agricultural news in marathi,use of weedicides in rabbi crops,AGROWON,marathi | Agrowon

रब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रण
डॉ. अशोक जाधव, सुनिता पवार
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

पिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तणनियंत्रण आवश्‍यक असते. तणनियंत्रणासाठी एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मात्र मजुरांची कमतरता असल्यास पीकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा.  
 
एकात्मिक तणनियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पेरणीपूर्व मशागत, लागवड करतानाची मशागत, आंतरमशागत, तणनाशकांचा वापर आदी पद्धतींचा समावेश होतो.

तणनाशकाचा वापर :
तणनाशकांचा वापर करताना महत्त्वाच्या बाबी :

पिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत तणनियंत्रण आवश्‍यक असते. तणनियंत्रणासाठी एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मात्र मजुरांची कमतरता असल्यास पीकनिहाय योग्य तणनाशकांचा वापर करावा.  
 
एकात्मिक तणनियंत्रणाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पेरणीपूर्व मशागत, लागवड करतानाची मशागत, आंतरमशागत, तणनाशकांचा वापर आदी पद्धतींचा समावेश होतो.

तणनाशकाचा वापर :
तणनाशकांचा वापर करताना महत्त्वाच्या बाबी :

  • तणनाशकाची निवड, वापरावयाचे प्रमाण व वेळ इत्यादींबाबत योग्य माहिती असावी.
  • शक्‍यतो पीक पेरणीनंतर, परंतु उगवणीपूर्वीचीच तणनाशके वापरावीत. उदा. एकदल पिकात ॲट्राझीन; तर द्विदल पिकांसाठी पेंडीमिथॅलीन.
  • उभ्या पिकातील तणनियंत्रणासाठीही तणनाशकांचा वापर करता येतो. मात्र त्यासाठी पिकाचा वर्ग माहित असणे आवश्‍यक आहे.
  • उभ्या पिकात तणनाशकांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी तणे २ ते ४ पानांवर असताना फवारणी करावी.
  • तणनाशकांची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. किमान २ ते ३ तास सूर्यप्रकाश असावा.
  • पाठीवरील साधा फवारणी पंप वापरावा. फ्लॅटपॅन किंवा फ्लडजेट नोझलचा वापर करावा. फवारणीचा अंश पिकावर जाऊ नये यासाठी वाऱ्याचा वेग कमी असताना फवारणी करावी.

मका :

  • वेळ : पीक उगवणीपूर्वी
  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी ॲट्राझीन (५० डब्ल्यु. पी)१००० ग्रॅम

हरभरा :

  • वेळ : पीक उगवणीपूर्वी
  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी पेंडीमिथॅलीन (३० टक्के) २.५ लिटर
  • टीप : पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी.

सूर्यफूल :

  • वेळ : उगवणीपूर्वी
  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी ऑक्‍झीफ्लोरफेन (१० टक्के) १ लिटर
  • टीप : पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी व कोळपणी करावी.

करडई :

  • वेळ : पीक उगवणीपूर्वी
  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी ऑक्‍झीफ्लोरफेन  (१० टक्के) १ लिटर
  • टीप : पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी.

कांदा :

  • वेळ : पीक उगवणीपूर्वी
  • तणनाशक : प्रतिहेक्‍टरी प्रति ३०० लिटर पाणी
  • ऑक्‍झीफ्लोरफेन  (१० टक्के) १ लिटर किंवा पेंडीमिथॅलीन  (३० टक्के) २.५ लिटर
  • टीप : ऑक्‍झीफ्लोरफेनची फवारणी करणार असल्यास पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खुरपणी करावी. पेंडीमिथॅलीन फवारणी करणार असल्यास पेरणीनंतर सहा आठवड्यांनी एक खूरपणी करावी. किंवा पेरणीनंतर ३ व ६ आठवड्यांनी अशा दोन खुरपणी कराव्यात. 
तणवाढीमुळे उत्पादनातील घट
पीक       उत्पादनात होणारी घट (टक्के)
सूर्यफूल     ३० ते ३३
करडई     ३० ते ३५
हरभरा     २५ ते ४१
गहू   ३० ते ३५
पीक-तण स्पर्धेचा कालावधी
पीक     पेरणीनंतरचे दिवस
करडई    १५ ते ४५
सूर्यफुल   १५ ते ४५
गहू     पूर्ण वेळ

संपर्क :  डॉ. अशोक जाधव, ९४२१३९२१९२
(उपसंचालक : संशोधन पिके, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रोगाईड
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
मॉन्सूनच्या वाटचालीस अनुकूल हवामान महाराष्ट्राच्या दक्षिणेस १००४ हेप्टापास्कल,...
अशक्तपणावर उपयुक्त हुम्भ स्थानिक नाव    :   ...
तंत्र अळू लागवडीचेअळू लागवड जून महिन्यात करावी. सरीमध्ये ९० सें.मी...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने किडींवर...खरीप हंगामात कापूस, मका, ज्वारी, ऊस आणि मिरची या...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
आनंदशाळा अन् जैवविविधता संवर्धनाचे...आनंदशाळा शिबिरानंतर जवळपास सर्व शाळांत शिवार फेरी...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल...डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार...
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...
खरीप कांदा लागवड तंत्रज्ञानविशेषतः विदर्भात रब्बी हंगामातील कांद्याचे...
जमिनी सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी शेणखत...कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रांद्वारे सर्व...
उष्ण, कोरड्या हवामानाची शक्यताजून महिन्यात पहिल्या आठवड्यात मॉन्सून केरळमध्ये...
तयारी खरिपाची : वेळेवर मुगाची लागवड...जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा माॅन्सूनचा पुरेसा...