agricultural stories in marathi, agro vision, Agricultural intensification not a 'blueprint' for sustainable development | Agrowon

शाश्वत कृषी विकासासाठी समाज, पर्यावरणावरील परिणामांचा विचार हवा
वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

शेतीची तीव्रता वाढत चालली असून, त्याचे समाजावर आणि पर्यावरणावर एकत्रित परिणाम होत आहेत. हे परिणाम कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांसाठी अपेक्षेइतके चांगले नसल्याचे युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँगलिया व युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगन यांच्या एकत्रित संशोधनातून पुढे आले आहे. शाश्वत कृषी विकासासाठी कृषी पद्धतींचा समाज, पर्यावरणावरील परिणामांचा विचार होण्याची आवश्यकता त्यातून लक्षात आली आहे.

शेतीची तीव्रता वाढत चालली असून, त्याचे समाजावर आणि पर्यावरणावर एकत्रित परिणाम होत आहेत. हे परिणाम कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांसाठी अपेक्षेइतके चांगले नसल्याचे युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँगलिया व युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगन यांच्या एकत्रित संशोधनातून पुढे आले आहे. शाश्वत कृषी विकासासाठी कृषी पद्धतींचा समाज, पर्यावरणावरील परिणामांचा विचार होण्याची आवश्यकता त्यातून लक्षात आली आहे.

शेती पद्धतीची तीव्रता आणि शाश्वतता यांचे मेळ घालण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ आणि धोरणकर्त्यांकडून होत असतो. त्याचा फायदा जागतिक पातळीवर भूकमुक्ती आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी होऊ शकेल, असा दावा असतो. (उदा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येये आणि पॅरिस हवामान करार.) मात्र, या स्थितीचे पुरावे अत्यंत मर्यादित असून, यावर प्रकाश टाकण्याचे काम पूर्व अँगलिया आणि कोपनहेन विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. त्यांनी स्कॉटलॅंड, फ्रान्स आणि स्पेन येथील विविध ५३ संशोधनाचा आढावा घेतला.
जमिनीचे प्रमाण तेवढेच राहत असून, त्यातून अधिक उत्पादकता आणि उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परिणामी शेतीमध्ये पिकांखालील क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. याचे प्रगत देशांमध्ये चांगले परीणाम दिसून आले आहेत. असे असले तरी एकूण पर्यावरण आणि मानवीय विचार करता अल्प आणि मध्यम उत्पन्नगटातील देशांमध्ये हे उपाय तितके चांगले ठरत नसल्याचे संशोधकांचे मत आहे. आपले निष्कर्ष त्यांना नेचर सस्टेनिबिलिटी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित केले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...