agricultural stories in marathi, agro vision, Alfalfa loss- Annual ryegrass is a win | Agrowon

अल्फाअल्फा गवताऐवजी अन्य चारा पीक पर्यायांचा अभ्यास
वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

अल्फाअल्फा हे पीक अमेरिकेतील बहुतांश ठिकाणी पडणाऱ्या कडाक्याच्या हिवाळ्यात तग धरू शकत नाही. त्याऐवजी मशागत शून्य स्थितीमध्ये अन्य चारा पिकांची लागवड करून, उत्पादन, पोषणमूल्य या निकषावर अभ्यास करण्यात येत आहे.

अल्फाअल्फा हे पीक अमेरिकेतील बहुतांश ठिकाणी पडणाऱ्या कडाक्याच्या हिवाळ्यात तग धरू शकत नाही. त्याऐवजी मशागत शून्य स्थितीमध्ये अन्य चारा पिकांची लागवड करून, उत्पादन, पोषणमूल्य या निकषावर अभ्यास करण्यात येत आहे.

अमेरिकतील पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये अल्फाअल्फाची प्रामुख्याने लागवड केली जाते. अन्य राज्यांमध्ये पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे अल्फाअल्फा पिकाचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांना चाऱ्याची कमतरता भासते. हिवाळ्यातील नुकसानाचे प्रमाण कमी करण्यासाठी मिन्निसोटा विद्यापीठातील संशोधक प्रयत्न करत आहेत. कडाक्याच्या हिवाळ्यामुळे अल्फाअल्फा पीक काढावे लागलेल्या किंवा मृत झालेल्या शेतीमध्येच नव्याने मशागतीशिवाय विविध चारा पिकांची लागवड करून त्याच्या चाचण्या सुरू आहेत. त्याविषयी माहिती देताना एम. स्कॉट वेल्स यांनी सांगितले, की वार्षिक चारा पिकांच्या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्याच्या दृष्टीने चाचण्या घेतल्या जात आहेत.

  • प्रत्येक चारा पिकाचे गुणधर्म वेगळे असून, उत्पादकता, पोषणमूल्य, वारंवार होणारी कापणी यामध्ये फरक असतो. लागवडीनंतर चांगल्या प्रकारे मुळे पकडून त्यांची वाढ होण्यासाठी लागणारा काळही वेगळा असतो. या साऱ्या घटकांचा पिकाच्या आर्थिक गणितावर परिणाम होतो.
  • वेल्स आणि त्यांचे सहकारी हे अल्फाअल्फा या पिकाऐवजी वार्षिक मोहरीवर्गीय चारा पिकाचा आर्थिकदृष्टीने अभ्यास करत आहेत.
  • त्यापूर्वी विस्कॉन्सिन आणि मिन्निसोटा येथील ९३ टक्के अल्फाअल्फा उत्पादकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील सुमारे ६० टक्के लोकांना फटका सहन करावा लागला. जुन्या अल्फाअल्फा शेतामध्ये उत्सर्जित होणाऱ्या रसायनांमुळे नव्या अल्फाअल्फा पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचे वेल्स यांनी सांगितले, त्यामुळे या शेतामध्ये अन्य चारा पिकांची लागवड करण्याची आवश्यकता असते.
  • या शेतामध्ये इटालियन रेग्रास, ज्वारी - सुदानग्रास, रे ग्रास आणि रेड क्लोवर या पिकांच्या चाचण्या घेतल्या. आंतरपिकांच्या बदलांसह एकूण सात चारा पिकांच्या वाढीवर होणारे परिणाम तपासले. या पिकांचे उत्पादन, पोषणमूल्य, नत्रयुक्त खतांचा होणारा परिणाम आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे विश्लेषण करण्यात आले. केवळ उत्पादनापेक्षा चाऱ्याचे पोषणमूल्य महत्त्वाचे असून, त्या अनुषंगाने अधिक विचार केला. कारण टेफ आणि सुदान ग्रास यांचे उत्पादन अधिक असले तरी पोषणमूल्य कमी आहे. थोडक्यात, त्यातून होणारा आर्थिक परतावा कमी आहे. त्या तुलनेमध्ये वार्षिक रेग्रास हे पोषण मूल्य आणि उत्पादन या दोन्हीमध्ये फायद्याचे ठरते.
  • चारा पिकामध्ये नत्रयुक्त खतांचा केलेला वापर फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले. अल्फाअल्फा पीक घेतलेल्या शेतीमध्ये त्यातून मिळणारा नत्र पुढील पिकांसाठी उपयुक्त ठरतो.
  • या प्रयोगातील निष्कर्ष ‘अॅग्रोनॉमी जर्नल’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे चारा पीक ः
अल्फाअल्फा हे बहुवर्षीय चारापीक अकून, दुधाळ जनावरांबरोबरच घोडे, शेळ्या आणि मेंढ्यांच्या पशुखाद्यामध्ये वापरले जाते. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते २० टक्के इतके उच्च असते. त्याचप्रमाणे त्यात कॅल्शिअम, अन्य खनिजे आणि जीवनसत्त्वेही योग्य प्रमाणात असतात. या चारापिकाचा अमेरिकेच्या वार्षिक आर्थिक उलाढालीमध्ये अब्जावधी डॉलरइतका मोठा वाटा आहे.

टॅग्स

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...