मातीचे उष्णताविषयक गुणधर्म

मातीचे उष्णताविषयक गुणधर्म
मातीचे उष्णताविषयक गुणधर्म

जमिनीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे जमिनीचे तापमान वाढते. बदलत्या तापमानाचे मातीवर भाैतिक, रासायनिक परिणाम होतात. त्याचप्रमाणे मातीमध्ये असलेल्या जैविक घटकांवरही परिणाम होतात. या साऱ्याचा परिणाम जमिनीच्या आरोग्यावर पर्यायाने पीक उत्पादनावरही होतो.

सूर्यप्रकाश जमिनीवर पोचेपर्यंत ओझोनचा थर, ढग, धुळीचे कण अाणि वातावरणातील बाष्प यामध्ये शोषला जाताे. काही परावर्तित होतो. त्यामुळे एकूण सूर्यप्रकाशाच्या केवळ १० टक्के भाग हा मातीचे तापमान वाढवण्यासाठी वापरला जातो.

बदलत्या तापमानामुळे परिणाम होणारे जमिनीतील घटक ः

  • जिवाणूंची संख्या.  
  • बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून, मातीतील अोलाव्याचे प्रमाण कमी होते.
  • पाण्याचा जमिनीतील प्रवाह व धारणक्षमतेवर परिणाम होतो.
  • माती तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम
  • होतो.
  • तापमानामुळे परिणाम होणाऱ्या प्रक्रिया  
  • बीजांकुरण
  • मुळाचे कार्य ः हिवाळ्यात वनस्पतींची मुळे ताठर बनतात, परिणामी उपलब्ध असूनही मुळे पाणी शोषू शकत नाहीत.
  • पिकांची वाढ ः पिकातील बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण वाढते. परिणामी जमिनीतील पाणी व अन्य मूलद्रव्ये उचलली जातात.
  • सेंद्रिय पदार्थांचे विघटन
  • तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास सेंद्रिय पदार्थांच्या विघटन प्रक्रियेवर परिणाम होतो.
  • तापमान ३० अंश सेल्सिअस पुढे गेल्यास अमोनिकल नत्राचे नायट्रेट स्वरूपामध्ये होणाऱ्या रूपांतराच्या प्रक्रियेवर (नत्रीकरण) परिणाम होतो.
  • बर्फाळ प्रदेशामध्ये जमिनीवरील बर्फाच्या आच्छादनामुळे माती तयार होण्याची प्रक्रिया मंदावते.
  • उष्णता वाहकता

  • विविध प्रकारच्या मातीतून उष्णतेच्या वहनाचा वेग कमी अधिक असतो. उदा. कोरड्या मातीपेक्षा अोलसर मातीच्या तापमानात हळुवार बदल होतो.
  • बाष्पीभवन ः पृथ्वीवर तापमानातील बदलामुळे पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा दर कमी अधिक होत असतो. समुद्र, जमीन आणि जैविक, अजैविक घटकांतून पाण्याची वातावरणासोबत देवाणघेवाण सातत्याने सुरू असते. याला सामान्यतः जलचक्र असे म्हणतात. यासाठी लागणारी ऊर्जा ही सूर्यप्रकाश, परावर्तित होणारी किरणे आणि भूगर्भातील उष्णतेपासून मिळते.

    बाष्पीभवनाचा दर कमी करण्यासाठी...

  • पिकामध्ये विविध प्रकारच्या आच्छादनाचा (जैविक, अजैविक) वापर करणे. उदा. जैविक आच्छादनामुळे वातावरणातील तापमानाच्या तुलनेमध्ये जमिनीचे तापमान ५ अंश सेल्सिअसने कमी राहते. वातावरणातील तापमान कमी असल्यास जमिनीचे तापमान ५ अंश सेल्सिअसने अधिक राहते. याला ‘बफर’ असे म्हणतात.
  • योग्य निचरा प्रणालीचा वापर करणे.
  • सरी वरंबा पद्धतीने पिकाची लागवड करणे.
  • मातीचा रंग

  • आपल्या डोळ्यांना जाणवणारा मातीचा
  • गुणधर्म म्हणजे त्याचा रंग. हा रंग लोह अाणि मॅंगेनीजच्या अाॅक्सिडेशन व रिडक्शन या प्रक्रियेमुळे ठरतो.
  • मातीच्या सच्छिद्रतेच्या उतरत्या क्रमानुसार त्या मातीचा रंग लाल, तपकिरी व पिवळा असतो. सच्छिद्रता नसलेल्या मातीचा रंग करडा, करडा ते हिरवा व निळा असतो.
  • मातीचा रंग, उतार, जैविक अाच्छादन यांसारखे घटक तिच्या तापमानामधील बदलांवर परिणाम करतात.
  • उदा. गडद रंगाची तसेच बिगर आच्छादनाची माती लवकर तापते व लवकर थंड होते. सपाट पृष्ठभागाची माती, उताराच्या मातीपेक्षा लवकर तापते.
  • मातीच्या रंगानुसार मातीची वैशिष्ट्ये, गुणधर्म अाणि मातीवर होणारे परिणाम

    मातीचा रंग    मातीची वैशिष्ट्ये व गुणधर्म    मातीवर होणारे परिणाम
    काळा    जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ, व्हर्टिसोल, भेगा पडणारी, ढेकळे निघणारी, लवकर तापणारी व थंड होणारी    निचरा क्षमता अतिशय कमी, अनत्रीकरण (डीनायट्रीफिकेशन) जास्त होते, मशागतीसाठी कठीण  
    पांढरा   लोह व मॅग्नीज ही खनिजे वाहून गेलेली माती. जास्त पावसाच्या प्रदेशात सापडते.    अन्नद्रव्य वाहून जातात, पाणी उपलब्धता कमी, निचरा क्षमता अतिशय जास्त असते.
    लाल     अतिशय चांगला निचरा क्षमता असलेली माती. लोह ऑक्सिडाईज्ड रूपात असतो. सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार रंग डद होत जातो.   स्फुरद सहजासहजी उपलब्ध होत नाही. पाणी उपलब्धतेसाठी मर्यादा येतात.
    पिवळा/पिवळसर ते तपकिरी     निचरा क्षमता लाल रंगाच्या मातीपेक्षा कमी, लोह हायड्रेटेड रूपात असल्यामुळे रंग गडद होत ाही.    मध्यम प्रमाणात स्फुरद उपलब्धता असते, पाणी उपलब्धता कमी, माती घट्ट असते.
    तपकिरी    मध्यम प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असतात. लोहखनिज अाॅक्सिडाईज्ड स्वरूपात असते.    कमी ते मध्यम प्रमाणात स्फुरद पलब्धता, मध्यम प्रमाणात पाण्याची उपलब्धता.
    करडा/करडा ते हिरवा/निळसर     अत्यंत कमी निचरा क्षमता, चिकट, वायूच्या कमतरतेमुळे लोह, मॅग्नीज या खनिजांचा हिरवट ग मिळतो.     जमीन पाणथळ होते, अनत्रीकरण, जास्त प्रमाणात मिथेन हा घातक वायू तयार होतो.

    संपर्क  :  डॉ. मेहराज शेख, ९९७७३८७२०४, (मृदाशास्त्रज्ञ, मृदाशास्त्रज्ञ पथक, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com