agricultural stories in marathi, agro special, ber market yashkatha | Agrowon

पुण्यासह मोडनिंब बाजारात होते बोरांची कोट्यवधीची उलाढाल
गणेश कोरे
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

सध्या बोरांचा हंगाम सुरू झाला असून, राज्याच्या विविध भागांतून चेकनट, चमेली, उमराण आणि चण्यामण्या बाेरांची आवक सध्या पुणे बाजार समितीमध्ये सुरू आहे. पुणे बाजारासह, कर्डूवाडी जवळील माेडनिंब उपबाजारातही विविध बाेरांच्या माध्यमातून काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेत आहे. बाेरांच्या उलाढालीचा घेतलेला आढावा.

सध्या बोरांचा हंगाम सुरू झाला असून, राज्याच्या विविध भागांतून चेकनट, चमेली, उमराण आणि चण्यामण्या बाेरांची आवक सध्या पुणे बाजार समितीमध्ये सुरू आहे. पुणे बाजारासह, कर्डूवाडी जवळील माेडनिंब उपबाजारातही विविध बाेरांच्या माध्यमातून काेट्यवधी रुपयांची उलाढाल हाेत आहे. बाेरांच्या उलाढालीचा घेतलेला आढावा.

देशी बोरे आकाराने लहान असली तरी त्यांची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहते. त्याची भुरळ पडणार नाही, अशी व्यक्तीच दुर्मिळ. त्यातच संक्रांतीच्या सणाला वाण लुटण्याच्या महिलांच्या सामानांमध्ये बोरे आवश्यक असतात. त्यामुळे या काळात मागणी वाढत जाते. विविध बाेरांचा हंगाम आवक आणि दरांबाबत माहिती देताना बाेरांचे प्रमुख आडते प्रवीण शहा म्हणाले, ‘‘बाेरांचा हंगाम साधारण आॅक्टाेबर ते फेब्रुवारी दरम्यान असताे. आॅक्टाेबर महिन्यांत तुरळक आवक सुरू होते, पुढे टप्प्याटप्प्याने डिसेंबरमध्ये हंगाम जाेमात येतो. संक्रांतीच्या सणासाठी बाेरांना मागणी वाढत असल्याने दरही साधारण दुपटीने वाढतात. संक्रांतीनंतर हंगाम कमी हाेत फेब्रुवारीअखेर बाेरांच्या हंगामाची सांगता हाेते. यंदा चांगला झालेला पाऊस, फळ लागणीच्या काळातील ढगाळ वातावरण, तापमानातील चढउतार यामुळे बाेरांचे उत्पादन दुपटीने वाढले असून, आवकदेखील वाढली आहे. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत दर कमी आहेत.’’

हंगाम आवक आणि दरांबाबत

  • हंगाम - आॅक्टाेबर ते फेब्रुवारी
  • आवक हाेणारी प्रमुख गावे - साेलापूर, आष्टी, कानाेरी, माेडलिंब, अनगळ, देवडे
  • आवक हाेणारे प्रमुख वाण - चमेली, उमराण, चेकनट हे महाराष्ट्रातील विविध भागांतून
  • केवळ चण्यामण्या वाणांची आवक ही गुजरात आणि उदयपूर येथून हाेते.

वाणनिहाय बोरांचे सरासरी दर (प्रति किलो/रुपयांमध्ये)

वाण पहिल्या टप्प्यातील दर ऐन हंगामातील दर
चेकनट ७० ते ८० १८ ते २२
उमराण ८ ते ९ ३ ते ५
चमेली २० ते २५ ५ ते ६
चण्यामण्या ५० ते ६० ३५ ते ४५

याप्रकारे हाेते आवक

  • उमराण आणि चमेली या बाेरांची आवक ४५ ते ५० किलाेंच्या गाेण्यांमधून हाेते. हंगामात दररोज सरासरी तीन हजार गाेणींची आवक होते.
  • चेकनेट बोरांच्या एक किलोच्या जाळीच्या पिशव्या भरून, प्रति गोणी ५० पिशव्या बसतात. अशा सुमारे २०० गोणींची आवक प्रति दिन होते.

