दहा हजार वर्षांपूर्वीच्या शेतीचा शोध

 टाकारकोरी रॉक शेल्टर (स्रोत ः युनिव्हर्सिटी ऑफ हुद्दारशिल्ड)
टाकारकोरी रॉक शेल्टर (स्रोत ः युनिव्हर्सिटी ऑफ हुद्दारशिल्ड)

सबसहारण आफ्रिकेतील प्राचीन मानवाने सुमारे १० हजार वर्षांपूर्वी शेतीला प्रारंभ केला. लिबियन वाळवंटातील अशा प्रमुख विभागांमध्ये उत्खनन करण्यात येत आहे. या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑफ हुद्दारशिल्ड, युनिव्हर्सिटी ऑफ मोडेना अॅण्ड रेगियो एमिलिया येथील संशोधकांचे गट अभ्यास करीत आहेत. येथे शेतीच्या सुरवातीच्या काळातील अवशेष, तृणधान्यांच्या लागवडीच्या आणि धान्य साठवण्याच्या पद्धतीविषयी नावीन्यपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे.

नैर्ऋत्य लिबिया येथी ताकारकोरी येथे सध्या वाळवंट असले, तरी १० हजार वर्षांपूर्वी (होलोसीन कालखंड) उत्तम शेती होत असे. येथील उत्खननामध्ये एका लहान गोलाकार भागामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक बिया साठवलेल्या आढळल्या. या बियांचे एकत्रीकरण एखाद्या किटकांने किंवा मुंग्याने केलेले नाही ना, हे पाहण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ हुद्दारशिल्ड येथील फॉरेन्सिक बायोलॉजीतील तज्ज्ञ डॉ. स्टिफॅनो वॅनिन यांची मदत घेण्यात आली. त्यांनी दिलेल्या निर्वाळ्यानंतर बियांची साठवण माणसांनी केली असल्याच्या गृहितकावर शिक्कामोर्तब झाले. थोडक्यात, शिकारी व अन्नधान्य गोळा करणाऱ्या मनुष्याची शेती करणाऱ्या माणसामध्ये होताना घडणाऱ्या परिवर्तनाच्या खुणा येथे पाहता येतात. हा माणसे शेती करून, त्यातील पिकांची काढणी व साठवणूकही करू लागल्याचे पहिले पुरावे दिसतात. त्याकाळात होलोकोन सहारा येथील लोक करत असलेल्या जंगली तृणधान्य पिकांमध्ये बदलणाऱ्या वातावरणामध्ये तग धरण्याची उत्तम क्षमता आहे. त्याचा फायदा आजच्या हवामान बदलाच्या काळातही होऊ शकतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com