agricultural stories in marathi, agro processing, tomato | Agrowon

मूल्यवर्धीत टोमॅटो पदार्थांना अाहे मागणी
चंद्रकला सोनवणे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पिकलेल्या टोमॅटोची साठवण क्षमता कमी असते. संपूर्ण पिकलेली फळे २ ते ३ दिवसांत वापरण्यात आली नाहीत तर ती आंबट होतात, मऊ होतात आणि लवकर खराब होतात. त्यामुळे टोमॅटोपासून केचप, सॉस, सूप, प्युरी असे विविध मूल्यवर्धित पदार्थ बनवून चांगला आर्थिक फायदा मिळवता येतो.

पिकलेल्या टोमॅटोची साठवण क्षमता कमी असते. संपूर्ण पिकलेली फळे २ ते ३ दिवसांत वापरण्यात आली नाहीत तर ती आंबट होतात, मऊ होतात आणि लवकर खराब होतात. त्यामुळे टोमॅटोपासून केचप, सॉस, सूप, प्युरी असे विविध मूल्यवर्धित पदार्थ बनवून चांगला आर्थिक फायदा मिळवता येतो.

टोमॅटो ही रोजच्या आहारातील एक महत्त्वाची फळभाजी असून, त्याचा वापर सांबर, वरण व इतर मिश्र भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. टोमॅटोपासून केचप, सॉस, सूप, प्युरी या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी अाहे. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करताना लोखंडी भांड्याचा वापर करू नये. त्यामुळे पदार्थ काळसर पडून तो खराब होतो.

टोमॅटो प्युरी

 • बी व सालविरहित टोमॅटोचा आटवलेला रस ज्यात कमीत कमी ८.५ टक्के घन घटक असतात, त्या पदार्थाला टोमॅटो प्युरी असे म्हणतात.
 • टोमॅटो प्युरी तयार करण्यासाठी रस उघड्या भांड्यात ९० ब्रिक्‍स टी.एस.एस. येईपर्यंत आटवावा.
 • तयार झालेली प्युरी प्लेन किंवा इन्यामल कॅनमध्ये किंवा बाटल्यात पॅक करून ८२-८४ अंश सेल्सिअस तापमानाला ३० मिनिटे गरम करून निर्जंतुक करावी.
 • हवाबंद केलेली प्युरी सामान्य तापमानास ६ महिने चांगली टिकते.
 • प्युरीचा वापर गरजेप्रमाणे केचप किंवा हॉटेलमध्ये वेगवेगळ्या भाज्या तयार करण्यासाठी होतो. प्युरीला हॉटेल व्यवसायात चांगली मागणी आहे.

सूप ः
साहित्य ः रस १ किलो, पाणी ३५० मिलि, कांदा १५ ग्रॅम, मीठ २० ग्रॅम, लोणी २० ग्रॅम, साखर २० ग्रॅम, लसूण, काळे मिरे, दालचिनी, इलायची व लवंग प्रत्येकी २ ग्रॅम.

 • रस जास्त आंबट असल्यास खाण्याचा सोडा मिसळून रसाची आम्लता कमी करावी. रस पातेल्यात घेऊन तो शिजवावा.
 • एका कपड्यामध्ये सर्व मसाल्याचे पदार्थ बांधून त्याची पुरचुंडी करून रसामध्ये सोडावी. अधूनमधून मसाल्याच्या पुरचुंडीला दाबून त्याचा अर्क काढावा.
 • १० टक्के रस घेऊन त्यात लोणी व स्टार्च मिसळून पेस्ट तयार करून ही पेस्ट पातेल्यातील उकळत्या रसात मिसळून एकजीव करावी.
 • मिश्रण थोडे घनतेचे झाल्यावर त्यामध्ये साखर व मीठ मिसळून मिश्रण ३ ते ५ मिनिटे शिजवून घ्यावे.
 • हे सूप ४० ते ५० दिवस टिकते. निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून ठेवावे.

टोमॅटो लोणचे ः
साहित्य
१ किलो टोमॅटो, मोहरीडाळ १०-१५ ग्रॅम, मेथीडाळ १० ग्रॅम, आले-लसूण पेस्ट ५० ग्रॅम, मीठ चवीनुसार, हळद, तिखट, तेल मोहरी १५० मिलि, व्हिनेगर १५ मिलि.

 • लाल पूर्ण पिकलेली टोमॅटो घ्यावीत. स्वच्छ पाण्याने धुवावीत.
 • स्टीलच्या चाकूने फोडी कराव्यात. दुसरीकडे कढईत तेल घेऊन त्यात मोहरी डाळ, मेथी दाणे तळून घेऊन त्याची पूड करून वापरावी.
 • कापून घेतलेले टोमॅटो, आले, लसूण पेस्ट, हळद, तिखट सर्व एकत्रित करून चांगले शिजवून घ्यावे.
 • घट्ट शिजत आल्यानंतर त्यात मीठ व व्हिनेगर मिसळून व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे. थंड करून निर्जंतुक बाटलीमध्ये हवाबंद करून घ्यावे. हे लोणचे वर्षभर टिकू शकते.

संपर्क ः चंद्रकला सोनवणे, ८४०८९७०९३७
(एस. के. (काकू) अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)

इतर कृषी प्रक्रिया
शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...
प्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...
प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...
पाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
अर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...
मसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...
गिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...
भोंगळेंचा शुद्ध नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँडमाळीनगर (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील नीलकंठ...
मका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...
उत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...
शेवग्याच्या पानापासून पराठा, चहाआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची...
प्रक्रिया उद्योगातून घेतली उभारीमुलांच्या शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात स्थायिक...
पशुधनाला हवा भक्कम विमा महापूर, दुष्काळ, गारपीट, चक्री वादळे, वीज पडणे...
फणसाचा दुग्धजन्य पदार्थांमध्ये वापरफणसाच्या गऱ्यांना शहरी बाजारपेठेत मागणी आहे....
युवकाची 'वंडरफूल' डाळिंब ज्यूस निर्मितीसोलापूर येथील रविराज माने या तरुणाने बाजारपेठेतील...
केळी पदार्थांच्या निर्मितीतून कुटुंबाला...जळगाव शहरातील प्रियंका हर्षल नेवे यांनी पाककलेतील...
शेंगालाडू व्यवसायातून नीशाताईंना मिळाले...पंढरपुरात एकादशी तसेच अन्य दिवशी येणाऱ्या...
बेदाणा तारण कर्ज योजना ज्या बाजार समित्या बेदाणा या शेतीमालासाठी...