डाळिंब पीक सल्ला

डाळिंब पानगळीनंतर महिन्यानंतर खतांची मात्रा द्यावी.
डाळिंब पानगळीनंतर महिन्यानंतर खतांची मात्रा द्यावी.

डाळिंब बागेतील कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व झाडे मजबूत करण्यासाठी बागेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर व योग्य पद्धतीने आंतरमशागत, अन्नद्रव्ये, रोग, पाण्याचा आणि किडीचे व्यवस्थापन केल्याने, झाडाची वाढ चांगली होते आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते.

योग्य वेळेत योग्य अंमलबजावणी होण्यासाठी झाडांची पाहणी करणे आवशक आहे. ज्या शेतकऱ्यांनी मृग किवा आंबे बहर घेतला असेल, त्यांनी जून महिन्यामध्ये करावयाची कामे खालीलप्रमाणे आहेत. मृग बहर : मृग बहर धरलेल्या बागांमध्ये ताण अवस्था संपली आहे. आता बागेत पानगळ करून घेण्याची वेळ आहे. पानगळ करण्यापूर्वी संपूर्ण झाडावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

  • बोर्डो मिश्रणाची फवारणी केल्यानंतर ७ दिवसांत पानगळीसाठी फवारणी करावी. प्रमाण प्रतिलिटर-इथेफॉन १.५ ते २ मिलि अधिक डी.ए.पी. ५ ग्रॅम
  • बाग तणमुक्त ठेवावी तसेच फुटवे काढावेत. शेणखताची २/३ मात्रा (संपूर्ण पीक कालावधीत झाडाच्या वयानुसार २० ते ५० किलो प्रतिझाड) द्यावी. तसेच प्रतिझाड सूक्ष्म अन्नद्रव्ये (जस्त, लोह, मॅंग्नीज, बोरॉन प्रत्येकी २५ ग्रॅम) अधिक निंबोळी पेंड १ ते २ किलाे अधिक गांडूळखत १ किलाे अधिक शिफारशीत दाणेदार कीटकनाशक २५ ग्रॅम याप्रमाणात गोलाकार पद्धतीने खोडाजवळ द्यावे. नत्राची १/४ व स्फुरदाची आणि पालाशची १/३ मात्रा द्यावी. (संपूर्ण पीक कालावधीत वयानुसार नत्र २५० ते ५०० ग्रॅम, स्फुरद १२५ ते २५० ग्रॅम व पालाश १२५ ते २५० ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणात दिले जाते.) खते दिल्यानंतर ताबडतोब बागेस हलके पाणी द्यावे.
  • ब्लिचिंग पावडर (३३ टक्के क्लोरीन) २५ किलो प्रति १००० लिटर पाणी प्रतिहेक्टर क्षेत्रात जमिनीवर फवारणी करावी.
  • पानगळीनंतर पुढील ७ दिवसांत (८५ ते १०० टक्के पानगळ) खाली पडलेला पालापाचोळा व इतर अवशेष गोळा करून जाळून नष्ट करावेत. त्यानंतर झाडावर फवारणी करावी.प्रमाण प्रतिलिटर - कॉपर ऑक्झिक्लोराईड  (५० डब्ल्यू. पी.) २.५ ग्रॅम अधिक ब्रोमाेपॉल ०.५ ग्रॅम अधिक  सरफेक्टंट ०.५ ग्रॅम
  • पहिले पाणी ८-१० तास एवढ्या कालावधीचे द्यावे.
  • पुढील ७ दिवसांत नवीन पालवी फुटल्यानंतर पुढील फवारण्या कराव्यात. फवारणी प्रमाण प्रतिलिटर
  • वेळ : सकाळी (पीकवाढीसाठी संजीवक) सॅलिसिलिक अाम्ल ०.३ ग्रॅम
  • वेळ : संध्याकाळी स्ट्रेप्टोमायसिन ०.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम अधिक थायामिथोक्झाम (२५ डब्ल्यू. पी.) ०.३ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ ग्रॅम
  • सिंचन २०-३० लिटर प्रतिझाड प्रतिदिवस याप्रमाणात करावे.
  • फुलोरा येण्याच्या अवस्थेत तेलकट डाग रोगास प्रतिबंधात्मक (पानगळीनंतर २२ ते ३० दिवस) व पीकवाढीसाठी फवारणी करावी. प्रमाण प्रतिलिटर  
  • वेळ : सकाळी - ब्रोमोपॉल ०.५ ग्रॅम अधिक झायरम (८० टक्के डब्ल्यू. पी.) २ ग्रॅम अधिक झिंक सल्फेट ३ ग्रॅम अधिक बोरॅक्स (१० टक्के बोरॉन) २ ग्रॅम अधिक चिलेटेड लोह ३ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ ग्रॅम
  • वेळ : संध्याकाळी - स्ट्रेप्टोमायसिन ०.५ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम अधिक अॅसिटामिप्रीड (२० एस.पी.) ०.३ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ ग्रॅम  नत्रयुक्त खताची १/४ एवढी मात्रा द्यावी.
  • विद्राव्य खत १२: ६१: ०० ची ८ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात एक दिवसाआड अशी १५ वेळा ठिबक संचाद्वारे मात्रा द्यावी. तणे काढून बाग स्वच्छ करावी. गरजेनुसार एक दिवसाआड पाणी द्यावे.
  • आंबे बहर व्यवस्थापन : सद्यःस्थितीत फळांची फुगवण होत आहे. अशा वेळी फळांवर ०.५ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. झाडांचा विस्तार, हवामान, झाडाचे वय आणि मातीचा प्रकार यांची सांगड घालून प्रतिझाड प्रतिदिन २० ते ४० लिटर पाणी द्यावे.

  • तेलकट डाग रोगग्रस्त बागेत खालीलप्रमाणे फवारणी करावी. प्रमाण प्रतिलिटर - ब्रोमोपॉल ०.५ ग्रॅम अधिक कॅप्टन (५० डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ ग्रॅम
  •  ठिबकसंचातून कॅल्शियम नायट्रेट १२.५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा द्यावे.
  • तेलकट डाग रोगनियंत्रण व रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी २१ ते ३० जुनदरम्यान पुढील फवारणी करावी. प्रमाण प्रतिलिटर - स्ट्रेप्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम अधिक मॅंकोझेब (७५ टक्के डब्ल्यू. पी.) २ ग्रॅम अधिक, लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ इ.सी./सी.एस.) ०.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट ०.५ ग्रॅम   
  • टीप :

  • ब्रोमोपॉल आणि स्ट्रेप्टोसायक्लीनची फवारणी फक्त तेलकट डाग रोगग्रस्त बागेतच करावी.
  • बोर्डो मिश्रणाचा सामू तपासूनच फवारणी करावी.
  • निर्यातक्षम बागांचे रासायनिक व्यवस्थापन लेबल क्लेमनुसारच करावे.
  • स्ट्रेप्टोमायसिन हे संक्षिप्त नाव वरील लेखात घेतले असले तरी या प्रतिजैविकातील सक्रिय घटक पुढीलप्रमाणे आहेत. स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्‍लीन हायड्रोक्‍लोराइड १० टक्के.
  • संपर्क : डॉ. डी. टी. मेश्राम, ७५०७१९२६०६ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com