वनस्पतींचे १८० सेकंद, ३६० अंश कोनात विश्लेषण शक्य

१८० सेकंद, ३६० अंश कोनात वनस्पतींचे विश्लेषण शक्य
१८० सेकंद, ३६० अंश कोनात वनस्पतींचे विश्लेषण शक्य

नेब्रास्का लिंकन विद्यापीठातील संशोधकांनी पिकांच्या मूलभूत गुणधर्मांची माहिती गोळा करण्याची लिडार आधारित स्वयंचलित आणि कार्यक्षम पद्धत विकसित केली आहे. यातून पिकांच्या जनुकीय माहिती आणि भौतिक गुणधर्म समजणे शक्य होणार आहे. यातून पिकांच्या विविध जाती, संकर किंवा जनुकीय सुधारित गुणधर्मांची तुलना करणे शक्य होणार आहे. याचा फायदा पिकांच्या अधिक उत्पादनक्षम जातींच्या विकासासाठी शास्त्रज्ञांसोबतच पैदासकारांनाही होऊ शकतो. नेब्रास्का लिंकन विद्यापीठातील संशोधक युफेंग गे, सुरेश थापा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वनस्पतींच्या भौतिक गुणधर्मांविषयी मूलभूत माहिती गोळा करण्यासाठी या तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे वनस्पतीच्या दोन प्रकारांची तुलना सहजतेने करता येते. त्या विषयी माहिती देताना युफेंग गे म्हणाले, की आपण डीएनए सिक्वेन्सिंग आणि जनुकीय माहिती वेगाने मिळवणे शक्य आहे. मात्र, या माहितीची सांगड भौतिक माहितीशी घालण्यासाठी या तंत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो. केवळ तीन मिनिटांमध्ये अत्यंत अचूक माहिती उपलब्ध होऊ शकते. याचा पहिला प्रयोग मका आणि ज्वारी या पीक वनस्पतींवर करण्यात आला.

  • या दोन्ही पिकाच्या पानांचे पृष्ठफळ मोजण्यात आले. त्यातून प्रकाश संश्लेषणातून या वनस्पती किती ऊर्जा निर्माण करू शकतात, याचीही माहिती मिळवता येईल.
  • खोडाशी असलेला पानांचा कोन व त्यातील फरक यांची माहिती घेण्यात आली. त्यातून प्रकाश संश्लेषण आणि शेतामध्ये पानांची कॅनोपी किती असू शकते, याचा अंदाज येतो. त्यावरून पिकांच्या लागवडीचे अंतर अत्यंत अचूकतेने काढता येते.
  • मका आणि ज्वारी ही दोन्ही गवतवर्गीय पिके असून, त्यांच्या पानांच्या पृष्ठफळ ९१ टक्के, एकूण पानांचे प्रमाण व क्षेत्रफळ ९५ टक्के इतके होते. पानाचा खोडाशी असलेला कोनाची अचूकता सामान्यतः कमी असते. मात्र, त्याचे प्रमाण पानाचा प्रकार आणि बदल यातून ७२ ते ९० टक्के या दरम्यान आढळले आहे.
  • आतापर्यंत त्रिमितीय प्रतिमा मिळविण्यासाठी दोन कॅमेराद्वारे एकाच वेळी प्रतिमा घेऊन एकत्रित केल्या जात. मात्र, या नव्या ३६० अंश लिडार तंत्रज्ञानामध्ये त्यातुलनेमध्ये अधिक अचूकता व रिझॉल्युशन मिळत असल्याचे संशोधक सुरेश थापा यांनी सांगितले.
  • हे तंत्र पूर्वीच्या तंत्राच्या तुलनेमध्ये अधिक स्वस्तही ठरते.
  • पुढील टप्प्यामध्ये विविध रंगाच्या लेसर किरणांचा वापर करण्याचे नियोजन करत आहेत. त्यातून वनस्पतींनी घेतलेले पाणी आणि नायट्रोजन यांचेही मापन करता येईल, अशा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.
  • तीन मिनिटांमध्ये मिळते माहिती

  • कुंडीमध्ये नऊ पानांपर्यंत वाढलेले मका रोप. हे एखाद्या फिरत्या तबकडीवर ठेवण्यात आले असून, प्रतिसेकंद तीन अंशातून फिरते. साधारणतः दोन मिनिटांमध्ये फिरून आपल्या मूळ जागी परत येते. त्यावर लिडार या तंत्रज्ञानाद्वारे लेसर किरणांचा मारा करून, त्याद्वारे प्रत्येक घटकाचे मापन केले जाते.
  • पुढील एका मिनिटांमध्ये जवळच्या स्क्रिनवर त्रिमितीय प्रतिमा दिसण्यास सुरवात होते. प्रत्येक पानांचा आकार, क्षेत्रफळ आणि कोन यांची नोंद त्यावर घेतली जाते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com