सूर्यफूल बियांपासून लोण्याची घरगुती निर्मिती

सूर्यफुल बियांपासून लोण्याची घरगुती निर्मिती
सूर्यफुल बियांपासून लोण्याची घरगुती निर्मिती

दुग्धजन्य लोण्याला तितकाच समर्थ पर्याय म्हणून भुईमुगाचे लोणी किंवा सूर्यफुलाचे लोणी वापरता येते. सूर्यफुलाच्या बियांपासून लोणी तयार करण्याची पद्धत सोपी असून, घरगुती पातळीवर त्यातून चांगला उद्योग उभा राहू शकतो. सूर्यफूल बियांपासून लोण्याची निर्मिती करणे शक्य असून, ब्रेडवर शर्करामिश्रित सूर्यफूल लोणी चांगले लागते. त्यातील आरोग्यवर्धक गुणधर्मांमुळे चांगली बाजारपेठही उपलब्ध होऊ शकते. उत्तम पॅकेजिंग आणि योग्य पद्धतीने मार्केटिंग केल्यास घरगुती उद्योगातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते.

सूर्यफूल बियांच्या लोण्याचे फायदे

  • सूर्यफूल बियांच्या लोण्याचा वापर ब्रेडवर स्प्रेड म्हणून करता येतो. प्रत्येकी १५ ग्रॅम (एक चमचा) वापरामागे त्यातून ४.५ ग्रॅम कर्बोदके, ३ ग्रॅम प्रथिने, ७.५ ग्रॅम मेद, ३.६ मिलिग्रॅम ई जीवनसत्त्व, ०.३ मिलिग्रॅम मग्नीज, ०.३ मिलिग्रॅम कॉपर, ५९ मिलिग्रॅम मॅग्नेशिअम, ११८ मिलिग्रॅम फॉस्फरस, ०.८ मिलिग्रॅम झिंक मिळते. यातील प्रथिने स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी, व्यायामानंतर झालेला व्यय भरून काढते.
  • एक चमचा हे लोणी खाल्यास शरीराच्या दिवसाच्या ई जीवनसत्त्व गरजेच्या २४ टक्के भाग पूर्ण होतो. ते उत्तम अॅंटिऑक्सिडेन्ट असून, ते चांगल्या आणि वाईट कोलेस्टेरॉलचे नैसर्गिक समतोल राखते. मॅग्नेशिअमने परिपूर्ण असून, प्रत्येक १५ ग्रॅम वापरातून दिवसाची शरीराची गरज भागते.
  • सूर्यफूल लोण्यामधील मेद हे सूर्यफूल तेलापेक्षा वेगळे असून, तेल तापवल्यानंतर येणारा उग्र वास याला येत नाही. हे असंपृक्त मेद असून, कोलेस्टेरॉल आणि दाह कमी करते. शरीराला आवश्‍यक जीवनसत्त्वे शोषणामध्ये मदत करते. यात शरीरामध्ये तयार न होणारी मात्र आवश्‍यक ओमेगा ६ मेदाम्ले आहेत. सूर्यफूल लोण्याची चव उत्तम लागते.
  • सूर्यफूल लोणी बनवण्याची पद्धत सूर्यफूल बिया ओव्हनमध्ये ठेवून गरम करून घेतल्यास त्यातून नैसर्गिकरीत्या तेल बाहेर पडण्याची क्रिया सुरू होते. बाहेरून तेल वापरण्याची आवश्‍यकता राहत नाही. त्याची चव किंचित तुरट लागते. काही चमचे साखर टाकल्यास उत्तम चव लागते. सूर्यफूलाचे दाणे ओव्हनमध्ये एका थरामध्ये ठेवून, ३५ अंश फॅरनहीट तापमानाला गरम करून घ्यावेत. त्याचा रंग किंचित सोनेरी होईपर्यंत किंवा भाजलेल्या दाण्यांप्रमाणे वास येईपर्यंत गरम होऊ द्यावेत. यासाठी सुमारे २० ते २५ मिनिटे लागतात. उष्णतेवर भाजणार असल्यास दर पाच ते दहा मिनिटांनी हलवून करपणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. भाजलेल्या सूर्यफूल बिया एस आकाराचे ब्लेड बसवलेल्या फूड प्रोसेसरमध्ये टाकून एकदम बारीक पीठ तयार करावे. पाच ते दहा मिनिटे ब्लेड्स फिरवत राहिल्यास त्यातून तेल सुटून गोळा तयार होतो. तो मऊ झाल्यानंतर त्यात नारळाची चव, साखर किंवा बारीक केलेला गूळ, मीठ चवीप्रमाणे घालून दोन मिनिटे मिसळून घ्यावे. हे लोणी काचेच्या बाटलीत भरून हवाबंद करावे. हे फ्रिजमध्ये ठेवल्यास  एक महिन्यापर्यंत चांगले टिकते.

    महत्त्वाचे :

  • सूर्यफूल लोण्याची टिकवणक्षमता वाढवण्यासाठी द्राक्षाच्या बियांचा रस वापरता येतो. द्राक्षाचा बियांचा अर्क हा सूक्ष्मजीवांना (उदा. सॅलमोनेल्ला इन्ट्रिका आणि लिस्टेरिया इनोक्युआ) रोखण्याचे काम करतो.
  • सूर्यफूल लोण्याचा पोत मिळवण्यासाठी आणि त्यातील तेल वेगळे होऊ नये, यासाठी ३ टक्के हायड्रोजेनेटेड वनस्पती तेल लोणी तयार करतेवेळी वापरावे. त्यामुळे साठवणीमध्ये लोणी कडक होणे किंवा तेल वेगळे होणे टाळता येते.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com