शेतमाल प्रक्रिया तंत्रज्ञानातील सर्वोच्च अविष्कार

शेतमाल प्रक्रिया तंत्रज्ञानातील सर्वोच्च अविष्कार
शेतमाल प्रक्रिया तंत्रज्ञानातील सर्वोच्च अविष्कार

तंत्रज्ञान, संशोधनात आविष्कार घडवण्याची क्षमता, काळाच्या पुढे जाण्याची वृत्ती, जागतिक बाजारपेठेचा प्रचंड अभ्यास व जगात आघाडीवर राहण्याचे उत्तुंग ध्येय. पुणे येथील विकास दत्तात्रय दांगट या मराठमोळ्या उद्योजकाची ही सारी वैशिष्ट्ये आहेत. विंग (जि. सातारा) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्य शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारून नावीन्यपूर्ण उत्पादनांची श्रेणी त्यांनी तयार केली आहे. त्याद्वारे युरोप, अमेरिकेतील बाजारपेठा मिळवल्या. देशभरात दहा हजार शेतकऱ्यांसोबत करार शेती करून त्यांना आपल्या उद्योग कक्षेत आणले आहे. 

 पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे ५० किलोमीटरवर शिरवळजवळ असलेल्या फाट्यापासून आत वळले की काही किलोमीटवर विंग हे गाव लागते. तिथं ‘एसव्ही ग्रुप आॅफ कंपनीज’ या उद्योगसमूहांतर्गत शेतमाल प्रक्रिया उद्योग प्रकल्प १४ एकरांत वसला आहे.  

नऊ कंपन्यांची जबाबदारी सांभाळणारा अवलिया विकास दत्तात्रय दांगट यांच्या उद्योगसमूहाच्या तब्बल नऊ कंपन्या आहेत. सर्व कंपन्यांनी भारतासह जगात नाव कमावले आहे. या सर्व कंपन्यांचे दांगट हे समूह संचालक आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज हे त्यांचे मूळ गाव. येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दांगट यांना शिक्षक असलेल्या आई-वडिलांचे संस्कार लाभले. नववीपर्यंत अगदी कंदिलाच्या उजेडात त्यांनी शिक्षण घेतलं. राजकीय पार्श्वभूमी किंवा धनाढ्य संपत्तीचा वारसा नसताना केवळ कुशाग्र बुद्धी व खडतर कष्ट घेण्याची वृत्ती यामुळे  ते ‘मेकॅनिकल इंजिनिअर’ झाले.

उच्च ध्येय ठेवून वाटचाल पदवी घेतल्यानंतर पुणे येथे अभियांत्रिकी क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीत काही वर्षे नोकरीचा अनुभव घेतला. परंतु नोकरी, पगार, बढती, सर्वोच्च स्थान एवढ्यावर समाधान मानणारी ही व्यक्ती नव्हती. त्यांची विचार व कार्यशक्ती काळाच्या कितीतरी पुढची होती. ‘व्हीजनरी’ असेच संबोधन त्यांना योग्य आहे. त्यादृष्टीने १९९६ मध्ये पुणे शहर परिसरातील नांदेड फाटा भागात अभियांत्रिकी क्षेत्रातील पहिली कंपनी स्थापन केली. टप्प्याटप्प्याने अन्य कंपन्या स्थापन करीत २००७ च्या सुमारास कृषी उद्योग क्षेत्रात प्रवेश केला.  

  दांगट यांचा उद्योग दृष्टिक्षेपात

  •  ''एसव्ही ग्रुप आॅफ कंपनीज’अंतर्गत नऊपैकी चार कंपन्या ‘इंजिनिअरिंग’ क्षेत्रात कार्यरत.
  •  त्यातील ‘बॉटल ड्राईंग’ तंत्रज्ञानातील कंपनीचा देशात शंभर टक्के हिस्सा.
  • एक कंपनी कृषी प्रक्रियेतील यंत्रनिर्मितीत कार्यरत. उदा. गार्लीक पिलिंग. सीताफळाचा ज्यूस काढणारे जगातील पहिले यंत्र या कंपनीने तयार केले.
  •     कृषी व प्रक्रिया उद्योगात चार कंपन्या अशा.

