agricultural news in marathi,news regarding use of sewage water, Agrowon, Maharashtra | Agrowon

सांडपाण्यातील जैवघटक ठरू शकतात पारंपरिक खतांना पर्याय
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

मिसिसीपी राज्य विद्यापीठाने सांडपाण्यातील जैविक घन घटकांचा वापर शेतीमध्ये खत म्हणून वापर करण्यासंदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पातून उपलब्ध होणारे जैवघटक योग्य प्रक्रिया केल्यानंतर पारंपरिक खतांना चांगल्या प्रकारे पर्याय देऊ शकत असल्याचे आढळले आहे.  

मिसिसीपी राज्य विद्यापीठाने सांडपाण्यातील जैविक घन घटकांचा वापर शेतीमध्ये खत म्हणून वापर करण्यासंदर्भात लक्ष केंद्रित केले आहे. सांडपाण्यावरील प्रक्रिया प्रकल्पातून उपलब्ध होणारे जैवघटक योग्य प्रक्रिया केल्यानंतर पारंपरिक खतांना चांगल्या प्रकारे पर्याय देऊ शकत असल्याचे आढळले आहे.  

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये साठ टक्क्यांपर्यंत जैवघटकांचा वापर केला जातो. त्या तुलनेमध्ये मिसिसीपी राज्यामध्ये हे प्रमाण जवळपास शून्य आहे. १९५० पूर्वी सांडपाणी हे नैसर्गिक पाणी स्रोतामध्ये सोडून दिले जाई. परिणामी, प्रदूषणात वाढ होऊ लागल्याने १९७० पासून शासनाने पर्यावरण संरक्षण एजन्सी स्थापन केली. त्यानंतर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येऊ लागल्या. अशा पाण्यातील अनेक घटकांचा वापर पिकांसाठी करण्यात येऊ लागला. अगदी खाद्य पिकांमध्येही योग्य खबरदारी घेऊन त्याचा वापर होऊ लागला.

मिसिसीपी राज्य विद्यापीठातील संशोधक शॉन ब्रोडेरीक आणि विल्यम्स इव्हान्स यांनी सांडपाण्यातील जैवघटकांचा शेतीतील वापराचे प्रयोग केले. त्यातून मिळालेले निष्कर्ष उत्साहवर्धक होते. सांडपाण्यावरील प्रक्रियेवेळी वेगळे केले जाणारे जैवघटक, गाळ हा एका बंदीस्त हरितगृहामध्ये वाळवला जातो. त्यातील पाण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर स्वयंचलित यंत्रणेद्वारे ते सतत हलवले जाते. यामुळे त्यातील हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट होतात, तसेच कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन सेंद्रिय व पोषक घटकांमध्ये वाढ होते.

ब्रोडेरीक म्हणाले की, सातत्याने जैवघटक हलते राहिल्याने त्यातील हानिकारक बाबी कमी होऊन तण व रोगमुक्त असे सेंद्रिय पदार्थ मिळतात. पारंपरिक खतांच्या तुलनेमध्ये या खतांचे पिकांवर चांगले परिणाम दिसून आले आहेत. प्रयोगामध्ये २, ८, १४ आणि २० टन प्रतिएकर या दराने जैवघटकांचा वापर करण्यात आला. त्याची तुलना सावकाश उपलब्ध  होणाऱ्या व्यावसायिक रासायनिक खतांशी करण्यात आली. 

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...