शेतकरी प्रतिक्रिया

‘‘माझी स्वतःची गावरान बाेरांची ४० झाडे असून, मी परिसरातील १५० झाडे विकत घेतली आहेत. बाेरांचा हंगाम साधारण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासुन सुरु हाेताे. पहिल्या टप्प्यात रोज साधारण १० ते १५ डाग बाजारात आणताे. पुढे डिसेंबरमध्ये दरराेज सुमारे ३० डाग (डाग-४० किलाेची एक गाेण) याप्रमाणे राेज दीड टन माल आणताे. बाेरांना प्रति किलाे १५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळताे. हाच दर संक्रांतीला ४० ते ५० रुपयांपर्यंत वाढतो. सुमारे ४५ दिवसांच्या या एका हंगामात ६० टन बाेरांची विक्री करताे. सरासरी २० रुपये प्रति किलाे दर धरला तरी सुमारे एक लाख २० हजार रुपये मिळतात. यामधून वाहतूक आणि मजुरी वगळता ६० हजार रुपये निव्वळ मिळतात.’’
- गणेश अर्जुन बंड
शेतकरी, काेरडगांव, ता. पाथर्डी, जि. नगर.

माेडनिंब बाजार स्थिती

  • कुर्डूवाडी बाजार समितीअंतर्गत येणारा माेडनिंब उपबाजार चमेली आणि उमराण बाेरांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. येथील १५ किलाेमीटर परिसरात माेठ्या प्रमाणावर चमेली आणि उमराण बाेरांची लागवड आहे. माेडनिंब उपबाजारातून दिल्लीसह गुजरातमधील सुरत, आनंद, मेहसाना, अहमदाबाद तर राजस्थान मधील उदयपूर, अजमेर, जयपूर, किनवाडा, गाेरपुतली आदी ठिकाणी बाेरे पाठविली जातात. या ठिकाणांवरून व्यापारीही खरेदीसाठी येतात.
  • दिवाळीनंतर बाेरांची आवक सुरू होते. संक्रांतीपर्यंत हंगाम असताे.
  • या बाजार आवारात दरराेज सरासरी ८ ते १० हजार गाेणी बाेरांची आवक हाेते. सध्या प्रति किलाे ४ ते ७ रुपये एवढा दर आहे.
  • यंदा पावसामुळे झाडांच्या वरील भागातील बाेरांवरही भुरी राेगांचा प्रादुर्भाव झाल्याने दर्जा खालावला आहे. दर्जेदार बोरांचे उत्पादन ६० टक्क्यांपर्यंत घटले आहे. यंदा थंडी चांगली पडलेली नाही, त्याचाही फटका बोरांना बसला. अन्यथा बोरांना प्रति किलाे साधारण १० ते १३ रुपये एवढा दर मिळू शकला असता, अशी माहिती माेडनिंब बाजारातील आडते चतुर्भूज जाधव यांनी दिली.

शेतकरी प्रतिक्रिया
‘‘माझी बाेरांची ५०० झाडे असून, सध्या राेज माेडनिंब बाजारात ३० ते ३५ गाेणी बाेरे विक्रीसाठी पाठवित आहे. यंदा गुजरात, राजस्थान येथून मालाला मागणी नसल्याने उठाव नाही. परिणामी प्रति किलाे फक्त ५ ते ६ रुपये दर मिळत आहे. गेल्या वर्षी हाच दर १० रुपयांपर्यंत हाेता. एकही पट्टी १० रुपयांच्या आत नव्हती. एका गाेणीला मजुरी, हमाली, वाहतुकाची खर्च ९० रुपये असून, एका गाेणी मागे फक्त १५० रुपये मिळत आहे.’’
- दादा ढेकळे, (संपर्क ः ९६२३४१४९७८ )
शेतकरी, ढेकळेवाडी, ता. माेहाेळ, जि. साेलापूर

पुणे बाजार समितीमधील बाेरांची आवक आणि उलाढाल

 वर्ष आवक (क्विंटल) उलाढाल (रुपये)
 २०१२-१३
 बाेरे  २४ हजार ९०१  ३ काेटी ११ लाख २६ हजार २५०
 चेकनट  ४५९  १३ लाख ७७ हजार
 चण्यामण्या  ४६२  १ काेटी १६ लाख ४००
 २०१३-१४
 बाेरे  २५ हजार ७१७  ३ काेटी ८५ लाख ७५ हजार ५००
 चेकनट  ४  १८०००
 चण्यामण्या  ३०५  ७ लाख ६२ हजार ५००
२०१४-१५
 बाेरे  २२ हजार १२५  ३ काेटी ८७ लाख ८ हजार ७५०
 चेकनट  ४१  १ लाख ६४ हजार
 चण्यामण्या  ५५  १ लाख ३७ हजार ५००
२०१५-१६
 बाेरे  २० हजार ४३०  ३ काेटी ६४ लाख ५ हजार
 चण्यामण्या  ६३  १ लाख ८९ हजार
२०१६-१७
 बाेरे  ३३ हजार २२  ४ काेटी ९५ हजार ३३ हजार
 चण्यामण्या  ३१  ७७ हजार ५००
 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...