पपईच्या सुधारित जाती देतील चांगले उत्पादन

पपईच्या सुधारित जाती देतील चांगले उत्पादन
पपईच्या सुधारित जाती देतील चांगले उत्पादन

पपई हे बारमाही भरपूर उत्पादन देणारे फळपीक आहे. खाण्यासाठी व पेपेन उत्पादनासाठी फळांचा उपयोग होतो. या पिकाची उत्पन्नक्षमताही चांगली आहे. मात्र त्यासाठी सुधारित अधिक उत्पादनक्षम जातींची लागवड करणे आवश्‍यक अाहे.

पपई फळपीकाच्या उभयलिंगी व द्विभक्तलिंगी अशा जाती आहेत. उभयलिंगी जातीच्या लागवडीपासून अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे लागवडीसाठी उभयलिंगी जातीच्या रोपांची खात्रीशीर रोपवाटिकेतून निवड करावी. सुधारित जाती कुर्ग हनीड्यू (मधूबिंदू) : उभयलिंगी जात, चांगली उत्पादन क्षमता, प्रतिझाड प्रतिवर्ष ३० ते ४० फळे मिळतात. फळे लांब आकाराची असतात. गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने चवीला अतिशय गोड असतात. पुसा डेलिशिअस : उभयलिंगी जात, चांगली उत्पादन क्षमता, झाडाचे खोड मजबूत असून, फळे जमिनीपासून १६० सें.मी. उंचीपासून वर लागतात. गर अतिशय चवदार आणि गोड असतो. प्रतिझाड प्रतिवर्ष ३० ते ४० फळे मिळतात. फळांचे सरासरी वजन १ ते १.२ किलो असते. साखरेचे प्रमाण १० टक्के असते. पुसा डॉर्फ : द्विभक्तलिंगी जात, झाडे ठेंगणी आणि जास्त उत्पादन देणारी आहेत. लागवडीनंतर झाडांना २३५ दिवसांपासून फळे लागतात. जमिनीपासून ४० सें.मी. उंचीपासून फळे लागतात. फळे मध्यम आकाराची व सरासरी वजन १ ते १.५ किलो असते. गर अतिशय गोड, मधुर व नारंगी घट्ट असतो. घन लागवडीसाठी ही जात अतिशय चांगली आहे. सोसाट्याचा वारा जेथे वाहतो तेथे ही लागवडीसाठी फायदेशीर ठरते. सी.ओ.३ : उभयलिंगी जात, झाडे उंच वाढतात. फळे मध्यम आकाराची असून गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने गर गोड असतो. गराचा रंग लालसर असून, ब्रिक्‍स १४.६ टक्के असते. फळांचे सरासरी वजन ०.५ ते ०.८ किलो असते. प्रतिझाड प्रतिवर्ष ९० ते १२० फळे मिळतात. वॉशिंग्टन : द्विभक्तलिंगी जात, झाडे बुटकी असतात. फळे लांब, वर्तुळाकार, फळांचे सरासरी वजन १.५ ते २ किलो, गर केशरी, चवदार व उत्पादनास चांगली जात आहे. तैवान-७८५ आणि तैवान-७८६ : उभयलिंगी जात, भरपूर उत्पादन क्षमता (प्रतिवर्ष प्रतिझाड १०० ते १२५ फळे). लागवड व तोडणी वर्षभर चालू असते. एकूण फळांपैकी ६० ते ७० फळे मोठ्या आकाराची व दुसऱ्या बाजारपेठेत पाठविण्यास योग्य असतात. फळांचे सरासरी वजन १ ते १.५ किलोपर्यंत असते. प्रतिहेक्‍टरी फळांचे उत्पादन १००-१२५ टन मिळते. शुद्ध बियाणे वापरल्यास या जाती व्हायरस रोगाला बळी पडत नाहीत. झाडांची उंची कमी असून, प्रतिहेक्‍टरी ४४४४ झाडांची लागवड करता येते. सी.ओ.२, सी.ओ.४, सी.ओ.५, सी.ओ.९, सी.ओ.७ : या जाती पेपेन उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या आहेत. त्यापैकी सी.ओ. ७ ही जात उभयलिंगी असून, बाकीच्या द्विभक्तलिंगी आहेत.

संपर्क : डॉ. उज्ज्वल राऊत, ९८५०३१४३५२ (उद्यान विद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com