    1. वैश्विक फूडस- फ्रोजन फळे व भाजीपाला, कॅन्ड व्हेजीटेबल्स, इन्स्टंट मिक्स, रेडी टू कूक, रेडी टू सर्व्ह अशी उत्पादनांची श्रेणी.
    2. ॲग्री प्युअर नॅचरल फूडस- ग्राइंड केलेल्या मसालावर्गीय पदार्थांचे उत्पादन   
    3. अॅग्रो ग्रीन ॲग्रोटेक- शेतकऱ्यांकडून मालखरेदीसाठी करार शेती
    4.  वेल्कीन फ्रेश- ताजा भाजीपाला व फळे पुरवठा  

    वैशिष्ट्यपूर्ण काही उत्पादने

  • फ्रोजन आंबा, स्ट्रॉबेरी,
  • इन्स्टंट मिक्स- गुलामजामून, रवा इडली, ढोकळा, मेथी इडली, डोसा-उत्तप्पा कॅन्ड ॲण्ड पिकल्ड- जालापिनो मिरची, बेबी व स्वीट कॉर्न
  • सॉसेस व चटण्या- कांदा, लसूण, आले पेस्ट, मधुर आंबा चटणी, पालक पनीर  
  • मटणाला पर्याय म्हणून त्यासारखे दिसणारे व चव असलेले शाकाहारी नाविन्यपूर्ण उत्पादन
  • उद्योगाची काही वैशिष्ट्ये

  • प्रक्रियेसाठी दररोज १०० टन कच्चा माल लागतो. त्यासाठी राज्य व परराज्य मिळून सुमारे १० हजार शेतकऱ्यांसोबत करार शेती. येत्या चार वर्षांत करार शेतीअंतर्गत दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट
  • सध्या बेबी कॉर्न, मधुमका, रेड पापरिका मिरची, जालापिनो मिरची, हळद, कढीपत्ता, धणे, जिरे आदी पिकांसाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडूतील शेतकऱ्यांसोबत करार शेती
  • सध्याची उद्योगाची एकूण उलाढाल- तब्बल शंभर कोटी रूपये. नजीकच्या काळात सातशे कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट.
  • प्रक्रिया उद्योगातील जगातली सर्वोत्तम तंत्रज्ञाने, यंत्रे, कोल्ड स्टोरेज, अद्ययावत प्रयोगशाळा यांच्या सोयी.
  • स्वच्छता आरोग्याच्या (हायजेनिक) सर्व जागतिक निकषांचे पालन.
  • आवश्यक सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्यासाठी संशोधन आणि विकास या बाबीवर अधिक भर.
  • व्यावसायिक पातळीवर तंत्रविस्तार
  • नवउद्योजकासाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ विषयातील कंपनी स्थापन करून सेवा सल्ला दिला देणारी कंपनी.   
  • चौदा एकरांत मसालेवर्गीय उत्पादनांसाठी नव्या तंत्रज्ञानाचा आविष्कार असलेल्या ‘क्रायोजेनिक ड्राइंग’ प्रकल्पाची उभारणी सुमारे दोन लाख चौरस फुटात सुरू.   
  •      रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती     दांगट यांच्या कंपनीने सुमारे पाचशे एकर क्षेत्र विविध ठिकाणी लीजवर घेतले असून तिथे रासायनिक अवशेषमुक्त मालाचं उत्पादन घेतले जात आहे. शेतकऱ्यांचा शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्याचा दांगट यांचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांबरोबरच ग्राहकांना आरोग्यदायी, सत्वयुक्त आहार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.   

    मधुमेही रुग्णांसाठी क्रांतिकारी उत्पादन साखरेेबाबत अथवा मधुमेहाबाबत अत्यंत संवेदनशील असलेल्या व्यक्तींसाठी दांगट यांनी भागीदारी प्रकल्पांतून ‘शुगरलीफ’ नावाचे क्रांतिकारी उत्पादन मार्केटमध्ये उपलब्ध केले आहे. साखर, मेथी, डाळिंब, आवळा, काळी मिरी, हळद, आले आदींचा अर्क असलेले हे नावीन्यपूर्ण उत्पादन आहे.

       जागतिक बाजारपेठेवर कब्जा  

  • दांगट यांनी जागतिक बाजारपेठ व जगभरातला ग्राहक यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे. तब्बल ९० देश आणि सात हजार सातशे शहरांमध्ये भ्रमंती केली. त्यानंतर उत्पादने निर्मितीची दिशा ठेवली. एकूण उत्पादनातील ९० टक्के विक्री युरोपीय देश व अमेरिकेत होते.  
  • जगातील मोठे ब्रॅंड असलेल्या सुपर मार्केटससोबत टायअप.
  •  उद्योग विस्तार

  • उद्योगातून सुमारे दोनशे जणांना रोजगार दिला.  
  • करार शेतीअंतर्गत पीक काढणीपश्चात तंत्रज्ञान प्रशिक्षणाची शेतकऱ्यांसाठी सुविधा. मालाची टिकवणक्षमता वाढवण्यासाठीही मार्गदर्शन.
  • करार शेती अंतर्गत मोबाईल अॅप विकसित. शेती व्यवस्थापनाची सविस्तर नोंद ठेवण्याची शेतकऱ्यांसाठी सुविधा.
  • पाच ठिकाणी पाच पॅकहाऊसेस. कोल्ड स्टोरेज, प्री कूलिंग, शेतमाल कलेक्शन सेंटर्स.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com