रकृमीमध्ये जननग्रंथीच्या एका नलिकेमध्ये सर्व जनन अवयव तयार होतात. पुढे वाढीच्या अवस्थेत त्यांची जागा वेगवेगळी होते. ही प्रक्रिया सर्व सी. इलेगन्समध्ये सारखीच होते. मात्र, स्टेईनेरईमा या प्रजातीमध्ये त्यात भिन्नता आढळली आहे. ती उत्क्रांतीच्या किंवा जनुकीय सुधारणेच्या प्रक्रियेत तयार झाली आहे का, असा प्रश्न त्यातून उभा राहिला. ही शेतीमध्ये कीटकांच्या जैविक नियंत्रणासाठी वापरली जाते. परिणामी ही अधिक वेगाने होणारी वाढ या प्रजातीच्या व्यावसायिक वापरासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

कीड नियंत्रणासाठी सूत्रकृमी असे ठरतात उपयुक्त

  • स्टेईनेरईमा कार्पोकॅपसीई हा सूत्रकृमी आकाराने अत्यंत सूक्ष्म (एक मिलिमीटरपेक्षाही लहान) गोलकृमी त्याच्या शेपटीवर उभा राहू शकतो. त्याच्या लांबीच्या १० पट लांब इतकी उडी तो मारू शकतो. या प्रक्रियेद्वारे तो कीटकांच्या शरीरावर पोचतो. एकदा कीटकाच्या शरीरावर पोचल्यानंतर स्वतःच्या पचनसंस्थेतील सहजीवी जिवाणू बाहेर सोडतो. त्यामुळे त्या कीटकाचा मृत्यू ओढवतो. मग पुन्हा त्या जिवाणूंसह त्या कीटकावर जगतो. या काळात त्यांच्या शरीरामध्ये त्यांची वाढ होते.
  • सूत्रकृमीच्या शरीरातून बाहेर टाकलेल्या लाळेच्या पुन्हा संपर्कात आल्यानंतर त्यांची लैंगिक वाढ सुरू होते. त्यानंतर या कीटकाच्या शरीरावर घर बसवलेल्या अन्य सूत्रकृमीच्या सहकार्याने पुनरुत्पादन सुरू होते. ही सारी प्रक्रिया एखाद्या प्रयोगशाळेमध्ये घडवणे तसे अवघडच ठरते.
  • हुंग क्षुयान बुई यांनी अधिक तीव्रतेच्या जीवाणूमध्ये सूत्रकृमी ठेऊन प्रयोग केले. त्यातून सूत्रकृमीची पिल्ले बाहेर येण्यापासून सामान्य पुनरुत्पादन क्षमतेपर्यंतच्या सर्व क्रिया व्यवस्थित पार पडत असल्याचे दिसून आले. थोडक्यात, कीटकांचा वापर नसतानाही सूत्रकृमींची वाढ शक्य असल्याचे यातून स्पष्ट झाले. 
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...